कडाक्याच्या थंडीसह अनेक समस्यांचा सामना करत ठरला चॅम्पियन साईमत /ता. यावल /प्रतिनिधी : जिद्द आणि कठोर मेहनतीच्या जोरावर डोंबिवलीतील अवघ्या आठ वर्षांच्या ओम कुणाल भंगाळे याने न्हावीकर (ता. यावल) व डोंबिवलीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. त्याने मुंबईतील अटल सेतू ते गेटवे ऑफ इंडिया हे १७ किलोमीटरचे सागरी अंतर अवघ्या २ तास ३३ मिनिटांत पार केले आहे. ओम डोंबिवलीतील ओमकार इंटरनॅशनल स्कूलमध्ये तिसरीत शिकतो. यश जिमखान्यात प्रशिक्षक विलास माने यांच्या मार्गदर्शनाखाली तो जलतरणाचे धडे गिरवत होता. विशेष म्हणजे, या मोहिमेपूर्वी ओमला समुद्रात पोहोण्याचा कोणताही अनुभव नव्हता. तरीही त्याची जिद्द पाहून त्याचे आई-वडील आणि आजोबांनी त्याला पाठिंबा दिला. या मोहिमेसाठी प्रशिक्षक विलास…
Author: saimat
आसिफ मोहम्मद यांनी अनपेक्षित विजय पटकावला साईमत /रावेर /प्रतिनिधी : सोमवारी (१२ जानेवारी) रावेर नगरपालिकेत झालेल्या उपनगराध्यक्ष निवडणुकीत नाट्यमय आणि चकमकीसह गोंधळ निर्माण झाला. विशेष सभेपूर्वीच दोन राजकीय गटांमध्ये झालेल्या जोरदार वादावादीत नगरसेवक गणेश सोपान पाटील यांच्या अंगावरील कपडे फाटण्याची धक्कादायक घटना घडली, ज्यामुळे नगरपालिका परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आली, परंतु या घटनेने शहरात मोठा गदारोळ उडाला. राड्यापूर्वीचे राजकीय तणाव उपनगराध्यक्ष निवडणुकीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजप समर्थकांमध्ये सुरुवातीपासूनच चकमक सुरू होती. मतदान सुरू होण्याआधीच ओढताण इतकी वाढली की शरद पवार गटाचे नगरसेवक गणेश पाटील यांचे कपडे…
युवक जिल्हाध्यक्ष विश्वजीत पाटील यांचा तडकाफडकी राजीनामा साईमत /जळगाव /प्रतिनिधी : जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचलेला असतानाच, मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाला जळगावात मोठा राजकीय धक्का बसला आहे. पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष विश्वजीत पाटील यांनी अचानक आपल्या पदाचा व प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या घडामोडीमुळे निवडणूक काळातच पक्षाच्या संघटनात्मक ताकदीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विश्वजीत पाटील यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांना उद्देशून अधिकृत राजीनामा पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी राजीनाम्याचे कारण वैयक्तिक असल्याचे नमूद केले आहे. “माझ्या वैयक्तिक कारणांमुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार…
महापौर कोण? जळगावात आरक्षणाचा सस्पेन्स कायम; प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात इच्छुकांची धडधड साईमत /जळगाव /प्रतिनिधी : जळगाव महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा रणसंग्राम आता अखेरच्या टप्प्यात पोहोचला आहे. केवळ काही तासांत, उद्या १३ जानेवारीपासून प्रचाराच्या तोफा थंडावणार असून १५ जानेवारीला मतदान आणि १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. मात्र, निवडणुकीचा कौल अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना अद्याप महापौर पदाचे आरक्षण जाहीर न झाल्याने संपूर्ण राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता आणि सस्पेन्सचे वातावरण निर्माण झाले आहे. या निवडणुकीत महायुती, महाविकास आघाडी आणि अपक्ष उमेदवारांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. प्रतिष्ठेची ही लढाई असल्याने सर्वच पक्षांनी प्रचारात ताकद पणाला लावली असून प्रभागनिहाय जोरदार हालचाली सुरू आहेत.…
ॲड.अर्जुन पाटील यांचा इशारा; बेघर वृद्ध दाम्पत्याला मिळवून दिली ८१ आर. जमीन साईमत /बोदवड/प्रतिनिधी : ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे मार्गदर्शक असून त्यांचा छळ करून सेवा-सुश्रूषेचे आमिष दाखवून मालमत्ता हडपणाऱ्या मुलांनी सावध राहावे. आई-वडिलांना योग्य वागणूक दिली नाही तर दिलेली संपत्ती कायद्यानुसार परत घेतली जाऊ शकते, असा ठाम इशारा ॲड. अर्जुन पाटील यांनी दिला आहे. ज्येष्ठ नागरिक कायदा पालकांच्या बाजूने असून त्यांनी अन्याय सहन करण्याची गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. मुक्ताईनगर येथील मुक्ताई मंदिर परिसरात वास्तव्यास असलेल्या गोळेगाव (ता. बोदवड, जि. जळगाव) येथील कस्तुराबाई शांताराम पाटील (वय ७६) व शांताराम नामदेव पाटील (वय ७७) या वृद्ध दाम्पत्याची व्यथा जाणून घेतल्यानंतर…
जळगावातील दोन मोठ्या चोरीचे गुन्हे उघडकीस साईमत /जळगाव /प्रतिनिधी : शहरातील घरफोडींच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणाला स्थानिक पोलीसांनी मोठा फटका दिला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या यशस्वी कारवाईत आंतरराज्यीय अट्टल गुन्हेगार चंदन राजू जुनी याला पुण्यातील हडपसर परिसरातून ताब्यात घेण्यात आले असून, त्याने जळगावातील दोन मोठ्या घरफोडींच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी दोन स्वतंत्र पथकांची स्थापना करून तपास सुरू केला होता. शहरातील विविध भागातील सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण करून संशयित आरोपीची ओळख पटविण्यात पोलीस यशस्वी झाले. चंदन राजू जुनी (वय ४५, रा.…
मनोरंजनातून मतदानाचे प्रबोधन; प्रभाग १६ मधील महिलांचा उत्साह ओसंडून वाहला साईमत /जळगाव /प्रतिनिधी : जळगाव शहरातील अयोध्या नगर परिसरातील ‘शिवम योगा सेंटर’ येथे प्रभाग १६ मधील महिलांसाठी नुकताच हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले. अपक्ष उमेदवार हर्षाली मनीष कोल्हे आणि इच्छा दीपक अत्तरदे यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे पारंपरिक सण साजरे करताना महिलांना मतदानाबाबत प्रबोधन देखील देणे. कार्यक्रमाची सुरुवात हर्षाली कोल्हे आणि इच्छा अत्तरदे यांनी उपस्थित प्रत्येक महिलेचे वैयक्तिकरीत्या स्वागत करून त्यांना हळदी-कुंकू लावून केली. दैनंदिन घरगुती कामांच्या व्यापातून महिलांना विरंगुळा मिळावा, या उद्देशाने विविध सांस्कृतिक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. या खेळांमध्ये संगीत खुर्ची, फुगडी, लंगडी आणि पारंपरिक गाण्यांच्या…
घरांचे कुलूप तोडून रोख रक्कम, दागिने व मौल्यवान वस्तू चोरून नेल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले साईमत /जामनेर/प्रतिनिधी : तालुक्यातील सामरोद गावात मध्यरात्री १ ते २ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी तीन ठिकाणी धाडसी घरफोडी करत लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेत अज्ञात चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत इंद्राबाई चौधरी, गोविंद नारायण चौधरी आणि रमेश झाल्टे यांच्या घरांचे कुलूप तोडून रोख रक्कम, दागिने व मौल्यवान वस्तू चोरून नेल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. एका घरात घरमालक झोपेत असतानाच ही घटना घडल्याने चोरट्यांचा धाडसीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. सकाळी घरफोडीचा प्रकार…
निःस्वार्थ अध्यापनाचा गौरव; भगीरथ इंग्लिश स्कूलच्या किरण व किशोर पाटील यांचा टिळक महाराष्ट्र विद्यापीठात सन्मान साईमत /जळगाव /प्रतिनिधी : शिक्षण क्षेत्रात केवळ कर्तव्य म्हणून नव्हे, तर सेवाभावातून ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांचा गौरव होणे ही समाजासाठी प्रेरणादायी बाब मानली जाते. जळगाव येथील कै. सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कूलमधील आदर्श व उपक्रमशील इंग्रजी विषयाचे शिक्षक किरण विठ्ठल पाटील आणि किशोर प्रताप पाटील यांचा टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे यांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंतर्गत शाळांमध्ये घेण्यात येणाऱ्या इंग्रजी प्रि-एलिमेंटरी, इंग्रजी एलिमेंटरी, इंग्रजी ज्युनिअर व इंग्रजी सीनियर या विविध स्पर्धांसाठी इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना सहभागी करून घेऊन गेल्या पंधरा वर्षांपासून…
मनपा शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतला ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ चित्रपटाचा आनंद साईमत /जळगाव /प्रतिनिधी : मराठी भाषेचे महत्त्व, मराठी शाळांची ओळख आणि त्यांची सद्यस्थिती प्रभावीपणे मांडणाऱ्या ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ या मराठी चित्रपटाचा विशेष खेळ जळगाव येथील महानगरपालिका केंद्र शाळा क्रमांक २ मधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना केवळ चित्रपट पाहण्याचा आनंदच मिळाला नाही, तर मराठी भाषेबद्दल अभिमान निर्माण करणारा एक भावनिक आणि प्रेरणादायी अनुभवही मिळाला. या विशेष खेळाला वेगळेच महत्त्व लाभले ते म्हणजे प्रसिद्ध मराठी अभिनेते सिद्धार्थ चांदेकर आणि अमेय वाघ यांनी स्वतः थिएटरमध्ये उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. चित्रपटातील कलाकारांना प्रत्यक्ष समोर पाहण्याचा अनुभव अनेक विद्यार्थ्यांसाठी…