Author: saimat

दोन एकर जागेत व्हॉलीबॉल, हँडबॉल खेळांच्या क्रीडा साहित्यासह फलकाचे अनावरण साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी ग्रामीण भागातील तरुणांमध्ये सांघिक खेळाची आवड निर्माण व्हावी, तारुण्यातच नोकरी मिळावी, मोबाईलपासून युवा पिढी लांब रहावी, यासाठी चाळीसगावातील श्याम भगवानदास अग्रवाल सर्वांगिण विकास मंडळाच्या माध्यमातून मंडळाच्या दोन एकर जागेत व्हॉलीबॉल व हँडबॉल खेळांच्या क्रीडा साहित्यासह फलक अनावरणाचा कार्यक्रम मंडळाचे अध्यक्ष सुभाष चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. चाळीसगाव येथील श्याम भगवानदास अग्रवाल सर्वांगिण विकास मंडळाच्या माध्यमातून गेली ३५ वर्ष सर्व मित्र एकत्र येऊन विविध उपक्रम राबवित असतात. त्याचप्रमाणे ५ ऑक्टोबर रोजी चाळीसगाव तालुक्यातील लोणजे येथे स्व. श्याम अग्रवाल यांच्या जयंतीनिमित्त ग्रामीण भागातील होतकरू तरुणांसाठी क्रीडा साहित्य उपलब्ध करून देण्यात आले…

Read More

पातोंडाला खेळ पैठणीच्या कार्यक्रमाप्रसंगी माजी खा.उन्मेशदादा पाटील यांचे प्रतिपादन, धनश्री पाटील यांनी जिंकली ‘मानाची पैठणी’ साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी ग्रामीण भागातील महिलांना शहरी भागाच्या तुलनेत आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. यासाठी परिसरात हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देवून त्यांच्या अंगभूत दडलेल्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी आज खान्देशी कलाकारांच्या उपस्थितीत खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यापुढे माझ्या लाडक्या बहिणी सोबत सुरक्षित बहिणी रहाव्यात यासाठी काम करायचे आहे.लाडक्या बहिणींना मिळणारे 1500 रूपये महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर 3000 रूपये मिळावे.यासाठी प्रयत्न करणार अशी भावना शिवसेना नेते तथा माजी खासदार उन्मेशदादा पाटील यांनी आज येथे व्यक्त केली आहे. पातोंडा ता.चाळीसगाव येथील माजी खासदार…

Read More

महाआरतीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या हस्ते पूजन साईमत/फैजपूर/प्रतिनिधी येथील देविवाडातील साई ग्रुप संभाजी राजे मित्र मंडळातर्फे नवरात्र उत्सवनिमित्त दररोज विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे. मंगळवारी सायंकाळी महाआरती ५६ भोगचा कार्यक्रम घेण्यात आला. महाआरतीचे पूजन सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी ५१ जोडपे महाआरतीसाठी उपस्थित होते. मातेला ५६ भोग नैवेद्य दाखविण्यात आला. पुरोहित दीपक पाठक यांनी धार्मिक विधीवत पूजन केले. यावेळी एमपीएससीच्या परीक्षेत मेडिकल ऑफिसरच्या परीक्षेत महाराष्ट्रातून प्रथम आलेल्या डॉ.दीपल प्रशांत पाटील यांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच महाराष्ट्र शासनाचा सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार अश्विनी कोळी यांना मिळाल्याबद्दल त्यांचाही मंडळातर्फे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर…

Read More

प्रांताधिकारी कार्यालयात दिले प्रमुख मागण्यांचे निवेदन साईमत/सोयगाव/प्रतिनिधी येथे आदिवासी टोकरे कोळी समाजातर्फे प्रांत कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. धरणे आंदोलनात प्रभाकर सोनवणे, महेश सोनवणे, मंदा सोनवणे, शोभा कोळी, सरिता कोळी, रावेर, यावल तालुक्यातील सर्व कोळी जमात महिला, पुरुष यांची उपस्थिती होती.आंदोलनाचे आयोजन कोळी समाजाचे अध्यक्ष दिलीप कोळी, संतोष कोळी शहरातील कोळी समाज बांधव, भगिनी यांनी केले होते. प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार जगदीश गुरव यांना प्रमुख मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनातील प्रमुख मागण्यांमध्ये हलके गाव कामगार इनाम वर्ग ६ ब जमिनच्या सातबारा उताऱ्यावर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ३६व ३६ ‘अ’च्या बंधनास पात्र आदिवासी जमिनीवर ३६ व…

Read More

विविध विकासात्मक कामांच्या भूमिपूजनप्रसंगी आ.राजेश एकडे यांचे प्रतिपादन साईमत/मलकापूर/प्रतिनिधी मतदार संघामध्ये विकासात्मक कामे करण्यावरच भर राहिला आहे. मतदार संघाचा सर्वांगिण विकास हेच ध्येय ठेवले. त्या माध्यमातून प्रत्येक विकासात्मक करण्याचा प्रवासात्मक कलम समर्थ साथ असेपर्यंत हा विकासाचा झंझावात असाच कायम ठेवणार असल्याचे प्रतिपादन आ. राजेश एकडे यांनी केले. तालुक्यातील विविध विकासात्मक कामांचा भूमिपूजन सोहळा नुकताच घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. मलकापूर विधानसभा मतदार संघात आ. राजेश एकडे यांनी आतापर्यंत भरीव असा विकासात्मक निधी खेचून आणत हजारो कोटी रूपयांची कामे केली. आता सुध्दा विविध विकासात्मक कामांकरीता ५० कोटी १८ लाखांचा भरीव असा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे मलकापूर तालुक्यातील बेलाड,…

Read More

विमा योजनेच्या लाभार्थ्याला दोन लाखांचा धनादेश प्रदान साईमत/जामनेर/प्रतिनिधी शहरातील कल्पना शिवाजी पाटील यांनी स्टेट बँक अंतर्गत प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा स्टेट बँकेतून विमा काढला होता. विम्याची अनुक्रमे वार्षिक रक्कम २० रुपये तसेच ४३६ रुपये अशी होती. दुर्दैवाने कल्पना शिवाजी पाटील यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांचे पती शिवाजी पाटील यांना स्टेट बँकेमार्फत प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेतून मंजूर झालेली रक्कम दोन लाख रुपयाचा धनादेश नुकताच देण्यात आला. यावेळी शाखा व्यवस्थापक विकास कुमार, सर्विस मॅनेजर दीपक वराडे, तनिया अरोरा, सागर जावंजाळ, प्रियंका कासार उपस्थित होते. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ मिळाल्यामुळे दुःखात हातभार लागला.…

Read More

श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिराजवळ रस्ता दुभाजकाला स्वयंचलित सिग्नल बसविण्याची मागणी साईमत/पहुर,ता. जामनेर/प्रतिनिधी येथील ग्रामीण रुग्णालयापासून श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिरापर्यंत रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. रस्त्याचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे पडले आहे. खड्डे चुकवताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे सद्यस्थितीला चित्र आहे. तसेच श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिराच्या प्रवेशद्वारातून बाहेर पडल्यावर असलेले दुभाजक धोकादायक ठरत आहे. दुभाजकावर वाहने धडकल्याने वारंवार अपघात घडत आहेत. अपघात टाळण्यासाठी दुभाजकाची दुरुस्ती करून येथे स्वयंचलित सिग्नल बसविण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पहुर ग्रामीण रुग्णालयापासून श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिरापर्यंत…

Read More

संस्थेतर्फे यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करून केला गौरव साईमत/भडगाव/प्रतिनिधी येथील कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित आमडदेतील सौ.साधनाताई प्रतापराव पाटील माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय शाळेतील चार विद्यार्थ्यांची मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये जिल्हास्तरावर निवड झाली आहे. स्पर्धेत १७ वर्षाच्या आतील गटात इयत्ता दहावीचा विद्यार्थी विशाल लोटन पाटील हा १०० मीटर धावणे तालुकास्तरीय स्पर्धेत तालुक्यातून प्रथम आल्याने त्याची जिल्हास्तरावर निवड करण्यात आली. त्यानंतर कल्पेश सुनील पाटील हा विद्यार्थी ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत तालुक्यातून द्वितीय आल्याने त्याचीही निवड जिल्हास्तरावर केली आहे. त्यानंतर १९ वर्षाच्या आतील गटात इयत्ता ११वी सायन्सचे दोन विद्यार्थ्यांपैकी कुणाल भाऊसाहेब पाटील हा ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत तालुका स्तरातून…

Read More

बोदवड पं.स.च्या माध्यमातून गरजूंसाठी राबविली योजना साईमत/बोदवड/प्रतिनिधी येथे पंचायत समितीच्या समाज कल्याण विभागातर्फे तालुक्यातील पाच दिव्यांग बांधवांना बॅटरीवर चालणाऱ्या तीनचाकी सायकलींचे वाटप नुकतेच करण्यात आले. २०२२-२३ या वित्तीय वर्षात स्वतंत्र दिव्यांग निधीतून दिव्यांगांच्या कल्याणासाठी व पाच टक्के निधीतून बॅटरीचलीत सायकलींचे वाटप करण्यात आले. त्यासाठी तालुक्यातील पाच लाभार्थीची निवड झाली होती. त्यात कोमल मोरे (शेलवड), नंदकिशोर पाटील (वरखेड खुर्द), जनार्दन गायकवाड (साळशिंगी), भारत निकम (कोल्हाडी) आणि जुनोना येथील कडू सोनवणे ह्या लाभार्थींचा समावेश होता. दिव्यांगांना सायकल वाटप करताना तहसीलदार अनिल वाणी, बीडीओ प्रदीप घांडे, नगराध्यक्ष आनंदा पाटील, विधान सभा क्षेत्र प्रमुख हितेष पाटील, नगरसेवक दिनेश माळी, गजानन खोडके यांच्यासह पदाधिकारी उपस्थित…

Read More

महिलांनी धार्मिक गीतांवर धरला ठेका साईमत/फैजपूर/प्रतिनिधी येथील कै. दयावती कन्हैयालाल वर्मा यांच्या स्मरणार्थ नवरात्रोत्सवानिमित्त संभाजी राजे दुर्गोत्सव मित्र मंडळ, साई ग्रुपतर्फे माता जागरण व भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यात बऱ्हाणपूर येथील रोशनी चांदवानी, विशाल उंद्कारे यांच्यासह त्यांच्या इतर मंडळींनी कार्यक्रमास उपस्थिती देऊन माता रानी यांची भक्ती गीत व इतर भक्ती गीत सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. अतिशय सुंदर अशा धार्मिक कार्यक्रमांवर गीता सादर करून महिलांनी गीतांवर ठेका धरला. यावेळी अतिशय भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. याप्रसंगी अखिल भारतीय संत समितीचे कोषाध्यक्ष महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरीजी महाराज, खंडोबावाडी देवस्थानचे गादीपती पवन दासजी महाराज यांची विशेष उपस्थिती होती. त्यासोबत…

Read More