Author: saimat

एडवंटा कंपनीच्या वतीने पार पडला. साईमत/जामनेर /प्रतिनिधी  तालुक्यातील नाचनखेडा कार्यक्षेत्रातील भीलखेडा येथे पशुवैद्यकीय दवाखाना, श्रेणी २, दूध संस्था चालक व पशुपालकांसाठी “चारा लावा, पशुधन वाढवा” कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम एडवंटा कंपनीच्या वतीने पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रगतिशील शेतकरी श्री सुधाकर पाटील (भीलखेडा) आणि श्री प्रकाश पाटील (दोंदवाडे) यांच्या हस्ते गीरगायींचे गो पूजन करून करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विठुरायांच्या प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनही झाले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तथा नाचनखेडा येथील सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉ.संदीप पाटील यांनी शेतकऱ्यांना चारा लागवड करून पशुधन वाढवण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी “चाऱ्याची लागवड करा व पशुधन वाढवा” या घोषवाक्यानुसार प्रशिक्षण दिले.…

Read More

भडगावमध्ये वाळू माफियांचा उन्माद ; जेसीबी, दोन डंपर, एक ट्रॅक्टरसह ३७ लाखांचा मुद्देमाल जप्त साईमत/भडगाव/ प्रतिनिधी तालुक्यातील गिरड परिसरातील गिरणा नदीच्या पात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर कारवाई करताना वाळू माफियांनी थेट महसूल व पोलिस प्रशासनालाच लक्ष्य केले. मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या कारवाईदरम्यान महसूल अधिकारी व पोलिसांना शिवीगाळ व धमक्या दिल्या गेल्या. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात रितेश पाटील उर्फ आबा (रा.पाचोरा) यांच्यासह २० ते २५ अज्ञात वाळू माफियांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भडगाव तहसीलदार यांच्या आदेशानुसार गिरणा नदीपात्रात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी महसूल पथक तैनात करण्यात आले होते. दि.३० डिसेंबर रोजी रात्री १०.४२ वाजेच्या सुमारास गिरड-मांडकी…

Read More

बाजार समिती शेतकऱ्यांसाठी की व्यापाऱ्यांच्या संरक्षणासाठी?; निलेश नारखेडे यांचा संतप्त सवाल साईमत/मलकापूर /प्रतिनिधी शेतकऱ्याची तूर बाजारात उतरते तेव्हा दर उतरतो; व्यापाऱ्यांचा नफा वाढतो आणि बाजार समिती प्रशासन मात्र गप्प बसते, हे नेमके कुणाच्या हिताचे राज्य आहे? असा संतप्त सवाल उपस्थित करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे यांनी मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यपद्धतीवर जोरदार हल्लाबोल केला. तुरीच्या खरेदीत शेतकऱ्यांची उघड लूट सुरू असताना बाजार समिती प्रशासन कुंभकर्णी झोपेत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. शासनाकडून जाहीर करण्यात आलेला हमीभाव प्रत्यक्षात केवळ कागदावरच राहिला असून, मलकापूर बाजार समितीत तूर व्यापाऱ्यांच्या मनमानी दराने खरेदी केली जात असल्याचे वास्तव त्यांनी अधोरेखित केले.…

Read More

माजी जिल्हा परिषद सदस्य स्व.निखिल खडसे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पावन स्मृतींना अभिवादन साईमत/मुक्ताईनगर/ प्रतिनिधी  सहकार आणि समाजकारणाच्या पटलावर आपला वेगळा ठसा उमटवणारे, अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले तसेच ‘आदिशक्ती मुक्ताई’ सूतगिरणीचे माजी अध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य स्व.निखिल खडसे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पावन स्मृतींना अभिवादन करण्यासाठी चांगदेव येथील मुक्ताई सहकारी सूतगिरणीत ‘अभिवादन सभा’ घेण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांनी स्व.निखिल खडसे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहून केली. त्यांच्या आठवणींना उजाळा देताना अनेकांचे डोळे पाणावले. यावेळी बोलताना माजी सभापती निवृत्ती पाटील यांनी सांगितले, स्व. निखिल खडसे आज आपल्यात नसले, तरी त्यांच्या आठवणी आणि कार्य आपल्यासोबत चिरंतन आहे. परिसरातील युवक…

Read More

नवीन वर्षाची सुरुवात स्वच्छतेने होणार का? प्रश्न उपस्थित साईमत /यावल /प्रतिनिधी यावल पोलीस स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ साचलेला केरकचरा आणि तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्या ये-जा मार्गावर एका चहावाल्याकडून सर्रासपणे टाकले जाणारे घाण पाणी, यामुळे यावल शहरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या परिस्थितीत नवीन वर्षाचा शुभारंभ चांगला व स्वच्छ होईल का? असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. यावल पोलीस स्टेशनमध्ये प्रवेश करताना उजव्या बाजुला मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला असून, त्याच मार्गावरून तहसीलदार, पोलीस निरीक्षक, शाळकरी विद्यार्थी, ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी येणारे रुग्ण, भारतीय स्टेट बँक, सेंट्रल बँक, शनी मंदिर, तहसील कार्यालय तसेच पोलीस स्टेशनमध्ये कामानिमित्त ये-जा करणारे हजारो नागरिक दररोज…

Read More

छाननी प्रक्रियेला सुरुवात साईमत/जळगाव /प्रतिनिधी : जळगाव महानगरपालिकेच्या ७५ जागांसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननी प्रक्रियेला बुधवार (३१ डिसेंबर) रोजी सकाळी १० वाजेपासून सुरुवात झाली आहे. छाननीच्या पहिल्याच दिवशी महापालिका परिसरात उमेदवार व समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. ७५ जागांसाठी १०३८ उमेदवार महापालिकेच्या ७५ जागांसाठी तब्बल १०३८ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, प्रत्येक जागेसाठी सरासरी १४ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ६ कक्षांत छाननी अर्जांची तांत्रिक व कायदेशीर तपासणी करण्यासाठी महापालिका आवारात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे ६ स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले आहेत. प्रत्येक अर्जाची बारकाईने छाननी केली जात आहे. हरकती, वकिलांची उपस्थिती छाननीदरम्यान…

Read More

संस्कृती महिला मंडळातर्फे महिला बचत गट व गृह उद्योगाला प्रोत्साहन साईमत /पारोळा/ प्रतिनिधी लाडशाखीय वाणी समाज मंडळ व संस्कृती महिला मंडळातर्फे महिला बचत गट व गृह उद्योगाला प्रोत्साहन मिळावे यासाठी एक दिवसीय ‘खाना खजाना’ आनंद मेळाव्याचे आयोजन वाणी मंगल कार्यालयात उत्साहात पार पडले. मेळाव्याचे उद्‌घाटन वाणी समाज मंडळाचे उपाध्यक्ष हेमकांत मुसळे व सीमा मुसळे यांच्याहस्ते करण्यात आले. मेळाव्यात महिला, युवतींनी उत्स्फुर्त सहभाग घेत विविध खाद्यपदार्थ, कलात्मक हस्तकौशल्याच्या वस्तू, सुती विणकामाच्या वस्तू ,मोत्यांच्या स्वतः तयार केलेल्या वस्तू, पुजेचे साहित्य, संक्रांतीसाठी वाणाच्या वस्तू तसेच गृहोपयोगी घर सजावटीचे साहित्य, असे अनेक प्रकारचे स्टॉल महिलांनी लावले होते. मेळाव्यात आलेल्या बंधु भगिनींनी खरेदीचा व खाण्याचा…

Read More

परिसरातील नागरिकांनी तत्परता दाखवत आरोपीला जागीच पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. साईमत/जळगाव/प्रतिनिधी शहरातील गोलाणी मार्केट परिसरात १८ वर्षीय तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी ३१ डिसेंबर रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास घडली. हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, परिसरातील नागरिकांनी तत्परता दाखवत आरोपीला जागीच पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. साई गणेश गोराडे (वय १८, रा. डीएनसी कॉलेजजवळ, जळगाव) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास साई हा गोलाणी मार्केट परिसरात होता. यावेळी संशयित आरोपी शुभम सोनवणे (रा. कलिंका माता मंदिर परिसर) याने जुन्या किंवा अज्ञात कारणावरून साईशी वाद घातला. वादाचे रूपांतर हाणामारीत…

Read More

२० हजारांचा मुद्देमाल जप्त, एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल साईमत/जळगाव/प्रतिनिधी :   शहरातील तांबापुरा भागातील मच्छीमार्केट परिसरात गांजाची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने घरात साठवणूक करणाऱ्या एका संशयिताला एमआयडीसी पोलिसांनी तांबापुरातून अटक केली आहे. कारवाईत पोलिसांनी सुमारे १९ हजार ३२० रुपये किमतीचा ३ किलो २२० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. दरम्यान, संशयित आरोपीवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. कारवाईमुळे तांबापुरा परिसरातील अंमली पदार्थ तस्करांचे धाबे दणाणले आहेत. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना तांबापुरा परिसरात एक जण गांजाची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. माहितीची गांभीर्याने दखल घेत त्यांनी त्वरित पथकाला कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके…

Read More

शैक्षणिक साहित्यासह प्रशस्तीपत्र देऊन १२०० विद्यार्थ्यांचा सन्मान साईमत/जळगाव/प्रतिनिधी :   येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ ला. ना.सार्व. विद्यालयात किशोर महोत्सवाचा समारोप बक्षीस वितरण कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात झाला. सुरुवातीस प्रमुख पाहुणे म्हणून हास्यजत्रा फेम हास्य कलाकार प्रा. हेमंत पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यासमितीचे प्रमुख प्रा. शरदचंद्र छापेकर, शाळेचे मुख्याध्यापक सचिन देशपांडे, ज्येष्ठ पर्यवेक्षक संजय वानखेडे, पर्यवेक्षिका रमा तारे, सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख सुवर्णा वंजारी, उपप्रमुख स्मिता करे यांच्या हस्ते माता सरस्वती पूजन करण्यात आले. तसेच प्रमुख पाहुण्यांचा सत्कार प्रा. शरदचंद्र छापेकर यांच्या हस्ते भेटवस्तू, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ, शाल देऊन करण्यात आला. उपस्थित मान्यवरांचे स्वागत झाल्यानंतर किशोर महोत्सव अंतर्गत घेण्यात आलेल्या…

Read More