जळगाव जिल्ह्यासाठी ७५१.७० कोटींच्या वार्षिक आराखड्याची मंजुरी; विकास प्रकल्पांना गती साईमत/जळगाव /प्रतिनिधी – जळगाव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पुढील आर्थिक वर्ष २०२६–२७ साठी ७५१ कोटी ७० लाख रुपयांच्या जिल्हा वार्षिक प्रारूप आराखड्यास मंजुरी देण्यात आली. याच बैठकीत चालू आर्थिक वर्षातील ८३४ कोटी ६२ लाख रुपयांच्या निधीच्या खर्चाचा सविस्तर आढावा घेतला गेला. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीस जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार सुरेश भोळे, मंगेश चव्हाण, चंद्रकांत सोनवणे, अनिल पाटील, चंद्रकांत पाटील, अमोल पाटील,…
Author: saimat
विहिरीत पडलेल्या एका बकरीचे प्राण वाचवण्यात यश आले. साईमत/जळगाव /प्रतिनिधी शहरातील अग्निशमन विभागाच्या जवानांनी दाखवलेल्या तत्परता, कौशल्य आणि संवेदनशीलतेमुळे विहिरीत पडलेल्या एका बकरीचे प्राण वाचवण्यात यश आले. ही घटना रविवारी सकाळी जुने जळगाव परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरजवळ घडली असून, अग्निशमन दलाच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. रविवार, १ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास जुने जळगाव भागातील एका विहिरीत बकरी पडल्याचे निदर्शनास आले. ही बाब लक्षात येताच माजी नगरसेवक राजेश सोनवणे यांची कन्या प्रिया सोनवणे यांनी सकाळी ४:५५ वाजता जळगाव शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाशी तात्काळ संपर्क साधून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी रवाना…
गावातील बारागाड्यांच्या यात्रेच्या उत्सवात कुटुंबीय सहभागी झाले असताना ५५ वर्षीय प्रौढाने राहत्या घरी गळफास साईमत/ममुराबाद /प्रतिनिधी जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथे एक हृदयद्रावक घटना घडली असून, गावातील बारागाड्यांच्या यात्रेच्या उत्सवात कुटुंबीय सहभागी झाले असताना ५५ वर्षीय प्रौढाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (१ फेब्रुवारी) उघडकीस आली. भिकन किसन पाटील असे मृत व्यक्तीचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. ममुराबाद येथे सध्या पारंपरिक बारागाड्यांच्या यात्रेचा उत्साह सुरू आहे. रविवारी पाटील यांचे पत्नी व मुले यात्रेच्या सोहळ्यासाठी घराबाहेर गेले होते. यावेळी भिकन पाटील हे घरी एकटेच होते. कुटुंबीयांच्या अनुपस्थितीत त्यांनी घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.…
श्रीमद् भागवत कथेचे प्रभावी प्रवचन श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर, देवपूर (धुळे) येथील सुप्रसिद्ध कथा प्रवक्त्या साईमत/जळगाव /प्रतिनिधी शहरातील धार्मिक व सांस्कृतिक वातावरण अधिक सुसंस्कृत व भक्तिमय करणाऱ्या श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. श्री गणाधीश फाउंडेशन मित्र मंडळातर्फे भोईटे नगर रोडवरील गौरी प्राईड परिसरात या भव्य संगीतमय भागवत कथेचे आयोजन करण्यात आले असून, दि. १ फेब्रुवारीपासून ८ फेब्रुवारीपर्यंत दररोज दुपारी २ ते सायंकाळी ६ या वेळेत भाविकांसाठी कथा खुली ठेवण्यात आली आहे. या अध्यात्मिक ज्ञानयज्ञाचा शुभारंभ रविवार, दि. १ फेब्रुवारी रोजी भव्य ग्रंथ मिरवणूक व कलश यात्रेने करण्यात आला. परिसरातून निघालेल्या या मिरवणुकीत महिलांनी डोक्यावर कलश…
शौर्याचे पाऊल क्रांतीच्या दिशेने’ – पुणे ते दिल्ली सायकल रॅली फत्ते करत साईमत/जळगाव /प्रतिनिधी ‘शौर्याचे पाऊल क्रांतीच्या दिशेने’ हे ब्रीद घेऊन महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाच्या इतिहासात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या ‘पंतप्रधान सायकल रॅली २०२६’ मध्ये सहभागी होत जळगावच्या कन्येने देशपातळीवर आपली छाप उमटवली आहे. एनसीसी कॅडेट एस.यु.ओ. खुशबू गोसावी हिने पुणे ते नवी दिल्ली हा अत्यंत खडतर आणि आव्हानात्मक सायकल प्रवास यशस्वीपणे पूर्ण करत जळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या दैदिप्यमान यशानंतर रविवारी शहरातील शिव कॉलनी चौकात खुशबू गोसावीचे नागरिकांच्या उपस्थितीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. ढोल-ताशे, फुलांची उधळण आणि घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. या यशाबद्दल जळगाव शहराचे आमदार राजूमामा…
दीपमाला काळे महापौर, मनोज चौधरी उपमहापौर साईमत/जळगाव /प्रतिनिधी जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या महापौर व उपमहापौरपदाचा सस्पेन्स अखेर संपुष्टात आला आहे. महायुतीकडून या दोन्ही प्रतिष्ठेच्या पदांसाठी उमेदवारांची अधिकृत घोषणा करण्यात आल्याने राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे. विरोधी गटाकडून कोणतेही उमेदवार समोर न आल्यामुळे भाजपच्या दीपमाला मनोज काळे यांची महापौरपदी, तर शिंदेसेनेचे मनोज सुरेश चौधरी यांची उपमहापौरपदी निवड निश्चित मानली जात आहे. भाजपचे जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांच्या नेतृत्वाखाली नुकत्याच पार पडलेल्या जळगाव महानगरपालिका निवडणुकीत महायुतीने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले होते. भाजपने ४६ पैकी सर्व ४६ जागांवर, तर शिवसेनेने २३ पैकी २२ जागांवर विजय मिळवत विरोधकांचा अक्षरशः धुव्वा…
चिंचोल मेहून येथील प्राचीन मंदिरात चोरटे रंगेहात पकडले, तरीही गुन्हा नोंद न होण्याने संताप साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी मुक्ताईनगर तालुक्यातील चिंचोल मेहून येथील प्राचीन प्रसादेश्वर शिवमंदिरात चोरीचा गंभीर प्रयत्न उघडकीस आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. ग्रामस्थांनी चोरटे पकडले तरीही पोलीस प्रशासनाने अद्याप गुन्हा नोंदवले नसल्याचे समोर आले असून, या निष्काळजीपणामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मंदिरातील चोरीचे प्रकार यापूर्वीही वारंवार घडत आले आहेत. गेल्या एका वर्षाच्या आत दोन वेळा तांब्याचे नाग आणि पितळी घंटे चोरीस गेले होते, मात्र पोलिसांकडून मंदिराच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे परिसर कायमच असुरक्षित असल्याची भावना निर्माण झाली आहे.…
सामान्य जीवनावरील खर्च कमी, उद्योगांसाठी नवीन योजना; टियर-2 व टियर-3 शहरांच्या विकासासाठी भरभराटीची तरतूद साईमत/नवी दिल्ली/वृत्तसेवा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज, १ फेब्रुवारी २०२६ रोजी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ सादर केला. सलग नवव्या वर्षी देशाचा अर्थसंकल्प मांडताना त्यांनी ‘विकसित भारत’च्या दिशेने वाटचाल अधिक वेगाने सुरू राहील, असा आत्मविश्वास व्यक्त केला. गरिबी निर्मूलन, गुंतवणूक वाढ, रोजगार निर्मिती आणि जीएसटी प्रणाली अधिक सुलभ करणे या प्रमुख उद्दिष्टांवर सरकार भर देणार आहे, असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. अर्थसंकल्पीय भाषणात त्यांनी म्हटले की, गेल्या १२ वर्षांत देश सातत्याने प्रगती करत असून देशांतर्गत आणि परकीय गुंतवणूक लक्षणीय वाढली आहे. आर्थिक स्थैर्य राखत सामाजिक न्याय…
जळगावच्या छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात अजितदाद्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण साईमत/जळगाव /प्रतिनिधी जळगाव शहरातील छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज सर्वपक्षीय व सर्वस्तरीय श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले. राजकीय मतभेद विसरून विविध पक्षांचे नेते, प्रशासकीय अधिकारी, उद्योजक आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून नाट्यगृह परिसराला शोकाकुल वातावरणाने व्यापले. सभेत जिल्हाधिकारी रोहन घुगे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, उद्योगपती अशोक जैन, केड्राई महाराष्ट्राचे राज्य उपाध्यक्ष अनिश भाई शहा, आमदार अनिलदादा पाटील, आमदार राजू मामा भोळे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच करीम सालार, संजय पवार, विष्णू भंगाळे, व्ही. डी. पाटील, पणन महासंघाचे रोहित निकम यांच्यासह…
महिलांच्या गळ्यातील सोन्याची मंगळसूत्रे व पोत लांबविल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे साईमत/यावल /प्रतिनिधी यावल तालुक्यातील अट्रावल परिसरात भरलेल्या प्रसिद्ध मुंजोबा यात्रेत भाविकांची मोठी गर्दी उसळली असताना, याच गर्दीचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्याने पाच महिलांच्या गळ्यातील सोन्याची मंगळसूत्रे व पोत लांबविल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना शुक्रवार, दि. ३१ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १ ते ४ वाजेदरम्यान घडली असून, याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात्रेसाठी आलेल्या मंदाकिनी मुकेश गजरे या फिर्यादी असून, त्या आपल्या सहकारी राखी सुरवाडे, रुपाली कोळी, रोहिणी जाधव व स्वाती वराडे यांच्यासह मुंजोबा यात्रेत सहभागी झाल्या होत्या. देवदर्शन व…