Author: saimat

महामार्गावर भयावह अपघात: कंटेनरखाली चिरडून वृद्धाचा जागीच मृत्यू, पत्नी गंभीर जखमी साईमत /जळगाव /प्रतिनिधी : – भावजयीच्या अंत्यसंस्काराचे सोपस्कार संपवून घरी परतत असलेल्या प्रल्हाद अमृत बाविस्कर (वय ६०, रा. मन्यारखेडा, ता. भुसावळ) यांच्यावर शनिवारी दुपारी जळगाव-नेरी महामार्गावरील कंडारी फाट्याजवळ प्रचंड दुर्दैवी हल्ला घडला. बारामती-रावेर बसच्या धडकेमुळे त्यांच्या दुचाकीचे नियंत्रण सुटले आणि समोरून येणाऱ्या कंटेनरच्या पुढील चाकाखाली प्रल्हाद बाविस्कर येऊन जागीच ठार झाले. या घटनेत त्यांची पत्नी सुनीताबाई बाविस्कर गंभीर जखमी झाल्या आहेत. दोघेही विटनेर येथे भावजयीच्या अंत्यसंस्कारासाठी गेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी मन्यारखेडाकडे परतण्याचा मार्ग घेतला होता. एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत जखमी महिला आणि मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व…

Read More

 रक्ताळलेल्या अवस्थेत जखमी तरुणाचा पोलीस ठाण्यात ठिय्या साईमत /जळगाव/प्रतिनिधी : – जळगाव शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे समोर आला असून, कौटुंबिक वादातून झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर घडलेल्या थरारक घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. धारदार शस्त्राने झालेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला एक तरुण थेट जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात पोहोचला आणि “जोपर्यंत हल्लेखोरांना अटक होत नाही, तोपर्यंत उपचार घेणार नाही,” अशी ठाम भूमिका घेत पोलीस ठाण्याच्या प्रांगणातच ठिय्या मांडला. अशी घडली घटना :सत्यजित गायकवाड असे जखमी तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कौटुंबिक वादातून त्याच्याच जवळच्या नातेवाईकांनी सत्यजितवर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात त्याच्या हाताला व शरीराच्या इतर भागांना गंभीर…

Read More

गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसांसह १९ वर्षीय तरुण जेरबंद साईमत /भुसावळ /प्रतिनिधी : – शहरात एखादा गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडविण्याच्या उद्देशाने गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या एका तरुणाला भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक करून संभाव्य अनर्थ टाळला आहे. मजहर अब्बास जाफर इराणी (वय १९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून सुमारे १७ हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी, १७ जानेवारी रोजी सकाळी सुमारे ११ वाजेच्या सुमारास भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे कर्मचारी नियमित गस्तीवर असताना त्यांना एका संशयास्पद तरुणाबाबत गोपनीय…

Read More

क्षणात होत्याचं नव्हतं! भरधाव पल्सरची दुभाजकाशी जोरदार धडक साईमत /मुक्ताईनगर/प्रतिनिधी : – मलकापूरकडून मुक्ताईनगरकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर रविवारी दुपारी घडलेल्या भीषण अपघाताने परिसरात खळबळ उडाली. पिंपरी अकाराऊत शिवारात भरधाव वेगातील पल्सर दुचाकी अनियंत्रित होऊन थेट रस्त्याच्या दुभाजकावर आदळल्याने तीन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात तिन्ही तरुणांना डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली असून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवार दि. १८ जानेवारी रोजी दुपारी पल्सर दुचाकी (क्र. एमएच ५४ – १४०६) मलकापूर येथून मुक्ताईनगरच्या दिशेने अतिशय वेगात जात होती. पिंपरी अकाराऊत गावाजवळील सरळ रस्त्यावर अचानक चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. वेग अधिक असल्याने चालकाला गाडी सावरणे…

Read More

राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसवर मोठा धक्का; अजित-शरद गट पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चेत साईमत/मुंबई/प्रतिनिधी :  राज्यातील नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत असून, सर्वाधिक फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसला आहे. अजित पवार गट आणि शरद पवार गट या दोन्ही गटांना अपेक्षित यश मिळालेले नाही, ज्यामुळे पक्षाच्या भविष्यात मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्यातील एकूण २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांत भाजपाने आपले वर्चस्व प्रस्थापित करत बहुसंख्य ठिकाणी सर्वात मोठा पक्ष म्हणून आपली ताकद दाखवली आहे. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली या महत्त्वाच्या महापालिकांत भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या महायुतीने सत्ता मिळवली आहे. तर पुणे आणि पिंपरी-चिंचवड ही राष्ट्रवादीची पारंपरिक बालेकिल्ले मानली जात असतानाही भाजपाने…

Read More

,कर्मचाऱ्यांनी तीव्र निषेध करत केला परत साईमत/यावल /प्रतिनिधी : – पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य जळगाव जिल्हा व सर्व जिल्ह्यातर्फे महाराष्ट्रातील सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी व होमगार्ड यांच्या बंदोबस्तामुळे नगरपालिका व महानगरपालिका निवडणुका शांततेत पार पडल्या. परंतु शासनातर्फे देण्यात आलेला देय भत्ता स्वाभिमानी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तीव्र निषेध व्यक्त करीत परत केला. नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुका बंदोबस्तात असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासनातर्फे देण्यात आलेला देयक मान्य नाही, म्हणून मिळालेल्या देयकाला शासनास देय भत्ता स्वाभिमानी पोलिसांनी नाकारला व परत केला. इतर डिपार्टमेंटच्या अधिकारी कर्मचारी व शिपाई यांना देण्यात येणाऱ्या देयक भत्ता व पोलीस अधिकारी, कर्मचारी शिपाई यांना देण्यात आलेल्या…

Read More

 जळगावच्या विकासाला नवी गती साईमत /मुंबई/प्रतिनिधी : – जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आमदार राजूमामा भोळे यांच्या सक्षम आणि निर्णायक नेतृत्वाखाली ऐतिहासिक विजय मिळवत सर्वच्या सर्व ४६ जागांवर दणदणीत बाजी मारली आहे. या अभूतपूर्व यशानंतर आमदार भोळे यांनी आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आमदार भोळे यांचा विशेष सत्कार करत त्यांच्या नेतृत्वाचे मनापासून कौतुक केले आणि जळगावच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार पूर्ण ताकदीने उभे राहील, असा विश्वास व्यक्त केला. जळगाव महापालिकेच्या ४६ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने सुरुवातीपासूनच आक्रमक आणि नियोजनबद्ध प्रचाराची रणनीती अवलंबली होती. या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेची धुरा आमदार राजूमामा भोळे यांनी स्वतःकडे घेतली…

Read More

माहेरहून पैशांचा तगादा ठरला छळाचे कारण साईमत /पाचोरा/प्रतिनिधी : माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा सातत्याने मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या सहा जणांविरोधात फर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून हुंडाबळीच्या घटनांबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. याप्रकरणी योगिता प्रमोद पाटील (वय २७, व्यवसाय – गृहिणी, रा. स्वामी समर्थ कॉलनी, रांजनगाव, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, त्यांचा विवाह १ मे २०१४ रोजी सावळदबारा येथे हिंदू रितीरिवाजानुसार प्रमोद भरतसिंग पाटील यांच्याशी झाला होता. विवाहावेळी माहेरकडून संसारोपयोगी साहित्य, फर्निचर, भांडी, ५ ग्रॅम सोन्याची अंगठी, २ तोळे…

Read More

भाजपचा ठाम दावा, शिंदे गट उपमहापौरपदाच्या तयारीत साईमत /जळगाव/प्रतिनिधी : जळगावसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणूक निकालांनी शुक्रवारी राजकीय चित्र स्पष्ट केले. जळगाव महानगरपालिकेत महायुतीने ७५ पैकी तब्बल ६९ जागा जिंकत एकतर्फी सत्ता मिळवली असून, या निकालानंतर शहराच्या राजकारणाचे लक्ष थेट महापौरपदाकडे केंद्रित झाले आहे. विशेष म्हणजे भाजपने सर्वच्या सर्व ४६ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरण्याचा मान पटकावला आहे. त्याखालोखाल शिवसेना (शिंदे गट) २२ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर असून, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. भक्कम बहुमतामुळे महायुतीकडून पुढील महापौर कोण होणार, यावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मात्र अद्याप महापौरपदाचे आरक्षण जाहीर…

Read More

जळगावात शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांच्या वाहनावर अज्ञातांची दगडफेक; राजकीय वातावरण तापले साईमत /जळगाव/प्रतिनिधी : शहरातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापल्याचे चित्र समोर आले असून शिवसेना शिंदे गटाचे जळगाव जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्या चारचाकी वाहनावर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक करून मोठी तोडफोड केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विष्णू भंगाळे यांचे चारचाकी वाहन त्यांच्या निवासस्थानाबाहेर नेहमीप्रमाणे पार्किंगला लावण्यात आले होते. रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी या वाहनावर दगडफेक केली. या दगडफेकीत वाहनाच्या काचा फुटल्या असून बॉडीचेही नुकसान झाले आहे. सकाळी ही बाब निदर्शनास येताच परिसरात चर्चेला उधाण आले.…

Read More