Author: saimat

जळगाव महापालिकेत महायुतीची गटनेतृत्व स्थापन, विकासकामांना नवा वेग साईमत/ जळगाव /प्रतिनिधी जळगाव महानगरपालिकेत महायुतीच्या सत्तास्थापनेनंतर प्रशासकीय प्रक्रियेचा महत्त्वाचा टप्पा पार पडला असून नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात महायुतीच्या गटनेतृत्वाची अधिकृत नोंद झाली आहे. या नोंदीमुळे महापालिकेतील सत्ताकारणाला औपचारिक स्वरूप प्राप्त झाले असून आगामी कार्यकाळासाठी नेतृत्वाची दिशा स्पष्ट झाली आहे. महायुतीकडून प्रकाश बलानी यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली असून त्यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी गट महापालिकेतील कामकाज पुढे नेणार आहे. उपगटनेतेपदी नितीन बरडे यांची नियुक्ती झाली असून पक्षांतर्गत समन्वय, सभागृहातील भूमिका व निर्णय प्रक्रियेत त्यांची महत्त्वाची भूमिका राहणार आहे. तसेच, प्रतोदपदी डॉ. चंद्रशेखर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून सभागृहातील शिस्त, नियोजन आणि धोरणात्मक…

Read More

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जळगाव महापालिकेचे जाहीर आवाहन साईमत/ जळगाव /प्रतिनिधी शहरातील रस्त्यांची दुरवस्था आणि त्यावर पडलेले जीवघेणे खड्डे यामुळे होणाऱ्या अपघातांच्या वाढत्या घटनांची गंभीर दखल घेत जळगाव शहर महानगरपालिकेने नागरिकांना मोठा दिलासा देणारा निर्णय जाहीर केला आहे. उच्च न्यायालयाच्या स्पष्ट आदेशानुसार, महापालिकेच्या हद्दीतील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात होऊन नागरिक जखमी झाल्यास अथवा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास संबंधित पीडितांना रीतसर नुकसान भरपाई मिळणार आहे. मा. उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिका क्रमांक ७१/२०२३ वर १३ ऑक्टोबर २०२५ रोजी सुनावणी झाली होती. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने रस्ते सुस्थितीत ठेवणे ही स्थानिक स्वराज्य संस्थांची मूलभूत जबाबदारी असल्याचे स्पष्ट करत, रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांचे नुकसान झाल्यास त्यांना…

Read More

जळगाव तालुक्यात खळबळ, नशिराबाद पोलिसांत गुन्हा दाखल साईमत/ जळगाव /प्रतिनिधी जळगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून फूस लावून अपहरण केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. २० जानेवारी) सकाळी सुमारे ८ वाजता उघडकीस आली. या प्रकरणी रात्री ११ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबीयांसह जळगाव तालुक्यातील एका गावात वास्तव्यास आहे. मंगळवारी सकाळी घरात असताना अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवून फूस लावली आणि पळवून नेले. काही वेळातच मुलगी घरी नसल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी नातेवाईकांच्या मदतीने…

Read More

 कोल्हे हिल्स परिसरात घराला आग, ४० हजारांचे नुकसान साईमत/ जळगाव /प्रतिनिधी जळगाव शहरालगत असलेल्या कोल्हे हिल्स परिसरातील देवराम नगर येथे बुधवारी मध्यरात्री एका घराला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत घरातील संसारोपयोगी व जीवनावश्यक साहित्य मोठ्या प्रमाणावर जळून खाक झाले असून सुमारे ३५ ते ४० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र जळगाव महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने वेळीच दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी जीवितहानी टळली. देवराम नगर परिसरात राहणारे जितेंद्र गणपत लोखंडे यांच्या घराला रात्री सुमारे १२.४५ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. मध्यरात्रीची वेळ असल्याने घरातील सदस्यांना आग लागल्याचे उशिरा लक्षात आले. दरम्यान, तालुका पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल…

Read More

 १५ हजारांची लाच घेताना वनपाल व खासगी पंटर एसीबीच्या जाळ्यात साईमत/ रावेर /प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात लाचखोरीच्या घटनांना अद्याप आळा बसलेला नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. रावेर तालुक्यात निलंबनाची भीती दाखवून १५ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या वनपालासह त्याच्या खासगी पंटरला जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. या प्रकरणी वनपाल राजेंद्र अमृत सरदार आणि खासगी पंटर दीपक रघुनाथ तायडे यांच्याविरोधात रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमका प्रकार काय?तक्रारदार हे यावल वन विभागाच्या जिन्सी (ता. रावेर) वनक्षेत्रात वनरक्षक पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यक्षेत्रातील रोप वनातील निंदणीच्या कामाची तपासणी संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती.…

Read More

शिवसेनेची तडाखेबाज टीका साईमत/ जळगाव /प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली निवडणूक निर्णय अधिकारी आणि पोलीस प्रशासनाने जाहीरपणे पक्षपाती वर्तन केले, असा निषेध शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे जिल्हा संघटक गजानन मालपुरे यांनी पत्रकार परिषदेत केला. त्यांनी दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना तातडीने बडतर्फ करण्याची मागणी केली. पत्रकार परिषदेत माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता देखील उपस्थित होते. मालपुरे यांनी सांगितले की, मतमोजणी दरम्यान प्रभाग क्रमांक १० चे उमेदवार कुलभूषण पाटील आणि प्रभाग क्रमांक ८ चे उमेदवार मयूर कापसे यांनी फेरमतमोजणीसाठी अर्ज केला होता, जो अवघ्या १५ ते ३० मिनिटांत पूर्ण होऊ शकला असता. मात्र, निवडणूक निर्णय अधिकारी विनय गोसावी…

Read More

जळगावकरांसाठी धक्का: चार हातगाड्यांची भीषण आग साईमत /जळगाव /प्रतिनिधी जळगाव शहरातील शासकीय आयटीआय परिसरात सोमवारी पहाटे ३ ते ४ वाजेच्या दरम्यान भीषण अग्नीने चार ‘चायनीज’ हातगाड्यांचा ठेंगा उडवला. या आगीत हातगाड्यांवरील फर्निचर, टेबल-खुर्च्या आणि कच्चा माल पूर्णपणे जळून खाक झाला असून, या घटनेत गरिबांच्या उदरनिर्वाहाचे साधनही हिरावले गेले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आगीची तीव्रता इतकी होती की स्थानिक नागरिकांनी धूर आणि जळत असलेल्या साहित्याचे लोळ पाहताच तात्काळ महापालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले, मात्र तोपर्यंत आर्थिक नुकसान मोठे झाले होते. या आगीत चारही हातगाड्यांचा कच्चा माल, गॅस शेगड्या आणि फर्निचर जळून कोळसा झाला.…

Read More

४८० युवक-युवतींनी रंगमंचावर प्रत्यक्ष परिचय  साईमत /जळगाव/प्रतिनिधी : – महाराष्ट्र सुवर्णकार सेना जळगाव जिल्हा तर्फे आयोजित अखिल भारतीय सुवर्णकार समाजाचा १० वा ‘ऋणानुबंध’ वधू-वर-पालक परिचय मेळावा नुकताच आदित्य लॉन येथील विजय बुधाशेठ बिरारी सभागृहात उत्साहात पार पडला. या महत्त्वाच्या सामाजिक कार्यक्रमात सुमारे ४८० युवक-युवतींनी प्रत्यक्ष रंगमंचावरून आपला परिचय दिला, तर ६० ते ७० विवाह जुळण्याच्या मार्गावर असल्याची माहिती आयोजकांनी दिली. मेळाव्यासाठी महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यातून समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकूण १५०० जणांची नोंदणी झाली होती, यात ४०० वधू आणि ११०० वरांचा समावेश होता. विशेष म्हणजे, वधू-वर आणि पालकांसाठी प्रत्यक्ष संवाद व परिचयासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले होते,…

Read More

मेहरुण तलाव परिसरात निवृत्त पोलीसावर प्राणघातक हल्ला; दोन जणांविरोधात गुन्हा साईमत /जळगाव/प्रतिनिधी : – जळगाव शहरातील शांततेसाठी प्रसिद्ध मेहरुण तलाव परिसरात एका सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यावर शुक्रवारी रात्री १०:३० वाजता प्राणघातक हल्ला झाला. या धक्कादायक घटनेनंतर शनिवारी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी अनंत प्रमोद गोंडे व अनिल शंकर लागवणकर यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. फिर्यादी विजय सुकलाल जोशी (वय ६५, रा. शिवबानगर, कोल्हे हिल्स) हे पोलीस दलातून सेवानिवृत्त असून, त्यांनी माजी पोलीस म्हणून आणि जबाबदार नागरिक म्हणून दोघांना समज देण्याचा प्रयत्न केला. परंतु जोशी यांनी समज दिल्याचा राग असलेल्या आरोपींनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला. अनंत गोंडे यांनी हातातील चाकूने…

Read More

नियतीचा क्रूर घाला! अक्कलकोट दर्शनाला निघालेल्या ५ भाविकांचा भीषण अपघातात मृत्यू साईमत /सोलापूर /प्रतिनिधी : – अक्कलकोट येथे स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी निघालेल्या पनवेल येथील सहा मित्रांवर शनिवारी रात्री ११.३० वाजता काळाने क्रूर घाला घातला. पुणे-सोलापूर महामार्गावरील मोहोळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील देवडी पाटीजवळ अर्टिगा कार झाडावर आदळून कोसळली, ज्यामुळे तीन पुरुष आणि दोन महिला प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यातील पनवेल येथील सहा मित्र अक्कलकोटच्या दर्शनासाठी रवाना झाले होते. रात्रीच्या वेळी महामार्गावर प्रवास करताना कारवरून चालकाचा ताबा सुटला आणि भरधाव वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या झाडाला जोरात आदळले. धडक इतकी भयंकर होती की कार रस्त्यापासून १० ते १५ फूट दूर…

Read More