५० लाख रुपये खर्चाच्या बगीच्याचे लोकार्पण हा तर ‘ट्रेलर’ आहे साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी येथील प्रभाग क्रमांक १५ मधील भव्य दिव्य असे ५० लाख रुपये खर्चाच्या बगीच्याचे लोकार्पण आ.मंगेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच प्रभागातील विविध नवीन रस्त्यांचे भूमिपूजनही करण्यात आले. यावेळी वाल्मिक नगर येथे झालेल्या कार्यक्रमात आ. मंगेश चव्हाण यांनी माझ्या काळात प्रभाग १४ व प्रभाग १५ मध्ये अनेक विकासकामे केली आहेत.त्यातील भव्य अशा बगीच्याचे लोकार्पण होत आहे. लवकरच पाच कोटींच्या निधीतून परिसराला शाप ठरलेल्या नाल्याचे प्रथम टप्प्यातील कामाला सुरुवात करण्यात येईल. तसेच कब्रस्तानचे ४० वर्षांपासून रखडलेले काम मार्गी लावत कंपाऊंडही केले, असे त्यांनी सांगितले. आगामी काळात अशीच साथ आपण दिली…
Author: saimat
चाळीसगाव महाविद्यालयात कला मंडळातर्फे विविध कला प्रकारांचे सादरीकरण साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी येथील बी.पी. आर्ट्स, एस. एम. ए. सायन्स आणि के. के. सी. कॉमर्स महाविद्यालयात कला मंडळामार्फत विविध कला प्रकारांचे सादरीकरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद बिल्दीकर होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून डॉ. मिलिंद करंबळेकर अध्यक्ष रंगगंध न्यास होते. मंचावर उपप्राचार्य डॉ. अजय व्ही. काटे, उपप्राचार्या डॉ. के. एस. खापर्डे, कला मंडळ प्रमुख डॉ. पंकजकुमार नन्नवरे, प्रा. मुकुंद अहिरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. मिलिंद करंबळेकर, अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद बिल्दिकर यांनी मनोगत व्यक्त करुन मार्गदर्शन केले.यशस्वीतेसाठी कला मंडळाचे सदस्य प्रा. अंकुश जाधव, प्रा.पंकज वाघमारे, प्रा. किशोर पाटील,…
एड्सबाबत सामाजिक अंधश्रद्धा, गैरसमजवर मार्गदर्शन साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह मुक्ताईनगर येथे तालुक्यातील आशा सेविका यांच्यासाठी एचआयव्ही रुग्ण आणि इतर शारीरिकरित्या पसरणारे रोग या गंभीर सामाजिक विषयाबाबत जनजागृती शिबिर आयोजित केले होते. अध्यक्षस्थानी तहसीलदार गिरीष वखारे होते. यावेळी वकील संघाचे सचिव अँड.विनोद इंगळे, आयसीटीसी ग्रामीण रुग्णालय समुपदेशक रितेश गवई, पंचायत समितीचे ग्रामविस्तार अधिकारी अनिल वराडे, पंचायत समिती अधीक्षक सुधाकर राठोड, आशा सेविका सुपरवायझर प्रतिभा सोनटक्के, तालुक्यातील संपूर्ण आशा सेविका उपस्थित होत्या. शिबिरात समुपदेशक गवई यांनी एचआयव्ही लागण खबरदारी, उपाययोजना, एड्सबाबत सामाजिक अंधश्रद्धा, गैरसमज यावर मार्गदर्शन केले. अध्यक्ष तहसीलदार वखारे यांनी…
ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, हक्क, अधिकारविषयी कायदेशीर मार्गदर्शन साईमत/चोपडा/प्रतिनिधी : चोपडा न्यायालयाचे विधीज्ञ एस.डी. पाटील यांनी चोपडा ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, हक्क व अधिकार विषयक कायदेशीर मार्गदर्शन केले. सध्या ज्येष्ठ नागरिकांच्या निर्माण होणाऱ्या समस्यां या नैतिक मूल्यांची होणारी घसरण, ज्येष्ठांविषयी अनादर व वाढत जाणारी विभक्त कुटुंब व्यवस्था अशा विविध कारणांमुळे होत असल्याचे निरीक्षण न्यायालयांनी नोंदविल्याचे संघाचे विधी तज्ज्ञ ॲड. व्ही.बी.पाटील यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमात सेवानिवृत्त प्रा. व्ही.के.पाटील यांनी ज्येष्ठांच्या व्यथा मांडल्या तर व्ही. एच. करोडपती यांनी ज्येष्ठांच्या समस्या व योजनांविषयी माहिती दिली. कार्यक्रमास संघाचे अध्यक्ष जयदेव देशमुख, उपाध्यक्ष जे.एस. नेरपगारे, सहसचिव इंजि व्ही.…
जिल्हाधिकाऱ्यांंसह तहसिलदारांची लाभणार उपस्थिती साईमत/फैजपूर/प्रतिनिधी : श्री संभाजी राजे दुर्गोत्सव मित्र मंडळ साई ग्रुप फैजपूर यांच्यावतीने एकाच ठिकाणी वणी गड निवासी सप्तश्रंृगी माता, माहूर निवासिनी रेणुका माता, कोल्हापूर निवासिनी महालक्ष्मी माता, तुळजापूर निवासिनी भवानी माता अशा साडेतीन शक्तीपिठांची एकाच ठिकाणी स्थापना केली आहे. त्याच ठिकाणी रविवारी, ६ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी साडे सात वाजता माता जागरण व भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन कै.दयावती कन्हैयालाल वर्मा यांच्या स्मरणार्थ बऱ्हाणपूर (मध्यप्रदेश) येथील गायक रोशनी चंदवाणी व विशाल उंदकारे यांच्या मधुर वाणीतून माता जागरण व भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सोमवारी, ७ऑक्टोबर रोजी युवा कीर्तनकार शब्दप्रभू भरत महाराज म्हैसवाडीकर यांचे जाहीर कीर्तन सायंकाळी साडे…
चोपडा महाविद्यालयात आयोजित व्याख्यानात समीक्षक प्रा.डॉ.शिवाजी हुसे यांचे प्रतिपादन साईमत/चोपडा/प्रतिनिधी : कौशल्य विकासासाठी जिद्द व मेहनत हवी. शिकण्याच्या वयात विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घ्यायला हवा. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पाडण्याचे काम भाषा विभाग करतो. स्पर्धेच्या काळात टिकण्यासाठी भाषिक कौशल्ये आत्मसात करावी. त्यातूनच विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होतो. मराठी भाषा विषयाकडे करिअर म्हणून विद्यार्थ्यांनी बघावे, असे प्रतिपादन कन्नड शिवाजी महाविद्यालयातील मराठी विभाग व भाषा संशोधन केंद्र प्रमुख साहित्यिक व समीक्षक प्रा.डॉ.शिवाजी हुसे केले. येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे ‘तिफणकार’ तसेच प्रा.डॉ.शिवाजी हुसे यांचे ‘मराठी भाषा कौशल्ये आणि रोजगाराच्या संधी’ विषयावरील व्याख्यानाचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत…
मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजनेचा घेतला लाभ, जिल्ह्यातून ८०० यात्रेकरूंचा सहभाग साईमत/पहुर, ता. जामनेर/प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यातील ८०० यात्रेकरूंची लाॕटरी पध्दतीने निवड झाली होती. योजनेसाठी जिल्ह्यातून एक हजार १७७ अर्ज प्राप्त झाले होते. त्यात पहूर येथील ५४ भाविकांची निवड झाली. जामनेर तालुक्यातील १०५ भाविक अयोध्या दर्शन यात्रेत सहभागी झाले होते. विशेष वातानुकुलीत भारत गौरव पर्यटन रेल्वे ८०० भाविकांना घेऊन ३० सप्टेंबर रोजी अयोध्येकडे रवाना झाली होती. भाविकांनी अयोध्येतील भव्य श्रीराम मंदीरात रामलल्लाच्या मुर्तीचे दर्शन घेतले. यासह हनुमान गढी, दशरथ महल, कनक महल, लता मंगेशकर चौक अशा स्थळांना भेटी देऊन सायंकाळी शरयू नदीत स्नान करून शरयू मातेच्या महाआरतीत…
राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत निर्णय : मंत्री अनिल पाटील साईमत/अमळनेर/प्रतिनिधी : येथील पिंपळे रस्त्यावर असलेल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस अमळनेर प्रती पंढरपूरचे श्रद्धास्थान असलेल्या प. पू . संत श्री सखाराम महाराजांचे नाव देण्याचा निर्णय राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत झाल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी दिली. संत सखाराम महाराज हे अमळनेर प्रती पंढरपूर विठ्ठल रुखमाई वाडी संस्थानचे आद्यपुरुष असून संपूर्ण महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचा झेंडा हातात घेऊन फिरणारे ते एकमेव संत आहेत. महाराजांचे अमळनेर हे मुख्य स्थान असले तरी पंढरपूर पासून महाराष्ट्रभर महाराजांचे प्रस्थ असल्याने सर्वत्र त्यांचा भक्त परिवार मोठ्या प्रमाणात आहे. सद्यस्थितीत प.पू.संत श्री प्रसाद महाराज हे सखाराम…
आर्थिक विवंचनेतून संपविले जीवन, पहुर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद साईमत/पहुर, ता. जामनेर/प्रतिनिधी : कर्जाचा वाढत जाणारा डोंगर आणि पशुपालन व्यवसायात झालेले आर्थिक नुकसान यामुळे आर्थिक विवंचनेत असलेल्या तरुण अल्पभूधारक शेतकऱ्याने आपल्या शेतातच झाडाला गळफास लावून जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना जामनेर तालुक्यातील लोंढरी बुद्रूक येथे घडली. जीवन ज्ञानेश्वर भागवत (वय ३८)असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते सतत आर्थिक विवंचनेत होते. आर्थिक संकटावर मात व्हावी, यासाठी त्यांनी म्हैस विकत घेऊन दुग्ध व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यातही त्यांना यश न आल्याने त्यांनी अखेर शेतातच लिंबाच्या झाडाला गळफास लावून जीवनयात्रा संपवली. पहूर ग्रामीण रुग्णालयात त्यांना दाखल केल्यावर तेथील डॉक्टरांनी…
बालकांच्या आहाराविषयी तज्ज्ञांनी केले मार्गदर्शन साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी एकात्मिक बालविकास प्रकल्प दक्षिण जळगाव चाळीसगाव पाचोरा बीट क्रमांक १ अंतर्गत चाळीसगाव येथे राष्ट्रीय पोषण आहार अभियान हा कार्यक्रम अंगणवाडी प्रभागात नुकताच राबविण्यात आला. त्याची सांगता चौधरी वाडा येथे करण्यात आली. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे नगरपालिका दवाखान्यातील डॉ.अनुराधा खैरनार, माजी नगरसेविका विमलबाई चौधरी उपस्थित होते. तसेच बीटमधील अंगणवाडी सेविका, मदतनीस, परिसरातील इतर सदस्य उपस्थित होते यावेळी डॉ. अनुराधा खैरनार यांनी आहाराचे महत्व सांगितले. तसेच काळाबरोबर आहारातील कसा बदल करावा, बालकांना आहार त्याच्या आवडीनुसार कसा करून घ्यावा, तशी आहाराची पद्धत कशी बदल करावी, याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. विमलबाई चौधरी यांनी आहार व बाळाचे एक हजार दिवस…