“उपमुख्यमंत्री शिंदे अनुपस्थित; तरीही जळगावमध्ये महायुती रोड शोने जनसागर लोटला” साईमत /जळगाव/प्रतिनिधी : जळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज गुरुवारी आयोजित महायुती रोड शोमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ऐनवेळी दौरा रद्द झाला. तरीही महायुतीने प्रचारात कोणताही खंड पडू दिला नाही आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रमुख नेत्यांसह, पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन रोड शो यशस्वीपणे राबविला. रोड शोदरम्यान महाविजय रथ यात्रेला शहरभर जनसागर लोटल्याचे दृश्य पाहायला मिळाले. दोन दिवसापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रोड शोनंतर, उपमुख्यमंत्री शिंदे यांचा रोड शो जळगाव शहरात जय्यत तयारीसह आयोजित करण्यात आला होता. शहरातील प्रमुख रस्त्यांवर आकर्षक स्वागत कमानी, बॅनर्स, झेंडे आणि फलक लावून संपूर्ण मार्ग भगवेमय…
Author: saimat
शिवणी-ताळसवाडा मार्गावर ऑटोचालकाचा गळा आवळून निर्घृण खून; परिसरात भीतीचे वातावरण साईमत /मलकापूर/प्रतिनिधी : शिवणी ते ताळसवाडा मार्गावर एका व्यवसायिक ऑटोचालकाचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना गुरुवार, दि. ८ जानेवारी रोजी समोर आली. मृतकाची ओळख अमोल भाऊराव भवरे (वय ३५) अशी झाली असून, प्राथमिक तपासात त्याचा गळा आवळल्याचे स्पष्ट झाले आहे. खुन झाल्यानंतर मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकल्याने परिसरात भीती आणि खळबळ पसरली आहे. घटना सकाळच्या सुमारास उघडकीस आली. नागरिकांना संशयास्पद अवस्थेत मृतदेह दिसल्याने त्यांनी तात्काळ पोलीस यंत्रणेला सूचित केले. पोलिस पथक घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठविला. प्राथमिक तपासानुसार, मृतकाच्या गळ्यावर जोरदार आघात झाल्याचे खुणा आढळल्या असून, या घटनेला खून…
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न साईमत /जळगाव/प्रतिनिधी : जळगाव शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर व जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, शांतता आणि सुरक्षिततेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. येत्या १५ जानेवारी रोजी मतदान तर १६ जानेवारी रोजी मतमोजणी होणार असल्याने निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. या बैठकीत निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, संभाव्य अनुचित घटनांना आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना, मतदान व मतमोजणीच्या दिवशी कडक सुरक्षा व्यवस्था, तसेच पोलीस, महसूल, महानगरपालिका व अन्य यंत्रणांमधील समन्वय व तत्काळ प्रतिसाद यंत्रणा याबाबत सविस्तर चर्चा झाली. संवेदनशील भागांवर विशेष…
तुंबलेल्या गटारांमुळे दलीत वस्तीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात साईमत /बोदवड/प्रतिनिधी शिरसाळा ग्रामपंचायतीच्या निष्काळजी, मनमानी व उदासीन कारभारामुळे गावातील नागरिकांचे आरोग्य अक्षरशः राम भरोसे असल्याचे भयावह चित्र समोर आले आहे. दलीत वस्ती परिसरातील गटारे अनेक दिवसांपासून तुंबलेल्या अवस्थेत असून सांडपाणी रस्त्यावर साचल्याने संपूर्ण परिसरात अस्वच्छता, दुर्गंधी आणि डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला आहे. या गंभीर समस्येकडे ग्रामपंचायतीने पूर्णतः दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. दलीत वस्तीतील परिस्थिती अत्यंत विदारक दलीत वस्ती भागातील गटारे पूर्णपणे घाण पाण्याने भरून वाहत असून सांडपाणी थेट रस्त्यावर पसरले आहे. परिणामी नागरिकांना ये-जा करणेही कठीण झाले आहे. घरासमोरच साचलेल्या सांडपाण्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून लहान…
उज्जैन दर्शनासाठी निघालेल्या मित्रांवर काळाचा घाला; कन्नड घाटात भीषण अपघात, शेवगावचे तिघे ठार, चौघे गंभीर साईमत /चाळीसगाव/प्रतिनिधी : मध्य प्रदेशातील उज्जैन येथे महाकालेश्वर दर्शनासाठी निघालेल्या सात मित्रांच्या आनंदयात्रेचा शेवट भीषण दुर्घटनेत झाला. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात असलेल्या कन्नड घाटात चारचाकी वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात नगर जिल्ह्यातील शेवगाव येथील तिघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून चौघे जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे शेवगाव तालुक्यात शोककळा पसरली आहे. प्राप्त माहितीनुसार, शेवगाव येथील सात मित्र चारचाकी वाहनाने उज्जैनकडे दर्शनासाठी निघाले होते. जळगाव–चाळीसगाव मार्गावरील कन्नड घाट परिसरात वाहन पोहोचताच एका तीव्र वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. वेगात असलेली कार रस्त्याच्या कडेला…
५ हजारांची मागणी, ४ हजार स्वीकारली – एसीबीने तलाठी पकडला साईमत /जामनेर/प्रतिनिधी : जामनेर तालुक्यातील तलाठ्याने फेरफार नोंदीसाठी जमिनीच्या खरेदीदाराकडून ५ हजार रुपयांची लाच मागितली, त्यापैकी ४ हजार रुपये स्वीकारताना जळगाव एसीबीच्या सापळ्यात अडकून रंगेहात पकडला. वसीम राजू तडवी (वय २७) या तलाठ्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार जामनेरचे रहिवासी असून त्यांनी १६ डिसेंबर २०२५ रोजी दोन बिनशेती प्लॉट खरेदी केले होते. खरेदी नोंदवण्यासाठी आणि ७/१२ उताऱ्यावर स्वतःचे व पत्नीचे नाव नोंदवण्यासाठी तलाठी कार्यालयात गेले असता, तलाठी तडवी यांनी लाच मागितली. तक्रारदाराने लाच न देण्याचा निर्णय घेत ७ जानेवारी २०२६ रोजी जळगाव एसीबीला तक्रार नोंदवली. तक्रारीची दखल…
पोलीस रायझिंग डे अर्थात पोलीस वर्धापन दिन साईमत /मलकापूर/प्रतिनिधी : पोलीस रायझिंग डे अर्थात पोलीस वर्धापन दिन सप्ताहाच्या निमित्ताने मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने दि. ६ जानेवारी २०२६ रोजी विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक सतीश महल्ले यांनी देवधाबा येथील मोतीलाल संचेती विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना पोलीस स्टेशनमध्ये चालणाऱ्या कामकाजाची सविस्तर माहिती देत प्रत्यक्ष मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनचे दैनंदिन कामकाज, तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया तसेच विविध प्रकारच्या शासकीय हत्यारांची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये पोलीस प्रशासनाबाबत विश्वास निर्माण व्हावा व कायद्याची जाणीव व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. याचप्रसंगी ‘पोलीस काका -पोलीस दीदी’ या जनजागृती उपक्रमाअंतर्गत…
कुसुंबा–धानवडमध्ये दोन कुटुंबांवर आत्महत्येचा आघात साईमत /जळगाव/ प्रतिनिधी : जळगाव तालुक्यात मंगळवारी (ता. ६) एकामागून एक अशा दोन हृदयद्रावक घटनांनी परिसर सुन्न झाला. कुसुंबा आणि धानवड या गावांत दोन प्रौढांनी घरात एकटे असताना गळफास घेऊन जीवन संपवल्याच्या घटना दुपारच्या सुमारास उघडकीस आल्या. या दुर्दैवी प्रकारामुळे दोन्ही गावांत शोककळा पसरली आहे. कुसुंबा गावातील किराणा व्यावसायिक समाधान भिमराव पाटील (वय ४२) यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. समाधान पाटील यांची पत्नी व मुलगी बाहेरगावी गेली होती, तर मुलगा किराणा दुकानात बसला होता. याच दरम्यान समाधान पाटील यांनी घरात टोकाचे पाऊल उचलले. काही वेळाने मुलगा घरी आला असता, वडील गळफास घेतलेल्या…
जळगावात थरार, आरोपी पाठलाग करून अटकेत साईमत /जळगाव /प्रतिनिधी न्यायालयाच्या आदेशानुसार पकड वॉरंट बजावण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर एका सराईत तरुणाने चाकू उगारून हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना जळगाव शहरात घडली. ही घटना गुजराल पेट्रोल पंपाजवळील हटिल पूजा परिसरात मंगळवारी घडली असून, यावेळी पोलिसांशी जोरदार धक्काबुकीचा प्रकार झाला. आरोपीने पोलिसांच्या तावडीतून पळ काढण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला अटक केली. या घटनेमुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नितेश उर्फ गोल्या मिलिंद जाधव (रा. पिंप्राळा, जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध न्यायालयाचे पकड वॉरंट प्रलंबित होते. या वॉरंटच्या अंमलबजावणीसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) कॉन्स्टेबल…
महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत खळबळ; छत्रपती संभाजीनगरमध्ये खासदार इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला, एमआयएममधील अंतर्गत वाद उघड साईमत /वृत्तसेवा/छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरात एक खळबळजनक आणि गंभीर घटना घडली आहे. एमआयएमचे राष्ट्रीय नेते व खासदार इम्तियाज जलील यांच्या वाहनावर प्रचारादरम्यान हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेमुळे एमआयएममधील अंतर्गत गटबाजी आणि असंतोष चव्हाट्यावर आला असून, निवडणुकीपूर्वीच पक्षासमोरील अडचणी वाढल्याचे चित्र आहे. प्राथमिक माहितीनुसार, इम्तियाज जलील छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रचार करत असताना अचानक काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या वाहनावर धारदार शस्त्राने वार करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.…