आशिर्वाद देतो’ म्हणत साधूवेशातील भामट्यांचा धक्कादायक लुटमार साईमत/ भडगाव/प्रतिनिधी भडगाव परिसरात साधूवेशातील भामट्यांचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आशिर्वाद देण्याच्या बहाण्याने स्थानिक दाम्पत्याकडील सोन्याच्या अंगठ्या लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून, तपास सुरू आहे. घटनेनुसार, वडगाव मुळाचे राजेंद्र भिकनसिंग पाटील व त्यांची पत्नी सुरेखा पाटील मोटारसायकलने आपल्या गावाकडे जात असताना भडगावच्या कोठली फाट्याजवळ साधूवेशातील दोन इसमांनी त्यांना थांबवले. पांढऱ्या रंगाच्या, नंबर प्लेट नसलेल्या मारुती स्विफ्ट कारमधून आलेल्या या इसमांनी नाशिककडे जाण्याचा रस्ता विचारण्याचा बहाणा केला. यानंतर दोघांनी “आशिर्वाद देतो” असे सांगितले आणि दाम्पत्याला १०० रुपये देऊन त्यांच्या हातातील सोन्याच्या अंगठ्या मागितल्या. क्षणिक गोंधळात आलेल्या वयस्कर…
Author: saimat
ऑटोमेटेड फिटनेस सेंटरमुळे रिक्षाचालकांचे हाल; युनियनचा इशारा साईमत/ जळगाव /प्रतिनिधी जिल्ह्यातील व्यावसायिक वाहनधारकांना मोठा आर्थिक आणि मानसिक ताण निर्माण करणाऱ्या ‘ऑटोमेटेड व्हेईकल फिटनेस टेस्टिंग सेंटर’च्या रद्दीकरणामुळे रिक्षाचालकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. या निर्णयाचा निषेध करत वीर सावरकर रिक्षा युनियनच्या वतीने आज जिल्हाधिकारी आणि प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन दिले गेले. जिल्हाध्यक्ष दिलीपभाऊ सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ प्रशासनासमोर उभे राहून त्यांनी या धोरणाच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. रिक्षाचालकांच्या मते, जळगावात फिटनेस सेंटर नसल्यामुळे आता त्यांना रिक्षा, टॅक्सी आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी नाशिक किंवा छत्रपती संभाजीनगरसारख्या शहरांत जावे लागत आहे. यामुळे इंधन, टोल, वेळ व मनोबलाचा मोठा अपव्यय होत असून, रिक्षाचालकांना आर्थिक त्रास…
चालकाने बस थेट पोलिस ठाण्यात आणून चार संशयितांना ताब्यात घेतले साईमत/ यावल /प्रतिनिधी जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ काही कमी होत नाही; गर्दीच्या फायद्याचा चोरट्यांचा प्रयत्न आता बस प्रवाशांवरही स्पष्ट दिसून येतोय. भुसावळ–यावल रस्त्यावर घडलेल्या एका धक्कादायक घटनेत भुसावळहून यावलला जात असलेल्या एसटी बसमध्ये चिखली बुद्रुक येथील २८ वर्षीय शुभांगी लोमेश सावळे यांच्या गळ्यातील तीन ग्रॅम सोन्याची पोत चोरी झाली. हा प्रकार अंजाळे जवळ उघडकीस आला. शुभांगी सावळे अंजाळे बस स्थानकावर उतरली तेव्हा पोत चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ बस चालक आणि वाहकाला माहिती दिली. चालकाने तत्काळ शहाणपणाचे प्रदर्शन करत बस थेट यावल पोलिस ठाण्यात आणली. बसमध्ये तब्बल ५० हून अधिक…
पारोळ्यातील आगीवर वेळीच नियंत्रण साईमत/पारोळा/प्रतिनिधी पारोळा शहरातील प्रभाग क्रमांक २ मध्ये आज सकाळी घडलेल्या आगीच्या घटनेत नगरसेवक पंकज मराठे यांनी दाखवलेल्या तत्परता, धाडस आणि नेतृत्वामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला. सावजी हॉटेलच्या पाठीमागील एका गोडाऊनला अचानक आग लागल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. सकाळच्या सुमारास गोडाऊनमधून धूर आणि आगीच्या ज्वाळा दिसू लागताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ नगरसेवक पंकज मराठे यांच्याशी संपर्क साधला. घटनेची माहिती मिळताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी नगरपरिषदेच्या अग्निशामक बंबाला तात्काळ पाचारण केले तसेच संबंधित प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधत आवश्यक त्या सूचना दिल्या. नगरपरिषदेचे कर्मचारी, सहकारी व स्थानिक नागरिक यांच्या…
शिक्षण व्यवस्थेतील काळा अध्याय उघड; , पाच जणांवर गुन्हा साईमत/ जळगाव /प्रतिनिधी शिक्षण क्षेत्रात पारदर्शकतेचा दावा करणाऱ्या व्यवस्थेलाच काळीमा फासणारा धक्कादायक प्रकार जळगावात उघडकीस आला आहे. बनावट कागदपत्रे तयार करून आणि तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांची खोटी स्वाक्षरी वापरून शासनाची तब्बल ६ लाख २३ हजार ९७० रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा गंभीर आरोप असून, या प्रकरणी पाच जणांविरुद्ध जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इकरा एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून अंजुमन-ए-तालिमुल मुस्लेमीन संस्थेचे उपाध्यक्ष सय्यद चाँद कासार यांचे नाव समोर आले आहे. त्यांनी आपल्या पदाचा…
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जीपीएस मित्र परिवाराच्या अत्याधुनिक फिरत्या नेत्र तपासणी ॲम्बुलन्सचे लोकार्पण साईमत/ जळगाव /प्रतिनिधी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर पाळधी येथे सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविणारा कार्यक्रम उत्साहात पार पडला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जीपीएस मित्र परिवाराच्या अत्याधुनिक फिरत्या नेत्र तपासणी ॲम्बुलन्सचे लोकार्पण तसेच पाळधी गाव व परिसरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री पाटील यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, गरजूंची सेवा करणे हेच आमचे खरे व्रत आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसेवा पोहोचलीच पाहिजे, या ध्येयाने शासन सातत्याने प्रयत्नशील…
सिमेंट पत्र्याला छिद्र पाडून आंघोळीचे व्हिडीओ; साईमत/ जळगाव /प्रतिनिधी शहरातील एमआयडीसी परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली असून, एका नराधमाने महिला व तिच्या मुलीचे आंघोळ करतानाचे व्हिडीओ मोबाईलमध्ये चित्रीत करून त्यांचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी गुरुवारी (ता. २२) सायंकाळी ६.३० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी परिसरातील एका भागात ३८ वर्षीय महिला आपल्या मुलीसह वास्तव्यास आहेत. आरोपी पुरुषोत्तम निवृत्ती कुटे (रा. केशव नगर, ता. रिसोड, जि. वाशिम) याने संबंधित इमारतीच्या सिमेंट पत्र्याला छिद्र पाडून महिला व तिची मुलगी आंघोळ करत असताना मोबाईलद्वारे व्हिडीओ चित्रीत केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या…
किरकोळ वादातून तरुणाचा निर्घृण खून साईमत/ जळगाव(आव्हाने )/प्रतिनिधी जळगाव तालुक्यातील आव्हाने गावात गुरुवारी रात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. किरकोळ वादातून चौघांनी संगनमताने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात ३२ वर्षीय सागर दिलीप बिऱ्हाडे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावासह परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून, आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी (ता. २३) नातेवाईकांसह लहुजी शक्ती ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री सागर बिऱ्हाडे यांचा काही जणांशी किरकोळ वाद झाला होता. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि चौघा आरोपींनी सागर यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवला. गंभीर जखमी अवस्थेत सागर यांना रुग्णालयात दाखल करण्यात…
भुसावळच्या तरुणीचा जागीच अंत साईमत/ जळगाव (नशिराबाद)/प्रतिनिधी– जळगावहून भुसावळकडे जाणाऱ्या भरधाव कारचा ताबा सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात भुसावळ येथील २२ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला. नशिराबादजवळील टोलनाक्याजवळ गुरुवारी (ता. २२) रात्री साडेआठच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली. या अपघातात कारमधील एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जळगावकडून भुसावळच्या दिशेने निघालेली इनोव्हा कार (क्र. एमएच १९ बीयू ७१८६) नशिराबादजवळील टोलनाक्याजवळ आली असता चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. वेगात असलेली कार महामार्गावरील दुभाजक (डिव्हायडर) तोडून थेट विरुद्ध दिशेच्या मार्गिकेत शिरली. त्याचवेळी समोरून येणाऱ्या कंटेनरला (क्र. जीजे ०१ डीएक्स ९४९७) ती जोरात धडकली. धडकेचा…
आरोपी पसार, परिसरात भीतीचे वातावरण साईमत/ जळगाव /प्रतिनिधी जळगाव तालुक्यातील आव्हाणे गावात गुरुवारी (ता. २२) रात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण तालुका हादरून गेला आहे. क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एका ३२ वर्षीय तरुणाची हत्या झाल्याची घटना जुना मारुती मंदिर परिसरात रात्री सुमारे ९ वाजेच्या सुमारास घडली. सागर अरुण बिऱ्हाडे असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे गावात भीती व हळहळीचे वातावरण पसरले आहे. प्राप्त माहितीनुसार, सागर बिऱ्हाडे आणि एका संशयित तरुणामध्ये काही कारणावरून शाब्दिक वाद झाला. पाहता पाहता या वादाचे रूपांतर जोरदार हाणामारीत झाले. संतापाच्या भरात संशयित आरोपीने सागरला जोरात ढकलले. या झटापटीत सागरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि तो…