टायगर स्कूलमध्ये विविध गीत,नाटिका,नृत्य, स्पर्धांनी बालदिन साजरा साईमत/पारोळा /प्रतिनिधी : येथील टायगर इंटरनॅशनल स्कूलमध्ये बालदिन सांस्कृतिक नाटिका,नृत्य,विविध स्पर्धांनी उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष दिनाचे प्रमुख आकर्षण ठरले ते हळूहळू लोप पावत चाललेल्या पत्रलेखन या कला प्रकाराची विद्यार्थ्यांना दिली गेलेली ओळख आणि प्रत्यक्ष सराव. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पत्रप्रेमी व आदर्श शिक्षक स.ध.भावसार,सब पोस्ट मास्टर उमेश रहण तसेच धुळे टायगर किड्स स्कूलचे संचालक भरत पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मार्गदर्शनात भावसार यांनी आपल्या आयुष्यात लिहिलेल्या तब्बल ५१ हजार पत्रांच्या अनुभवाचा उल्लेख करत पत्रलेखनामुळे लेखन कौशल्य, अभिव्यक्तीशक्ती आणि संवाद कौशल्य अधिक प्रभावी बनते, यावर प्रकाश टाकत पत्रांचे विविध प्रकार, त्यांची रचना,…
Author: saimat
सार्वजनिक बांधकाम विभागाचे झोपेचे सोंग; नागरिकांचा आरोप साईमत/पहूर, ता.जामनेर /प्रतिनिधी : पहूर-शेंदुर्णी मार्गावरील पाण्याच्या टाकीजवळ अवघ्या वर्षभरातच मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक असलेल्या या मार्गावर खड्ड्यांमुळे वाहनचालकांची तारेवरची कसरत होत असून अपघाताचा धोका वाढला आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामात निकृष्ट दर्जाचा वापर झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. “वर्षभरही न टिकणारा रस्ता म्हणजे जनतेच्या पैशांचा सरळसरळ अपव्यय”, असा संताप वाहनचालकांनी व्यक्त केला. खड्डे बुजवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीच ठोस कारवाई न केल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. स्थानिकांचा आरोप आहे की, विभाग तात्पुरती डांबरफेक करून वेळकाढूपणा करत आहे. त्यामुळे खड्डे काही दिवसांनी…
विद्यार्थ्यांनी विविध मॉडेल, देखावा, कलागुणांचे केले सादरीकरण साईमत/पारोळा /प्रतिनिधी : येथील एकमेव सीबीएसई बोहरा सेंट्रल स्कूलमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू जयंती व बालदिनानिमित्त शाळेचे वार्षिक विज्ञान व कला प्रदर्शन तसेच लहान चिमुकल्यांसाठी आयोजित बालमेला उत्साहात पार पडला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थाध्यक्ष सुरेंद्र बोहरा, सचिव प्रकाश बोहरा, डायरेक्टर गौरव बोहरा, प्राचार्या शोभा सोनी, ॲडमिनिस्ट्रेटर विरेंद्र सखा यांच्यासह उद्योजक गोपाल अग्रवाल, सीए मुकेश चोरडिया, भगवान गंभीर पाटील, डॉ.दिपाली शेंडे, मनिषा सोनवणे, पीटीए मेंबर डॉ.योगेंद्र पवार, सुप्रिया बिऱ्हाडे, नितेश निकम, शुभांगी राजपूत आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्याहस्ते पंडित नेहरू, देवी सरस्वतींच्या प्रतिमेस पुष्पहार, पूजन, दीपप्रज्वलन करून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. प्रदर्शनामध्ये नर्सरी…
मानसिक विवंचनेतून पाचोरा तालुक्यातील नाचनखेडा येथील ३७ वर्षीय तरुणाने विषारी औषध सेवन केले साईमत/जळगाव/प्रतिनिधी : पत्नी माहेरी गेल्यानंतर निर्माण झालेल्या मानसिक विवंचनेतून पाचोरा तालुक्यातील नाचनखेडा येथील ३७ वर्षीय तरुणाने विषारी औषध सेवन केले. उपचार सुरू असताना शुक्रवारी १४ नोव्हेंबर रोजी सकाळी त्याचा मृत्यू झाला. याबाबत जळगाव जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. समाधान संतोष पाटील (वय ३७, रा.नाचनखेडा) असे मयत तरुणाचे नाव आहे.नाचनखेडा येथे पत्नी, दोन मुले आणि आई-वडिलांसह वास्तव्यास असलेले समाधान पाटील हे प्लंबरचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी त्यांची पत्नी लहान मुलीला घेऊन माहेरी गेली होती आणि ती परत…
भिमटेकडी, छत्रपती संभाजीनगर येथे होणार ऐतिहासिक सोहळा; २५ देशांतील भिक्खु संघ व एक लाख उपासक सहभागी साईमत/मलकापूर /प्रतिनिधी : छत्रपती संभाजीनगर येथील भिमटेकडी परिसर पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर तेजाने उजळणार आहे. सुमारे ७० वर्षांनंतर येथे प्रथमच ‘जागतिक बौद्ध धम्म परिषद’ भव्य आणि ऐतिहासिक पद्धतीने आयोजित करण्यात आली असून २६, २७, २८ फेब्रुवारी ते १ व २ मार्च २०२६ या पाच दिवसांच्या कालावधीत हा सोहळा पार पडणार आहे. परिषदेतील सहभागी देशांची संख्या तब्बल २५ असून, विविध देशांतील तसेच महाराष्ट्रातील भिक्खु व भिक्खुनी संघ मोठ्या संख्येने दाखल होणार आहेत. त्याचबरोबर एक लाखांहून अधिक उपासक-उपासिका या भव्य सोहळ्यात सहभागी होणार असल्याने छत्रपती संभाजीनगर…
पाचोरा पोलिसांची कारवाई; ४१,५०० किमतीचा मुद्देमाल जप्त साईमत/पाचोरा/प्रतिनिधी : तालुक्यातील भातखंडे खुर्द येथे झालेल्या घरफोडी प्रकरणात पाचोरा पोलिसांनी केवळ चार तासांत आरोपीला जेरबंद करत चोरीस गेलेला ४१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले आहे. या जलदगती कारवाईबद्दल पोलिस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे. जळगाव जिल्ह्यातील चोरी, घरफोडीच्या वाढत्या घटनांवर आळा घालण्यासाठी व आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पाचोरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने ही कारवाई केली. फिर्यादी सोपान भिकन कुमावत (वय ५१, रा. भातखंडे खुर्द, ता. पाचोरा) हे दि.१० नोव्हेंबर रोजी लग्नानिमित्त बाहेरगावी गेले…
अमळनेर पोलिसांची धडक कारवाई; २४ दुचाकींसह १५ लाखांचा मुद्देमाल जप्त साईमत/अमळनेर /प्रतिनिधी : अमळनेर शहरासह परिसरात वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांचा छडा लावत पोलिसांनी दोन आरोपींना जेरबंद केले असून, त्यांच्या ताब्यातून तब्बल २४ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त वाहनांची एकूण किंमत सुमारे १५ लाख ६३ हजार रुपये असून, या यशस्वी कारवाईने अमळनेर पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक कविता नेरकर (चाळीसगाव विभाग) आणि उपविभागीय पोलिस अधिकारी विनायकराव कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. अमळनेर पोलिस स्टेशन गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज, पोकॉ प्रशांत पाटील,…
माणुसकी समुहाच्या प्रयत्नांमुळे हरवलेल्या युवतीचे नातेवाईक सापडले; परंतु मुलीने घरी जाण्यास दिला नकार साईमत/पाळधी (ता.जामनेर) /प्रतिनिधी : येथील २२ वर्षीय पूजा निलेश खुर्पे ही युवती घरातून न सांगता बाहेर पडल्याने कुटुंबीयांची झोप उडाली होती. तिचा शोध सुरु असतानाच ती सिल्लोड शहरातील शिक्षक कॉलनी परिसरात बेवारस अवस्थेत आढळली. रात्रीच्या वेळी एकटी फिरत असल्याचे लक्षात येताच सिल्लोड शहर पोलिसांनी तिच्या सुरक्षेच्या दृष्टीने तात्काळ तिला ताब्यात घेतले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेशराव उदार यांनी तिच्या ओळखीबाबत चौकशी केली असता, ती योग्य पत्ता सांगू शकत नव्हती. त्यामुळे त्यांनी सु-लक्ष्मी सेवाभावी संस्थेचे सुमित पंडित यांच्यामार्फत तिला माणुसकी वृद्ध सेवालय (जटवाडा रोड, सिल्लोड) येथे पुनर्वसनासाठी दाखल केले.…
शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर वृत्तपत्र पत्रकार बहुउद्देशीय संस्थेतर्फे तहसीलदारांना निवेदन साईमत/लोहारा, ता.पाचोरा -/प्रतिनिधी : – लोहारा परिसरातील लोहारा, म्हसास,कासमपुरा ,कळमसरा, कुऱ्हाड शिवारातील शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केल्याप्रमाणे अतिवृष्टी अनुदानाची रक्कम अत्यंत कमी प्रमाणात मिळाली तर अनेक शेतकऱ्यांना अद्यापही अनुदानाची रक्कम मिळाली नाही. याबाबत शेतकऱ्यांनी पत्रकारांजवळ नाराजी बोलून दाखवल्याने लोहारा शहर वृत्तपत्र पत्रकार बहुउद्देशीय संस्थेने तहसीलदार पाचोरा यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे बागायती शेती प्रमाणे अनुदान देण्यात यावे,अशा मागणीचे निवेदन दिले. परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर शेततळे विहीर ठिबक व बोअर ची नोंद असताना बागायती शेती असून सुद्धा कोरडवाहू अनुदान मिळाले आहे. तरी शेजारील चाळीसगाव तालुक्यात बहुसंख्य शेतकऱ्यांना बागायती प्रमाणे अनुदान रक्कम मिळाली आहे. हे चुकीचे असून…
कृषी उत्पन्न बाजार समिती यावल कार्यक्षेत्रात गेल्या महिन्यापासून केळी व्यापारी मातीमोल दरात साईमत/यावल/प्रतिनिधी : कृषी उत्पन्न बाजार समिती यावल कार्यक्षेत्रात गेल्या महिन्यापासून केळी व्यापारी मातीमोल दरात केळीची खरेदी करीत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांमधून आल्याने काही दिवसांपूर्वीच जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे यांनी व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.त्याच पाश्वभूमिवर यावल कृषी उत्पन्न बाजार समितीने केळी व्यापाऱ्यांना दप्तर तपासणीच्या नोटीसा काढल्याची माहिती सभापती राकेश फेगडे यांनी दिली. काही दिवसांपूर्वीच जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था, जळगाव यांनी यावल येथे केळी भावाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी व्यापारी,शेतकरी व बाजार समिती यांची सामायिक सभा घेतली होती. त्यात त्यांनी व्यापाऱ्यांची दप्तर तपासणी करण्यात यावी व दोषी आढळून येणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई…