पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांनी केली १५ कोटींची घोषणा, मेहरूण तलावाच्या सुशोभिकरणासाठी २० कोटी घोषित साईमत/जळगाव/प्रतिनिधी पर्यटन हा आता उद्योगाचे रूप घेत आहे. राज्यात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून अनेक मोठे प्रकल्प राज्यात सुरु आहेत. राज्यात किल्ले, जलस्रोत, लेण्या, वन मुबलक प्रमाणात आहेत. यासाठीच देशातील सर्व राज्याचा अभ्यास करून राज्यात नवे पर्यटन धोरण आणले आहे. त्याचाच भाग म्हणून जळगाव शहरातील मेहरूण तलावात जल क्रीडा पर्यटनाच्या विकासासाठी १५ कोटी रुपये देणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या तांत्रिक बाबीला लगेच सुरुवात करावी, अशी घोषणा राज्याचे ग्रामविकास तथा पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांनी केली. महाराष्ट्रातील पहिला तीन दिवशीय “ॲक्वा फेस्ट” जल पर्यटन महोत्सवाचे जळगावमध्ये मेहरूण तलावात…
Author: saimat
जळगाव एलसीबीची कारवाई साईमत/जळगाव/न.प्र.: शहरातील वेगवेगळ्या भागातून दुचाकी आणि मोबाईल चोरून नेणाऱ्या दोन संशयित आरोपींना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी दुपारी ३ वाजता पिंप्राळा हुडको परिसरातून अटक केली आहे. याबाबत जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शोएब अफजल खान पठाण (वय २३) आणि शेख आवेश शेख मोहम्मद (वय २१, दोन्ही रा.पिंप्राळा हुडको, जळगाव) असे अटक केलेल्या दोन्ही संशयित आरोपींची नावे आहेत.जळगाव शहरातील कोर्ट चौक, सुभाष चौक, नेहरू चौक या ठिकाणाहून दुचाकी तर खोटे नगर भागातून मोबाईल असा मुद्देमाल चोरून नेल्याच्या घटना घडल्या होत्या. यासंदर्भात संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केले होते. चोरीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी शोएब पठाण…
कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे राष्ट्रपित्याला अभिवादन साईमत/जळगाव/न.प्र.: कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त महात्मा गांधी उद्यान येथे महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्ष विजय अभंगे, शशिकांत बागडे, राहुल नेतलेकर, नरेश बागडे, योगेश बागडे, मोहन गारुंगे, सचिन बाटूंगे, प्रदीप नेतलेकर, संतोष रायचंदे, संदीप गारुंगे, संदीप बागडे, गोपाल बाटुंगे, पंकज गागडे, राहुल दहियेकर, गौतम बागडे, क्रांती बाटूंगे, जयेश माछरे, कार्तिक बाटूंगे, नितीन नेतले, सोनू रायचंदे, निलेश बागडे आदी समाजबांधव उपस्थित होते.
गांधी रिसर्च फाउंडेशनच्या अहिंसा सद्भावना यात्रेत जळगावकरांचा लाभला उत्स्फूर्त प्रतिसाद साईमत/जळगाव/न.प्र.: चुक झाली तर ती स्वीकारा, त्याबद्दल पश्चाताप करा आणि त्यात सुधारणा होण्याकरिता प्रायश्चित अवश्य करा, हे महात्मा गांधीजींनी सांगितलेल्या तत्वाचे सुत्र प्रत्येकाने अंगिकारावे. तन व मन स्वच्छ ठेवून कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता शुद्ध आचारण ठेवून अहिंसा, शांतीतून समर्थ भारत घडवू, या असा मोलाचा संदेश गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरु व गांधी रिसर्च फाउंडेशनचे संचालक डाॅ. सुदर्शन अय्यंगार यांनी दिला. महात्मा गांधी जयंती तसेच लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या औचित्याने गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे लाल बहादूर शास्त्री टॉवरपासून अहिंसा सद्भावना शांती यात्रेचे आयोजन केले होते. लाल बहादूर शास्त्री टॉवर येथे मान्यवरांच्या…
पाचोरा प्रशासनावर आदिवासी भिल्ल समाजाचा जनआक्रोश मोर्चा, केंद्र महायुती, महाविकास आघाडी, आमदार, माजी आमदार यांच्यावर सडकून टीका प्रशासनाला दिले १२ मागण्यांचे निवेदन साईमत/पाचोरा/प्रतिनिधी एकलव्य आदिवासी संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी भडगाव रस्त्यावरील अटल मैदान ते तहसील कार्यालयावर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर वाघ, जिल्हाध्यक्ष एकनाथ अहिरे, जिल्हा संपर्क प्रमुख रोहिदास जाधव, रावेर विभाग जिल्हाध्यक्ष संजय वाघ, पाचोरा तालुकाध्यक्ष गणेश वाघ, भडगावचे तालुकाध्यक्ष कौतिक सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. जनआक्रोश मोर्चाचे रूपांतर सभेत करण्यात आले. सभेत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र, राज्य सरकार मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मतदार संघांचे आमदार किशोर पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, सह महायुती, महाविकास आघाडी सरकार या सर्वांनी आदिवासी भिल्ल समाजाची…
अन्न, पोषण सुरक्षा अन्नधान्य पिके, राष्ट्रीय खाद्य तेल अभियान गळीतधान्य पिके प्रात्यक्षिक साईमत/जळगाव/प्रतिनिधी : अन्न आणि पोषण सुरक्षा अन्नधान्य पिके व राष्ट्रीय खाद्य तेल अभियान गळीतधान्य पिके सन २०२४-२५ अंतर्गत रब्बी हंगामामध्ये पीक प्रात्यक्षिके तसेच प्रमाणित बियाणे वितरण या बाबींच नियोजन करण्यात आलेले आहे. या करिता चालू वर्षी हरभरा, गहू, जवस, करडई, भूईमुग, व मोहरी या पिकांचे महा-डीबीटी प्रणालीद्वारे बियाणे या घटकासाठी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. पीक प्रात्याक्षिके हि बाब शेतकरी गटामार्फत राबविली जाणार आहेत. पीक प्रात्यक्षिकासाठी एका शेतकऱ्याला १ एकर मर्यादेत निविष्ठा स्वरूपात अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला आवश्यक असणा-या बियाण्याचा २ हेक्टर…
शानभाग विद्यालयात महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी साईमत/जळगाव/प्रतिनिधी : विवेकानंद प्रतिष्ठान संचालित कै.श्रीमती ब.गो. शानभाग विद्यालय येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री या थोर नेत्यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांना या थोर नेत्यांच्या कार्याची ओळख व्हावी या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला. या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील , विभाग प्रमुख रुपाली पाटील , स्वप्निल पाटील , जगदीश चौधरी आदींचे हस्ते महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सकाळ विभागात या कार्यक्रमाचे निमित्ताने विद्यालयातील शिक्षक गुलाबराव पाटील , सचिन पाटील यांनी तसेच महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्याबद्दल अनमोल अशी…
अध्यक्षपदी योगेश ढगे तर उपाध्यक्षपदी रविराज शिंदे यांची निवड साईमत/मलकापूर/प्रतिनिधी : दुर्गा नगर येथील नवदुर्गा देवी महोत्सवाची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. त्यात अध्यक्षपदी योगेश ढगे, उपाध्यक्षपदी रविराज शिंदे, कोषाध्यक्षपदी विनोद गायकवाड यांची सर्वानुमते निवड केली आहे. यंदा मंडळाला ७५ वर्ष पूर्ण होत असून मंडळ हे वर्ष अमृतमोहत्सवी वर्ष म्हणून साजरे करणार आहे. दुर्गानगरच्या मुख्य मार्गावर स्थापित असलेल्या मंडळाची वैशिष्ट्ये म्हणजे डिजे, आणि बँडसारख्या ध्वनी प्रदूषण करणारे वाद्यांना बाजुला ठेऊन अनेक वर्षांची परंपरा जोपासत आगमन सोहळ्याला लेझीम पथक आणि अग्नीचा भवरा हे मंडळाचे आकर्षण ठरत असते. यंदा १० फुट उंच अशी आकर्षक देवीची मूर्ती स्थापन करण्यात येणार आहे. नवरात्रोत्सवाच्या १५…
शेतकऱ्यांना सरसकट पीक नुकसानीची ५० हजार रुपये एकरी मदत द्या जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा, काँग्रेसची मागणी साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी : सतत बरसणाऱ्या पावसामुळे जळगाव जिल्ह्यात खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे शासनाने जळगाव जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट पीक नुकसानीची मदत एकरी ५० हजार रुपये द्यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. शासनामार्फत जळगाव जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना सरसकट एकरी पन्नास हजार रुपयाची मदत त्वरित देण्यात यावी, अशी मागणी मुक्ताईनगरचे तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावर्षी जुलै महिन्यापासून सतत मुसळधार व वादळी वाऱ्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात…
यावल तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या सभासदांना लाभांश वाटप सुरू साईमत/यावल/प्रतिनिधी : यावल तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाचे सभापती नरेंद्र नारखेडे व सर्व संचालक मंडळ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत झालेल्या ठरावात संस्थेच्या ३१ मार्च २०२४ पर्यंत नोंदणी असलेल्या सर्व सभासदांना यावल तालुका शेतकरी खरेदी विक्री संघातर्फे सभासदांना १० टक्के लाभांश वाटप १ ऑक्टोबर २०२४ पासून सुरू करण्यात आली. लाभांश घेण्यासाठी आलेले प्रथम सभासद जयंत उखर्डू महाजन, रा. सातोद यांना यावल तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाचे युवा उपसभापती तेजस धनंजय पाटील यांच्या हस्ते लाभांश देण्यात आला. यावेळी मॅनेजर संजय दादा भोईटे, यावलकर साहेब, रामचंद्र भोईटे उपस्थित होते. संस्थेच्या वाटचालीत…