जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देण्यात आले. साईमत/ पाचोरा/प्रतिनिधी : राज्य शासनाने केंद्र सरकारची नवीन पीकविमा योजना स्वीकारली असली, तरी जुन्या योजनेतील पाच निकषांपैकी फक्त पीक कापणी प्रयोग हा एकमेव निकष ठेवण्यात आला आहे. शेतकऱ्यांना विविध टप्प्यांवर दिलासा देणारे उर्वरित निकष रद्द झाल्यामुळे शेतकऱ्यांना योजनेतून फारसा फायदा होणार नाही, अशी भावना व्यक्त करत तालुक्यातील शेतकऱ्यांतर्फे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्रातील जळगाव जिल्हा, मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्र या भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे पिके, गुरे, घरे व शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या गंभीर संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत नवीन योजनेमुळे शेतकऱ्यांना अतिवृष्टी, गारपीट, वादळ, पूर यांसारख्या नैसर्गिक…
Author: saimat
विटनेर येथे शारदीय नवरात्रोत्सवनिमित्त उद्या यात्रोत्सव साईमत/ चोपडा/प्रतिनिधी : तालुक्यातील विटनेर येथे शारदीय नवरात्रोत्सव निमित्ताने चामुंडा माता मंदिरात उद्या दि.३० रोजी यात्रेचे आयोजन मंदिर समिती कडून करण्यात आले आहे . विटनेर येथे कुलस्वामिनी चामुंडा माता मंदिर असून हे मंदिर परिसरातील भाविकांसाठी श्रद्धास्थान मानले जाते. संपूर्ण दगडी बांधकाम असलेल्या या मंदिरात काळभैरव, गणपती यांची स्थापना मंदिर आवारात करण्यात आली आहे. हे मंदिर वर्षभर भक्तासाठी उघडे असते. मंदिरात सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळेस आरती करण्यात येते. नवरात्र उत्सव काळात संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण असते. तसेच हजारो भाविक येथे दर्शनाला येतात. चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्रला या मंदिरात विशेष भाविकांची मोठी गर्दी होते.…
‘श्रीं’चे हत्ती वहन आहे साईमत/ पारोळा/प्रतिनिधी : येथे आज सोमवारी ‘श्रीं’चे हत्ती वहन आहे. हे वहन रात्री ८ वाजता श्री बालाजी महाराजांचा मंदिरापासून निघून पूर्वेस नीट वाणी मंगल कार्यालयमार्गे आझाद चौक ते झपाटभवानी मंदिरात देवी पद्मावतींची आरती, मंदिरातून समोरुन पश्चिमेस नीट भोई गल्लीने श्री राम मंदिरात येईल.तेथून कासार गल्लीने टोळकर गल्ली,भाटे वाडी मार्गे कुंभार वाडा, ओतार गल्ली गांवहोळी चौकापर्यंत येऊन बाजारपेठेतून रथ चौक मार्गे पहाटे ३ वाजता मंदिरात येईल. आज सकाळी ८ वाजता मंदिरातून बालाजी महाराजांची पालखी निघेल. पालखी रथ चौकातून दक्षिणेस बाजारपेठ गांवहोळी चौक, नगरपालीका चौकातून जुने पोष्ट ऑफीस मार्गे दक्षिणेस डॉ.मोहरीर यांचे दवाखान्याजवळून हायवेने मालक कै.गिरधरशेठ शिंपी यांचे स्मारक…
नवरात्रीत रणरागिणींकडून ना.गुलाबराव पाटील यांच्याकडे आग्रहाची मागणी साईमत/पाळधी, ता.धरणगाव/प्रतिनिधी : ‘लव्ह जिहाद’ हा केवळ वैयक्तिक स्तरावरील गुन्हेगारी कृत्य नसून ते एक संघटित, नियोजनबद्ध आणि वैचारिक युद्ध आहे. यामध्ये खोटी ओळख, प्रेमजाळ, विवाह, धर्मांतरण, लैंगिक शोषण, वेश्या-व्यवसाय, निर्घृण हत्या, मानवतस्करी आणि विक्री, मानवी अवयवांची विक्री आणि दहशतवादी कारवायांत सहभाग इथपर्यंत गंभीर गुन्ह्यांचा समावेश होत. जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात ‘लव्ह जिहाद’ला असंख्य हिंदू युवती, महिला बळी पडलेल्या आहेत. त्यामुळे हे रोखण्यासाठी राज्यात येत्या हिवाळी अधिवेशनात लव्ह जिहाद विरोधी कायदा पारित करण्यात यावा, अशी मागणी रणरागिणींनी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. निवेदनाव्दारे केलेल्या मागण्या उत्तर प्रदेश आणि राजस्थान…
पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे. साईमत/जामनेर/प्रतिनिधी : शहरात चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, गेल्या ३ दिवसात ३ मोटार सायकली चोरीला गेल्या आहेत.गेल्या दोन दिवसापूर्वी माजी नगरसेवक उल्हास पाटील वाकी रोड यांची मोटार सायकल दिवसा ढवळ्या स्मशान भूमी जवळील ईदगाह मैदान येथून चोरीला गेली आहे.तर रात्री शहरातील साईनाथ नगर भागातून चोरट्यांनी एकाच रात्री दोन दुचाकी वाहने लंपास केल्याची घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे. रोजी मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी दोन्ही शेजारी राहणाऱ्या साईनाथ नगरमधील रहिवासी…
पर्यटकांसह सामान्य नागरिकांना प्रवेश बंद, पोलिस बंदोबस्त साईमत/धानोरा, ता. चोपडा/ प्रतिनिधी : यावल तालुक्यातील सावखेडासीम, चुंचाळे, नायगाव येथून जवळच असलेले निंबादेवी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. मंगळवारी धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले. मात्र, सांडव्याच्या भिंतीला तडा गेल्याने ती कोसळण्याची भिती प्रशासनाने व्यक्त केली. ही स्थिती पाहता दुर्घटना रोखण्यासाठी तहसीलदारांनी निंबादेवी धरण परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले. वनविभाग व पोलिसांनी बंदोबस्तदेखील लावला आहे. यावल तालुक्यातील पश्चिम भागात सावखेडासीम या गावापासून जवळच सातपुड्याच्या पायथ्याशी निंबादेवी धरण आहे. दरवर्षी पावसाळ्यात ऑगस्टमध्ये धरण भरून सांडवा ओसंडतो. भुशी डॅमसारखे चित्र तयार होते. सांडवास्थळी पायऱ्यांवरून वाहणारे पाणी जिल्हाभरातील पर्यटकांना आकर्षित करून घेते. मात्र, यंदा सातपुड्यात…
शहरातील बोरावल गेट परिसरात अवैध देशी बनावटीचे गावठी पिस्तूल साईमत/ यावल/प्रतिनिधी : यावल शहरातील बोरावल गेट परिसरात अवैध देशी बनावटीचे गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतूस घेऊन विक्रीसाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना यावल न्यायालयात हजर केले असता दि.२८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.मिळालेल्या माहितीनुसार युवराज उर्फ युवा राजू भास्कर (वय ३४, रा.बोरावल गेट,यावल) हा आपल्या ओळखीचा भूषण कैलास सपकाळे (वय ३१ रा. वराडसिम, डॉ. आंबेडकरनगर, ता. भुसावळ) याला विक्रीसाठी गावठी पिस्तूल आणला होता. पोलिसांनी सापळा रचून दोघांना पकडले. त्यांच्या अंगझडतीत गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतूस व दोन मोबाईल हॅण्डसेट असा एकूण ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. चौकशीत…
खाजगी वाहनाने पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले साईमत/पारोळा /प्रतिनिधी : तालुक्यातील मुंदाणे प्र.अ.येथे एका ४८ वर्षीय शेतकऱ्याचा विहिरीवरील पाण्याची इलेक्ट्रिक मोटर सुरू करताना शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास घडली.अर्जुन नारायण माळी असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. शेतकरी अर्जुन माळी हे आपल्या मुंदाणे शिवारातील शेतात गाईंना चारापाणी करून त्यांच्यासाठी पाण्याचे कुंड भरण्यासाठी विहिरीवरील पाण्याची इलेक्ट्रिक मोटर सुरू करण्यासाठी गेले असता शॉक लागून बेशुद्ध पडले. यावेळी त्यांना भाऊ नामदेव माळी यांनी खाजगी वाहनाने पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याबाबत नामदेव माळी यांनी पारोळा पोलीस ठाण्यात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्युची नोंद करण्यात…
सेवानिवृत्त चालकासह वाहकांचा सत्कार साईमत/जामनेर /प्रतिनिधी : श्री क्षेत्र मुक्ताईनगर ते श्री क्षेत्र भगवानगड मार्गावर नवीन बस सेवा सुरू केली आहे. यासाठी ‘भगवान सेने’च्या सततच्या पाठपुराव्याला यश आले आहे. जामनेर येथे बस आल्यावर माजी नगराध्यक्षा साधना महाजन यांनी गाडीला हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करुन श्रीफळ प्रदान केले. याप्रसंगी माजी नगरसेवक दीपक तायडे यांनी बस सुरु करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सेवानिवृत्त महारू नाईक यांचा तर मुक्ताईनगर डेपोचे चालक दराडे यांचा भाजपाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर तर न.पा.चे गटनेते डॉ. प्रशांत भोंडे यांनी वाहक घुगे यांचा सत्कार केला. ही गाडी मुक्ताईनगरहुन नियमित ७.३० ला निघणार असल्याचे सांगण्यात आले. याप्रसंगी भगवान सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर पाटील,…
वहनाची मिरवणूक सायंकाळी ६ वाजता श्री बालाजी महाराजांच्या मंदिरापासून साईमत/पारोळा/प्रतिनिधी : येथे आज शुक्रवारी ‘श्रीं’चे वाघ वहन आहे. या वहनाची मिरवणूक सायंकाळी ६ वाजता श्री बालाजी महाराजांच्या मंदिरापासून निघून पूर्वेस भावसार यांच्या चक्की जवळून दक्षिणेस मोरफळ गल्लीने मडक्या मारुती मंदिरा जवळून आझाद चौक ते झपाट भवानी मंदिरात देवी पद्मावतींची आरती, मंदिरातून पुढे शेवडी गल्लीतून बारी गल्ली, नास्कर गल्लीने पंचमुखी हनुमान मंदिरा जवळून भोसले गल्ली, जैन मंदिराजवळून पश्चिमेस जडे गल्ली, बागवान गल्ली, शिंदे गल्ली, राम मंदिर चौक राम मंदिर जवळून लष्कर गल्लीतून हिंगलाज माता मंदिराजवळून दक्षिणेस दशरथ पाटील यांच्या घराजवळून अमळनेर रोड शनी मंदिर जवळून बहादरपूर रस्त्याने लालबाग,बालाजी पार्क, व्यंकटेश नगर,…