पिंगळवाडे शाळेचे उपक्रमशील शिक्षक दत्तात्रय सोनवणे जिल्हास्तरीय “आदर्श शिक्षकरत्न” पुरस्काराने सन्मानित साईमत/अमळनेर/प्रतिनिधी तालुक्यातील पिंगळवाडे जिल्हा परिषद शाळेचे उपक्रमशील तथा तंत्रस्नेही शिक्षक दत्तात्रय सोनवणे यांना त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन जिल्ह्यातील जामनेर येथील जिनियस मास्टर्स फाउंडेशन संस्थेतर्फे दिला जाणारा 2024-25 या वर्षाचा जिल्हास्तरीय “आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार” प्रदान करण्यात आला. फाउंडेशनतर्फे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून एक शिक्षक याप्रमाणे १४ शिक्षक व जामनेर तालुक्यातील प्रत्येक केंद्रातून एक शिक्षक तसेच शिक्षण, कृषी, पोलीस, महसूल, आरोग्य आदी विभागातील प्रत्येकी एक अधिकारी-कर्मचारी याप्रमाणे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ४६ पुरस्कारार्थींना सन्मान पदक, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन नुकतेच गौरविण्यात आले. जामनेर येथील एकलव्य विद्यालयाच्या सावरकर सभागृहात…
Author: saimat
नागलवाडी माध्यमिक विद्यालयातील मुलींना १८ सायकलींचे मोफत वाटप साईमत/चोपडा/प्रतिनिधी मानव विकास संसाधन अंतर्गत आठवीच्या मुलींना घरून शाळेत ये-जा करण्यासाठी मान्यवरांच्या हस्ते सायकल वाटप करण्यात आले. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी चोपडा एज्युकेशन सोसायटी संस्थेच्या सचिव माधुरी मयूर, संचालक भूपेंद्रभाई गुजराथी, ज्येष्ठ सभासद रमेश जैन, नागलवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच सचिन पाटील, महिला सदस्या लिलाबाई पाटील, ढिंगलीबाई बारेला, ग्रामपंचायत सदस्य तसेच ज्येष्ठ नागरिक माजी सरपंच धरमदास आण्णा, महाराणा पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र पाटील, वि. का. सोसायटीचे व्हा.चेअरमन दीपक पाटील, नागलवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख देवेंद्र पाटील, संस्थेचे समन्वयक गोविंदभाई गुजराथी, उल्हासभाई गुजराथी, डी.टी महाजन, प्रताप विद्या मंदिर व माध्यमिक विद्यालय नागलवाडी शाळेचे आजी-माजी मुख्याध्यापक,…
क्षत्रिय अहिर शिंपी समाज मध्यवर्ती संस्था, शिंपी समाजाच्या मागणीला यश साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी अखिल भारतीय श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज मध्यवर्ती संस्था व समस्त शिंपी समाजाची अनेक वर्षापासूनच्या मागणीला यश मिळाले आहे. मंत्रिमंडळच्या बैठकीत महाराष्ट्र सरकारने शिंपी समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचे ठरविले आहे. या मागणीसाठी शिंपी समाजातील सर्व पोटजातीतील संघटनांनी सरकारकडे अनेकदा निवेदन व पत्रव्यवहार केले होते. ६ सप्टेंबर २०२४ रोजी सागर बंगला, मुंबई येथे समस्त शिंपी समाजाच्या मेळाव्यात अखिल भारतीय श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज मध्यवर्ती संस्था व इतर संघटनांनी महाराष्ट्र सरकारच्या मंत्र्यांजवळ श्री संत नामदेव महाराज आर्थिक विकास महामंडळाची मागणी केली होती. मेळाव्याला राष्ट्रीय अध्यक्ष वनेश खैरनार, विश्वस्त…
उर्वरित इतर तांडे वस्तींनाही निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील : आ.मंगेश चव्हाण साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी तालुक्यातील तळागळातील घटकांपर्यंत विकास कामांना पोहोचविण्याचे ध्येय घेऊन सुरू असलेल्या आ.मंगेश चव्हाण यांच्या विकास कामांच्या संकल्पाला यश मिळाले आहे. चाळीसगाव तालुक्यातील ३२ तांड्यांना चा कोटी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आ.मंगेश चव्हाण यांच्या कर्तुत्वाने तालुक्यात कोट्यावधींची विकास कामे सुरू आहे. तळागळातील घटकांपर्यंत विकास कामे पोहचावी, यासाठी महायुतीचे सरकार तात्काळ निर्णय घेत आहेत. ९ ऑक्टोंबर रोजी संत सेवालाल महाराज बंजारा, लमाण तांडा समृध्दी योजनेंतंर्गत चाळीसगाव तालुक्यातील ३२ तांड्यांना चार कोटी ४० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे शहर असो व मोठी गावे असो यात सुरू असलेली विकासकामे…
खंडोबाची आरती तळी भरून जल्लोषात साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी महाराष्ट्रातील तमाम गड किल्ल्यांच्या संवर्धनाचा वसा घेतलेल्या सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून यावर्षी महाराष्ट्रातील ६५ गडकोटांवर गड पूजन करून दसरा साजरा करण्यात आला. याच कार्यक्रमाअंतर्गत चाळीसगाव तालुक्यातील मल्हारगड येथे सह्याद्री प्रतिष्ठान चाळीसगावच्या दुर्गसेवकांनी मल्हारगड येथे दसरा साजरा केला. त्यात गड पूजन शस्त्र पूजन तसेच गडदेवता खंडोबाची आरती व तळी भरून मोठ्या जल्लोषात वाजत-गाजत दसरा महोत्सव साजरा केला. सर्वप्रथम सह्याद्री प्रतिष्ठानचे केंद्रीय उपाध्यक्ष दिलीप घोरपडे यांनी गडावरील हनुमान टेकडी येथे छत्रपती शिवरायांच्या पालखीची पूजा केली. त्यानंतर मिरवणुकीला सुरवात झाली. वाजत-गाजत पालखी मिरवणूक गडावरील पुरातन पायऱ्या ज्या जमिनीखाली गाडल्या गेलेल्या होत्या, त्या सह्याद्री प्रतिष्ठानने मातीचा ढिगारा बाजूला करून…
पहुर कसबेतील ग्रामसभेत केंद्र सरकारसह पंतप्रधानांच्या अभिनंदनाचा एकमुखी ठराव पारित साईमत/पहुर, ता. जामनेर/प्रतिनिधी येथील ग्रामपंचायतीच्या कार्यालयात नुकतीच ग्रामसभा घेण्यात आली. ग्रामसभेत केंद्र सरकारसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा एकमुखी ठराव पारित करण्यात आला. अध्यक्षस्थानी माजी सरपंच शंकर जाधव होते. प्रारंभी उद्योजक तथा दानशूर व्यक्तिमत्व टाटा उद्योग समूहाचे आधारवड स्व.रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी ग्रामविकास अधिकारी अशोक बाविस्कर यांनी केंद्र सरकारच्या अभिनंदनाचा ठराव मांडला होता. ठरावाला सर्वानुमते संमती देण्यात आली. ऐतिहासिक आणि प्राचीन परंपरा लाभलेल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने मायबोलीचा सन्मान वाढला आहे, असे गौरवोद्गार कवी तथा उदयोन्मुख लेखक शंकर भामेरे यांनी काढले. परिसरातील वाढत्या…
रामानंदनगर परिसर दुर्गा मंडळातर्फे विविध उपक्रम साजरे साईमत/जळगाव/प्रतिनिधी शहरातील रामानंदनगर परिसर दुर्गा मित्र मंडळातर्फे सालाबादप्रमाणे यंदाही दुर्गादेवीची स्थापना केली होती. तसेच मंडळातर्फे विविध उपक्रम साजरे करण्यात आले. यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष मुकेश पाटील, उपाध्यक्ष तेजस अहिरराव, सचिव तुषार नारखेडे, खजिनदार वेदांत अहिरराव, कार्याध्यक्ष शुभम भावसार तसेच सदस्यांमध्ये दिलीप कुमावत, राजेंद्र बडगुजर, अमित पाटील, देवेंद्र शिंदे, लोकेश सपकाळे, आलोक सोनार आदींनी परिश्रम घेतले. (छाया: शाम विसपुते)
शिवराय प्रतिष्ठान महिला मंडळातर्फे दुर्गा सप्तशतीच्या पाठाचे सामूहिक वाचन साईमत/जळगाव/प्रतिनिधी शहरातील पिंप्राळा भागातील जिल्हा परिषदेच्या कॉलनीतील शिवराय प्रतिष्ठान महिला दुर्गा मंडळाच्यावतीने देवीची स्थापना केली होती. दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रीनिमित्त विविध उपक्रम राबवून दुर्गा सप्तशतीच्या पाठाचे सामूहिक वाचन करण्यात आले. पाठ वाचण्यासाठी परिसरातील सुमारे ३० महिलांनी सहभाग घेतला होता. यशस्वीतेसाठी मंडळाच्या अध्यक्षा नीलू इंगळे, विकास मराठे, निलेश बडगुजर, आबा पाटील, योगिता शिरसाठ, प्रतिभा मराठे यांनी परिश्रम घेतले.
भाविकांनी केली मरीमातेच्या दर्शनासाठी गर्दी साईमत/पहुर, ता. जामनेर/प्रतिनिधी येथील ग्रामदैवत मरीमातेच्या बारागाड्या उत्सवात चिमुकल्यांसह भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आनंद घेतला. शुक्रवारी सायंकाळी बाराखड्या उत्सवाचे आयोजन केले होते. सुरुवातीला मरीमातेचे पूजन करण्यात आले. वाघूर नदीच्या तीरावर ग्रामदैवत मरीमाता देवीचे मंदिर आहे. येथे नवरात्रनिमित्त विद्युत रोषणाई केली होती. तसेच भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी केली होती. यशस्वीतेसाठी मरीमाता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्रावण कुमावत, भगत भागवत भडांगे, दिनकर पवार, राजाराम पवार, धनराज पवार, संतोष पवार, मधुकर पवार, भानुदास जाधव, मयूर करंकार, बंडू चौधरी, शेषराव पाटील, सचिन कुमावत, पुंडलिक कुमावत, संतोष पवार, धनराज गोरे, भिकन कुमावत, रवी पाटील, रतिलाल कुमावत, अमृत कुमावत, मुरलीधर…
शहरातील गणेशवाडी परिसरात उडाली खळबळ साईमत/जळगाव/ न.प्र. शहरातील गणेशवाडी परिसरातील रणछोड नगरामध्ये एका महिलेच्या डोक्यात लोखंडी हत्याराने वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी, १० ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. सुवर्णा राजेश नवाल (वय ५७, रा. रणछोड नगर, गणेश वाडी, जळगाव) असे मयत महिलेचे नाव आहे. सविस्तर असे की, जळगाव शहरातील गणेशवाडी परिसरातील रणछोड नगरामध्ये सुवर्णा नवाल या महिला आपल्या पती राजेश नवाल यांच्यासह वास्तव्याला होत्या. त्यांचे पती राजेश नावाल हे दाणा बाजार परिसरात धान्याचे व्यापारी आहेत. दरम्यान गुरुवारी, १० ऑक्टोबर रोजी रात्री ८.३० वाजेच्या पूर्वी सुवर्णा नवाल या घरी…