फिल्मी स्टाईलने पळालेल्या दोन कुख्यात चोरट्यांना अटक करण्यात आले साईमत/अमळनेर/प्रतिनिधी : अमळनेर शहरासह परिसरातून २४ मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या व पोलिसांच्या तावडीतून फिल्मी स्टाईलने पळालेल्या दोन कुख्यात चोरट्यांना अखेर तीन दिवसांच्या अथक शोधमोहिमेनंतर अटक करण्यात अमळनेर पोलिसांना यश मिळाले आहे. हिम्मत रेहंज्या पावरा (३२) आणि अबीलाल उर्फ अंबादास बुरड्या खरडे (२७, रा. सातपिंप्री, ता. शहादा, जि. नंदुरबार) या दोघांना काही दिवसांपूर्वी मोटारसायकल चोरी प्रकरणी अटक करण्यात आली होती. पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने त्यांना २८ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती, परंतु जळगाव कारागृहात जागा नसल्याने त्यांना नंदुरबार कारागृहात हलविण्याचे आदेश देण्यात आले होते. नंदुरबारकडे नेत असताना अंबादासने अचानक तब्येत…
Author: saimat
चोपडा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हे ऑपरेशन पहाटे साईमत/धरणगाव /प्रतिनिधी : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका शांततेत व कोणताही अनुशासनभंग न होता पार पाडाव्यात यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून धरणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पहाटे कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. चोपडा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हे ऑपरेशन पहाटे ४.३० ते ६.३० या वेळेत पार पडले. या कारवाईत चार पोलीस अधिकारी आणि सोळा अंमलदार सहभागी झाले होते. ऑपरेशनदरम्यान धरणगाव पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील हिस्ट्रीशिटर, दोन किंवा अधिक गुन्ह्यांमध्ये नोंद असलेले आरोपी तसेच घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी संशयितांच्या घरांची अचानक तपासणी करण्यात आली.तपासणीदरम्यान करतारसिंग गुरुमुखसिंग जुन्नी हा तडीपार आरोपी आढळून…
समाज उपद्रवी समाजकंटकांना मोठा दणका साईमत/यावल/प्रतिनिधी : पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या आदेशान्वये यावल तालुक्यातील फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या कार्यक्षेत्रात यावल पोलीस स्टेशन अंतर्गत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांच्यासह संपूर्ण पोलीस दलाने शुक्रवार दि.२१ नोव्हेंबर रोजी सकाळी ४ वाजता अचानक कोंबिंग ऑपरेशन राबविले. यात समाज उपद्रवी समाजकंटक अशा संशयित आरोपी, नागरिकांविरुद्ध यशस्वीरित्या कारवाई करण्यात आल्याने संपूर्ण तालुक्यात गुन्हेगारी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. फैजपूर उपविभाग डीवायएसपी अनिल बडगुजर यांनी व पोलीस दलाने केलेल्या कारवाईनुसार प्रसिद्धी पत्रकानुसार पोलिसांना पाहिजे असलेला १ आरोपी, एनबीडब्ल्यूचे १० आरोपी, बीडब्ल्यू ६, समन्स बजावणी १४ , हिस्ट्रीसीटर ५ जणांची तपासणी, २…
सुवर्णकार समाज व राजमुद्रा ग्रुपतर्फे निषेध करण्यात येऊन नराधमास फाशीची शिक्षा द्यावी साईमत/फैजपूर/प्रतिनिधी : – मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील तीन वर्षीय बालिकेवर एका नराधमाने अमानुष अत्याचर करून तिचा निर्घृण खून केल्याच्या घटनेचा सुवर्णकार समाज व राजमुद्रा ग्रुपतर्फे निषेध करण्यात येऊन नराधमास फाशीची शिक्षा द्यावी, अशा मागणीचे निवेदन फैजपूर प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले. काही दिवसापूर्वी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील रहिवासी कु.यज्ञा जगदीश दुसाने (वय 3) या निष्पाप निरागस बालिकेवर एका नराधमाने अमानुष् अत्याचार करून अतिशय निर्घृणपणे हत्या केली. या राक्षसी कृत्याचा फैजपूर शहरातील सुवर्णकार समाज व राजमुद्रा ग्रुपतर्फे जाहीर निषेध करण्यात आला. प्रशासनाने लवकरात लवकर या प्रकरणाचा शोध लावून या नराधमाला फाशीची…
एरंडोल-पारोळा मार्गावरील रघुवीर समर्थक बैठक हॉलसमोर भीषण धडक साईमत/एरंडोल/प्रतिनिधी : मॉर्निंग वॉक करत असताना मागून येणाऱ्या डंपरने दिलेल्या जबर धडकेत धरणगाव तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना एरंडोल-पारोळा रस्त्यावर रघुवीर समर्थक बैठक हॉलसमोर गुरुवार दि.२० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. शिवाजी रघुनाथ महाजन (वय ४२, रा. पारोळा, ह.मु. अष्टविनायक कॉलनी, एरंडोल) असे मयत झालेल्या इसमाचे नाव आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिवाजी महाजन हे एरंडोल-पारोळा मार्गावरील रघुवीर समर्थक बैठक हॉलसमोर मॉर्निंग वॉक करत असताना मागून भरधाव वेगाने आलेल्या डंपर क्र.(एच.आर.३८ ए.डी. ४१३६)ने त्यांना मागून जोराची धडक दिली. या भीषण धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच…
घरफोडी करून तब्बल १३१ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. साईमत/सावदा, ता. रावेर/प्रतिनिधी : घर बंद असल्याची संधी साधत रावेर तालुक्यातील चिनावल येथे चोरट्यांनी घरफोडी करून तब्बल १३१ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. निवृत्त शिक्षक राजेंद्र मुरलीधर सरोदे यांचे घर फोडून हा सर्व मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली.तुकाराम वाडीतील रहिवासी राजेंद्र सरोदे हे भावाच्या निधनानंतर मूळ गावी खडका येथे गेले होते. विधीनंतर १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता ते चिनावलला परतले असता घराचा लोखंडी दरवाजा उघडा व मुख्य लाकडी दरवाज्याची कडी तुटलेली दिसली. याबाबत त्वरित सावदा पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी…
जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी सांस्कृतिक उपक्रम साईमत/पारोळा/प्रतिनिधी : येथील बोहरा सेंट्रल स्कूल मध्ये क्रांतिवीर बिरसा मुंडा यांची जयंती व जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी सांस्कृतिक उपक्रमांतून जागरूकता सप्ताह साजरा करण्यात आला. संस्थेचे चेअरमन सुरेंद्र बोहरा, प्राचार्या शोभा सोनी, ॲडमिनिस्ट्रेटर वीरेंद्र सखा व शिक्षकांनी आदिवासी स्वातंत्र्य सेनानी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण, पूजनाने मानवंदना दिली.आदिवासी दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी आदिवासी संस्कृती, सण,कला कौशल्य व वारली पेंटिंग,आदिवासी नृत्य इत्यादी सर्व बाबींची माहिती गोळा करून त्या मंचावर सादर केल्या.वर्ग सहावीच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी संस्कृतीचा गोडवा, भाषा,त्यांचे दैनंदिन जीवन,निसर्गाशी असलेले प्रेम व नृत्यातून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविले.महिला शिक्षकांनी ही आदिवासी नृत्यात सहभाग दर्शवून कार्यक्रमाची रंगत वाढविली.
प्राथमिक व माध्यमिक शाळेत बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. साईमत/जामनेर/प्रतिनिधी : म्हसावद येथील ज्ञानोदय शिक्षण प्रसारक मंडळ संचालित प्राथमिक व माध्यमिक शाळेत बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमास प्रमुख म्हणून संस्थेचे चेअरमन पंकजराव साळुंखे उपस्थित होते. यावेळी पंकजराव साळुंखे व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका तथा संचालिका दिपाली पाटील यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करून कार्यक्रमची शोभा द्विगुणीत केली. यावेळी सुनील तापीराम बारेला यांनी विद्यार्थ्यांना बिरसा मुंडा यांच्याबद्दल अधिक माहिती विषद करून त्यांचे कार्य विद्यार्थ्यांसमोर मांडले. कार्यक्रमप्रसंगी शाळेतील शिक्षक, शिक्षिका व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. उपक्रमशील शिक्षक एन.डी.चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.
जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई साईमत/मलकापूर /प्रतिनिधी : जिल्ह्यात बेकायदेशीर बायोडिझेल वाहतूक करणाऱ्या रॅकेटवर जिल्हा प्रशासनाने मोठी धडक कारवाई करत तब्बल २९,०३० किलो बायोडिझेल जप्त केले असून याप्रकरणी टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या ऑपरेशनमुळे अवैध इंधन व्यापार करणाऱ्या टोळ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. वडनेर-मलकापूर रोडवर संशयास्पद अवस्थेत उभा असलेला (जी.जे.०३- डब्ल्यू.बी.३०३८) क्रमांकाचा टँकर प्रशासनाच्या नजरेस पडला. माहिती मिळताच तपास पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तपासणीदरम्यान टँकरमध्ये मोठ्या प्रमाणात बायोडिझेल आढळून आल्यानंतर जप्तीची कारवाई करण्यात आली. प्रशासनाने जप्त केलेल्या २९,०३० किलो बायोडिझेलची एकूण किंमत ३३ लाख ३३…
दोन-अडीच वर्षांपासून रस्ता दुरुस्ती ठप्प; काम कागदोपत्री, नागरिक मात्र त्रस्त साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी : तालुक्यात मंजूर झालेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामांची प्रत्यक्षात कोणतीही प्रगती न दिसता ती फक्त कागदोपत्री दाखवली जात असल्याचे धक्कादायक चित्र उघडकीस आले आहे. तालुक्यातील अनेक भागांत विकासकामांची नुसतीच घोषणा केली गेली, परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी मात्र होत नसल्याचे चित्र आता अधोरेखित झाले आहे. रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था असून, नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सन २०२३-२४ मध्ये सार्वजनिक बांधकाम उत्तर विभाग, जळगाव अंतर्गत मुक्ताईनगर तालुक्यातील विविध रस्त्यांच्या दुरुस्तीकरिता तब्बल १५० लाख रुपये (दीड कोटी) निधी विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला होता. या कामाचे भूमिपूजनही आमदार…