Author: saimat

महिलांच्या गळ्यातील सोन्याची मंगळसूत्रे व पोत लांबविल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे साईमत/यावल /प्रतिनिधी यावल तालुक्यातील अट्रावल परिसरात भरलेल्या प्रसिद्ध मुंजोबा यात्रेत भाविकांची मोठी गर्दी उसळली असताना, याच गर्दीचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्याने पाच महिलांच्या गळ्यातील सोन्याची मंगळसूत्रे व पोत लांबविल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना शुक्रवार, दि. ३१ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १ ते ४ वाजेदरम्यान घडली असून, याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात्रेसाठी आलेल्या मंदाकिनी मुकेश गजरे या फिर्यादी असून, त्या आपल्या सहकारी राखी सुरवाडे, रुपाली कोळी, रोहिणी जाधव व स्वाती वराडे यांच्यासह मुंजोबा यात्रेत सहभागी झाल्या होत्या. देवदर्शन व…

Read More

 खान्देश कृषी संस्कृती व पशुप्रदर्शनाचे जळगावात दिमाखात उद्घाटन साईमत/जळगाव /प्रतिनिधी  नव्या पिढीने पारंपरिक शेतीबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहणे आवश्यक आहे. शेतीमध्ये ‘एआय’सारख्या नव्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून उत्पादनक्षमता वाढवावी, असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. खान्देशची समृद्ध कृषी परंपरा, लोकसंस्कृती आणि पशुधनाचा वारसा जपणाऱ्या ‘खान्देश कृषी संस्कृती व पशुप्रदर्शन २०२६’ या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन शिवतीर्थ मैदान, जळगाव येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले. कृषी, संस्कृती आणि ग्रामीण जीवनाचा संगम साधणारा हा महोत्सव जिल्ह्यासाठी अभिमानास्पद असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. उद्घाटनप्रसंगी आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे,…

Read More

 तक्रारींनंतर पोलिस दलात खळबळ साईमत/चोपडा/प्रतिनिधी – वाहनधारकांकडून पैसे उकळल्याच्या तक्रारीनंतर चोपडा शहरातील वाहतूक हवालदार लक्ष्मण त्र्यंबक शिंगाणे यांना निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. चोपडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळील पोलिस चौकीत कार्यरत असलेल्या हवालदार शिंगाणे याच्यावर मागील आठवड्यात शिरपूर तालुक्यातील नागेश्वर बगला गावातील एका तरुणाकडून तक्रार करण्यात आली होती. तक्रारीनुसार, गांजासंबंधी कारवाईसाठी तीन ते चार पोलिसांनी या तरुणाकडून पैसे उकळल्याचे बोलले जात होते. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी या गंभीर तक्रारीची दखल घेऊन त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले. यानुसार, चोपडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक मधुकर साळवे यांनी हवालदार शिंगाणे यांना निलंबित केले असल्याची…

Read More

 भव्य पालखी आणि महाप्रसादाने भक्तिमय वातावरण साईमत/जळगाव  /प्रतिनिधी  श्री विश्वकर्मा युवा फाउंडेशनच्या वतीने आयोजित प्रभू श्री विश्वकर्मा जयंती २०२६ उत्सव शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण करणारा ठरला. सृष्टीचे निर्माते मानल्या जाणाऱ्या प्रभू श्री विश्वकर्मा यांच्या जयंतीनिमित्त धार्मिक श्रद्धा आणि सामाजिक ऐक्याचा सुंदर संगम पाहायला मिळाला. शेकडो भाविकांनी विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांत भाग घेतला. भव्य पालखी सोहळा आणि पूजन शनिवार, ३१ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता ओंकारेश्वर मंदिर येथून प्रभू विश्वकर्मांच्या पालखीचा प्रस्थान झाला. पारंपरिक वाद्यांच्या गजरात, जयघोषात आणि भक्तिगीतांच्या स्वरांत निघालेली ही पालखी हाटनूर वसाहत हॉल आणि महाबळ येथे पोहोचली. यावेळी आमदार राजूमामा भोळे यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करताना विश्वकर्मा…

Read More

शहरात हेल्मेट वापरासंबंधी जनजागृतीसाठी भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन केले साईमत/जळगाव  /प्रतिनिधी –  जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वाहतूक शाखेने वाहतूक सुरक्षा सप्ताह 2026 च्या निमित्ताने शहरात हेल्मेट वापरासंबंधी जनजागृतीसाठी भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन केले. दुचाकी अपघातांमुळे होणाऱ्या जीवितहानीस प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांमध्ये सुरक्षिततेची जाणीव निर्माण करण्यासाठी ही रॅली राबवण्यात आली होती. रॅलीचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पोलीस मुख्यालय, जळगाव येथून हिरवी झेंडी दाखवून केले. उद्घाटन प्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपविभागीय अधिकारी नितीन गणापुरे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक पवन देसले, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर शिंपी आणि शनिपेठ पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांसह…

Read More

राज्यातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्र्येच्या शपथविधीवर ऐतिहासिक टप्पा साईमत/मुंबई/प्रतिनिधी –: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथील दुर्दैवी विमान अपघातात निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल घडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महत्त्वाचा निर्णय घेत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली आणि त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत राज्याच्या सत्तासमीकरणात नवा अध्याय सुरू केला आहे. सुनेत्रा पवार हे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत, ही ऐतिहासिक बाब मानली जात आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे निर्माण झालेल्या शोकाकुल वातावरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटाची तातडीची बैठक पार पडली. या बैठकीत दिलीप वळसे पाटील यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, ज्यास छगन भुजबळ…

Read More

वाहतूक नियम पाळा – सुरक्षित जीवन जगा’ या संदेशासह रॅली शहरातील प्रमुख चौक आणि मार्गांवरून काढण्यात आली. साईमत/मलकापूर /प्रतिनिधी –: रस्ते अपघातांमध्ये होणारी जीवितहानी रोखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने मलकापूर शहरात वाहतूक पोलिसांच्या वतीने भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. ही रॅली मलकापूर शहर पोलीस स्टेशन व वाहतूक शाखेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली. ‘वाहतूक नियम पाळा – सुरक्षित जीवन जगा’ या संदेशासह रॅली शहरातील प्रमुख चौक आणि मार्गांवरून काढण्यात आली. रॅलीदरम्यान दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करण्याचे, चारचाकी वाहनचालकांनी सीटबेल्ट लावण्याचे, मद्यपान करून वाहन न चालवण्याचे, वेगमर्यादा पाळण्याचे आणि वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळण्याचे संदेश फलकांवरून नागरिकांपर्यंत पोहोचवले…

Read More

 ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’, ‘भारत मातेचा विजय असो’, ‘हिंदू एकजुटीचा विजय असो’, ‘हिंदूंनो जागे व्हा’ आणि ‘वंदे मातरम्’ अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. साईमत/जळगाव  /प्रतिनिधी – हिंदूंवर होणारे अन्याय व अत्याचार समाजासमोर मांडणे, धर्मशिक्षणाच्या माध्यमातून हिंदूंना संघटित करणे आणि ‘हिंदू राष्ट्र स्थापने’ची पायाभरणी करण्याच्या उद्देशाने जळगाव शहरात भव्य वाहनफेरीचे आयोजन करण्यात आले. हिंदू जनजागृती समिती व समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने आयोजित हिंदू राष्ट्र-जागृती सभेच्या प्रसारासाठी काढण्यात आलेल्या या वाहनफेरीला शेकडो हिंदुत्वनिष्ठ व धर्मप्रेमी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भगवे ध्वज, भगवे फेटे व टोप्या परिधान केलेल्या कार्यकर्त्यांनी शहरातील प्रमुख मार्गांवरून वाहनफेरी काढत संपूर्ण जळगाव शहर भगवेमय केले. ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’, ‘भारत…

Read More

अवकाळी पावसाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना दिलासा साईमत/धरणगाव/प्रतिनिधी – जळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रशासनाने तात्काळ हालचाली सुरू केल्या आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे तत्काळ पूर्ण करून शासनाच्या नियमांनुसार मदत दिली जाईल, असे स्पष्ट निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या अडचणींमध्ये शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, प्रत्येक पात्र शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी धरणगाव तालुक्यातील बोरगाव बुद्रुक, गारखेडा, पष्टाने बुद्रुक तसेच जळगाव तालुक्यातील करंज, धानोरा आणि…

Read More

  भाजप ६, शिवसेना २ अर्जांसह मैदानात साईमत/जळगाव  /प्रतिनिधी –: जळगाव महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदासाठी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी राजकीय रंगरंगोटी उत्कंठेत भरली. शुक्रवारी, ३० जानेवारी रोजी, भाजपकडून प्रत्येकी ६ अर्ज तर शिवसेना शिंदे गटाकडून प्रत्येकी २ अर्ज ताब्यात घेण्यात आले. आता २ फेब्रुवारी रोजी कोण अर्ज भरणार, याकडे सर्व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने ४६ तर शिवसेना शिंदे गटाने २२ जागांवर विजय मिळविला. राष्ट्रवादी अजित पवार गट व अपक्षाचे मिळून महायुतीकडे ७० संख्याबळ असल्यामुळे महापौर पद भाजपकडे व उपमहापौर पद शिवसेनेकडे जाण्याची शक्यता निश्चित झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया गंगालेली होती.…

Read More