Author: saimat

‘पॅथॉलॉजी’ वैद्यकीय शास्त्रात मास्टर डिग्री मिळवीत सुवर्ण अक्षरांनी कोरले नाव! साईमत/ यावल -/प्रतिनिधी :  जळगाव जिल्ह्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या डोंगर कठोरा या गावातील कन्या कुमारी डॉ. मेत्ता मिलींद ढाले यांनी वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत ‘पॅथॉलॉजी’ या वैद्यकीय शास्त्रात मास्टर डिग्री मिळवून आपले नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले आहे. त्यांच्या या यशामुळे त्यांच्यावर डोंगर कठोरासह संपूर्ण यावल तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. डॉ. मेत्ता या प्रतिष्ठित सिताराम सुका तायडे यांचे नात असून, आयुर्वेदाचार्य पितांबर सिताराम तायडे आणि डॉ. डिगंबर सिताराम तायडे यांच्या नात, तसेच डॉ. अनिता (तायडे) ढाले आणि मिलींद ढाले यांच्या कन्या आहेत. डावणगेरे येथील जेजेएम मेडिकल कॉलेजमध्ये त्यांनी पॅथॉलॉजी…

Read More

धुळे-चाळीसगाव राष्ट्रीय महामार्गावर भोरस गावाजवळ मंगळवारी दुपारी अपघातात साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी :   ट्रक-मोटारसायकलमध्ये झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना धुळे-चाळीसगाव राष्ट्रीय महामार्गावर भोरस गावाजवळ मंगळवारी दुपारी घडली. भागवत पाटील (रा.पिराचे बोरखेडा) असे अपघातातील मयत तरुणाचे नाव आहे. दुपारी साधारण १ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला असून, ट्रक क्र.(एच.आर.७४ बीओ ४५०) ने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. धडकेनंतर मोटारसायकल ट्रकच्या पुढील भागात अडकून अक्षरशः चिरडली गेली. अपघात इतका भीषण होता की भागवत पाटील यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेनंतर काही वेळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. स्थानिक नागरिकांनी तत्काळ चाळीसगाव ग्रामीण पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्याचे…

Read More

जनगणना हे राष्ट्रीय कार्य – नागरिकांनी सहकार्य करावे : जिल्हाधिकारी रोहन घुगे साईमत/अडावद, ता.चोपडा -/प्रतिनिधी :   चोपडा तालुक्यात प्रायोगिक स्वरूपात सुरू असलेल्या जनगणना कार्याचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी मंगळवारी सायंकाळी अडावद गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी जनगणनेचे काम पाहणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधून कामातील अडचणी जाणून घेतल्या व आवश्यक मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी श्री.घुगे यांनी यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना सांगितले की, जनगणना हे राष्ट्रीय कार्य असून सर्व नागरिकांनी यात सक्रिय सहभाग घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच त्यांनी स्पष्ट केले की, ही जनगणना जातीनिहाय नसून केवळ लोकसंख्येची जनगणना आहे. हे प्रायोगिक कार्य यशस्वी ठरल्यास पुढील काळात याची अंमलबजावणी केवळ…

Read More

जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता साईमत/अमळनेर/जळगाव//प्रतिनिधी :   अमळनेर तालुक्यातील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंत्यास चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहाथ अटक केली. ही कारवाई नंदुरबार आणि जळगाव विभागाच्या लाचलुचपत विभागाने बुधवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास केली. दिलीप पाटील असे लाचखोर अभियंत्याचे नाव आहे. जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता दिलीप पाटील यांच्याकडे धरणगाव ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचा देखील पदभार होता. तेथील एका प्रकरणात मंजुरीसाठी दिलीप पाटील याने चार हजार रुपयांची लाच मागितली. मात्र, तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने त्याने लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. तक्रारीनंतर एलसीबीने सापळा रचत अभियंता दिलीप पाटील याला तक्रारदाराकडून लाच स्विकारताना रंगेहाथ अटक…

Read More

परिसरात पंचायत समिती निवडणुकीसाठी राजकीय तयारी जोरात सुरू आहे. साईमत/ यावल/प्रतिनिधी :  तालुक्यातील दहिगाव गण मतदारसंघातून यावल पंचायत समितीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सौ.यशश्री देवकांत पाटील यांची उमेदवारी ठरल्याची माहिती समोर आली आहे. दहिगाव गण हा महिला सर्वसाधारण आरक्षण असलेला मतदारसंघ असून परिसरात पंचायत समिती निवडणुकीसाठी राजकीय तयारी जोरात सुरू आहे. यशश्री देवकांत पाटील या छत्रपती शिवाजी महाराज फाउंडेशनच्या सचिव आणि यावल तालुका संजय गांधी निराधार योजना समितीच्या सदस्या आहेत. त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य, कला, क्रीडा आणि महिला सबलीकरण अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. फाउंडेशनच्या माध्यमातून समाजहिताचे उपक्रम राबवले असून, निराधार समितीच्या माध्यमातून गरीब, विधवा, अनाथ, ज्येष्ठ नागरिक व…

Read More

परिसरातील नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. साईमत/फैजपूर /प्रतिनिधी :  येथील सामाजिक कार्यकर्ते सिद्धेश्वर वाघुळदे यांनी खंडोबा वाडी, आशिष सराफ नगर आणि लक्ष्मी नगरमध्ये स्वखर्चाने गटारी स्वच्छ करण्याचा पुढाकार घेतला. त्यांनी जेसीबीच्या माध्यमातून गटारीत अडलेल्या सिमेंटच्या पाईप्स काढून गटारी मोकळ्या केल्या. गटारी स्वच्छ करण्यासाठी पालिकेचे कर्मचारी देखील उपस्थित होते. सर्वांच्या समक्ष नागरिकांच्या सोयीसाठी गटारी सफाईचे काम सुरू करण्यात आले, ज्यामुळे परिसरातील नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. शहरातील खंडोबा वाडी, आशिष सराफ नगर आणि लक्ष्मी नगरच्या बाजुंच्या गटारींमध्ये अनेक दिवसांपासून साचलेली घाण नागरिकांसाठी त्रासदायक ठरत होती. गटारीत थांबलेले पाणी, डबके आणि मच्छर यामुळे परिसरात रोगराईच्या भीतीने वातावरण गंभीर झाले होते.…

Read More

कोळी समाजाच्या परंपरागत शिस्तबद्ध आयोजनात युवक, महिला आणि लहान मुले सहभागी साईमत/फैजपूर/प्रतिनिधी :   शहरातील आठवडे बाजार श्रीरामपेठ परिसरातील वाल्मिक नगरमध्ये रामायणाचे रचयिता, आद्यकवी महर्षी वाल्मिक यांच्या जयंतीनिमित्त रविवारी दि.१२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी उत्साह, श्रद्धा आणि भक्तीमय वातावरणात भव्य मिरवणूक काढण्यात आली. आ.अमोल जावळे यांच्याहस्ते महर्षी वाल्मिक यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमास विविध मान्यवर, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी तसेच शेकडो नागरिक उपस्थित होते. वाल्मिक नगरात संध्याकाळी वाल्मिक मूर्तीची आकर्षक सजावट करण्यात आली होती. सुवासिक फुलांच्या माळांनी आणि रंगीबेरंगी विद्युत रोषणाईने परिसर उजळून निघाला होता. सजवलेल्या ट्रॅक्टरवर महर्षी वाल्मिक यांची भव्य मूर्ती विराजमान करून मूर्ती पूजनानंतर आरती करण्यात आली. भाविकांच्या जयघोषात…

Read More

छाजेड ऑईल मिलजवळ पोलीस कारवाई; भारतीय हत्यार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी : शहरातील छाजेड ऑईल मिलच्या पाठीमागे पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने रविवारी पहाटे १९ वर्षीय तरुण मयुर राजु मोरे याला गावठी बनावटीचे पिस्तुल व दोन जिवंत राऊंडसह रंगेहात पकडण्यात यश मिळवले. ही कारवाई पोलिस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस शिपाई रविंद्र निंबा बच्छे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. ११ ऑक्टोबर रोजी रात्री ११.२५ वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक मनेळ, उपनिरीक्षक गणेश सायकर तसेच पोलीस कर्मचारी निलेश पाटील, ज्ञानेश्वर पाटोळ, नरेंद्र चौधरी, कल्पेश पगारे, केतन सुर्यवंशी, राकेश महाजन आणि पंचांच्या उपस्थितीत कोबींग ऑपरेशनसाठी रवाना झाले…

Read More

दोन आस्थापनांवर ५ हजारांचा दंड ; व्यापाऱ्यांना स्वच्छतेचे आवाहन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील गोलाणी मार्केट परिसरात रविवारी, १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता महानगरपालिकेच्यावतीने भव्य स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मोहिमेदरम्यान सुमारे ८ ते १० टन कचरा संकलित केला आहे. अस्वच्छता आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दोन आस्थापनांवर प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. मनपाच्या स्वच्छता विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहराच्या मध्यवर्ती भागातील व्यापारी संकुल असल्याने येथे विशेष स्वच्छता मोहीम राबविण्याचे नियोजन केले होते. मोहिमेसाठी २५ ते ३० कर्मचाऱ्यांची टीम तैनात केली होती तर कचरा उचलण्यासाठी १३ वाहने वापरण्यात आली. मोहिमेदरम्यान मार्केट परिसरातील जुना, साचलेला आणि दुर्गंधीयुक्त कचरा उचलण्यात आला, ज्यामुळे परिसरातील अस्वच्छतेची…

Read More

भोकरीतील पुरात मृत व्यक्तीच्या कुटुंबाला मिळाले शासनाकडून ४ लाख रुपये साईमत/पाचोरा/प्रतिनिधी : नैसर्गिक आपत्तीमध्ये जीव गमावलेल्या नागरिकांच्या वारसांना तात्काळ दिलासा देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. पाचोरा–भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते, पुराच्या पाण्यात मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला शासनाकडून मंजूर झालेली चार लाख रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली. माहे सप्टेंबरमध्ये आलेल्या पुराच्या पाण्यात भोकरी (ता. पाचोरा) येथील सतीष मोहन चौधरी (वय ४०) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेने चौधरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. शासनाच्या आपत्ती मदत निधीमधून त्यांच्या वारस चंदाबाई सतीष चौधरी यांना चार लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. शासन…

Read More