मतदान न केल्यास नियोक्त्यांवर कारवाई होऊ शकते साईमत /जळगाव/प्रतिनिधी: येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी जळगावसह राज्यातील २९ महानगरपालिकांमध्ये महत्त्वाची मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. नागरिकांचा मतदानाचा हक्क सुरक्षित राहावा आणि प्रत्येक मतदार वेळेत मतदान केंद्रावर पोहोचू शकेल यासाठी जळगाव जिल्हा प्रशासनाने सर्व नियोक्त्यांना भरपगारी सुट्टी देणे अनिवार्य असल्याचे आदेश जारी केले आहेत. सर्व मतदार, जरी ते निवडणूक क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरी, त्यांना मतदानासाठी सुट्टी देणे बंधनकारक राहणार आहे. हा आदेश उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने, खासगी कंपन्या, हॉटेल्स, खाद्यगृहे, मॉल्स, रिटेल आस्थापना, माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, रुग्णालये व दवाखाने यांना लागू आहे. महत्त्वाची माहिती मतदारांसाठी:…
Author: saimat
रनगाव शिवारात घडली घटना साईमत /मलकापूर/प्रतिनिधी तालुक्यातील रनगाव शिवारात ट्रॅक्टरखाली दबल्याने २० वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना १ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मल्हार विनोद फासे (वय २०, रा.हिंगणकाझी, ता. मलकापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार रनगाव शिवारात ट्रॅक्टरखाली दबून गंभीर जखमी झालेल्या मल्हार फासे यांना त्यांच्या नातेवाईकांनी तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, तपासणी करून डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची खबर उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. स्वाती पाटील यांच्या वतीने वॉर्ड बॉय राजू तुकाराम गोमटे यांनी दिली. त्यानुसार अकस्मात मृत्यूची नोंद क्रमांक ०२/२०२६, कलम…
मकर संक्रांतीच्या आगमनावर बंदी घाललेल्या साईमत /जळगाव/प्रतिनिधी: मकर संक्रांतीच्या सणाच्या तोंडावर जळगाव पोलिसांनी प्रतिबंधित केलेल्या नायलॉन मांजाच्या वापर आणि विक्रीवर कडक कारवाई केली आहे. शनिपेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी शहरातील कांचन नगर भागात गस्त घालत असताना, ३१ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता १९ वर्षीय तरुणावर कारवाई करण्यात आली. सदर तरुण, गौरव प्रमोद बऱ्हाटे (वय १९, रा. कांचन नगर), संशयास्पद वर्तणुकीमुळे पोलीसांच्या लक्षात आला. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे ‘मोनो काईट फायटर्स’ कंपनीचे दोन रील नायलॉन मांजा आढळले. याची किंमत साधारण ६०० रुपये आहे. प्रशासनाने मानवी जीविताला धोका निर्माण होऊ शकणाऱ्या नायलॉन मांजावर बंदी घातली आहे. तरीही त्याचा वापर आणि…
प्रतिभा देशमुख यांची बिनविरोध निवड, महायुतीचे बळ वाढले साईमत /जळगाव/प्रतिनिधी जळगाव महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाची घोडदौड कायम असून सलग तिसऱ्या उमेदवाराची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. प्रभाग क्रमांक ९ ‘ब’ मधून शिवसेना शिंदे गटाच्या प्रतिभा देशमुख यांची बिनविरोध निवड झाली असून, यामुळे जळगाव महापालिकेत शिंदे गटाने बिनविरोध निवडीची हॅट्रिक साधली आहे. यासोबतच महायुतीच्या एकूण चार उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याने राजकीय समीकरणे अधिक मजबूत झाली आहेत. याआधी प्रभाग क्रमांक १८-अ मधून शिवसेना आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे चिरंजीव डॉ. गौरव चंद्रकांत सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली होती. उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार मयूर चंद्रशेखर सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे डॉ. गौरव…
डॉ.सुभाष तलरेजा यांची जिल्हा संघटक म्हणून नियुक्ती करण्यात आली साईमत /मलकापूर /प्रतिनिधी सामाजिक कार्यातील अनुभव, सर्वधर्म समभाव राखण्याची वृत्ती, नि:स्वार्थ भावनेने कार्य करण्याची प्रामाणिकता लक्षात घेत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे डॉ.सुभाष तलरेजा यांची जिल्हा संघटक म्हणून नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष ॲड.नाझेर काझी यांच्याहस्ते डॉ.तलरेजा यांना नियुक्ती पत्रक देण्यात आले असून, त्यांच्यावर जिल्ह्यात पक्षवाढीसाठी आणि जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी काम करण्याची नैतिक जवाबदारी ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव यांनी प्रसाद जाधव व अरुण अग्रवाल यांच्या पुढाकाराने डॉ.तलरेजा यांचा पक्षात प्रवेश घडवून आणला.डॉ.तलरेजा यांनी सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रात…
नागरिकांच्या मूलभूत गरजा प्राधान्याने पूर्ण करण्यावर भर साईमत/फैजपूर/प्रतिनिधी फैजपूर नगरपालिकेच्या नव्या नगराध्यक्ष दामिनी पवन सराफ यांनी १ जानेवारी रोजी पदभार स्वीकारला. सराफ गल्ली येथील निवासस्थानापासून सर्व नगरसेवक आणि नागरिकांच्या उपस्थितीत, टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीसह मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक पेहेड वाडा-खुशाल भाऊ रोड मार्गे नगरपालिकेपर्यंत गेली. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर व नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. नगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांनी पुष्पगुच्छ देऊन दामिनी सराफ यांचे स्वागत केले. सभागृहात नगराध्यक्ष, भाजपा गटनेते सिद्धेश्वर वाघुळदे, उपगटनेता सुरज गाजरे तसेच उपस्थित नगरसेवकांचे पुष्पगुच्छ देऊन मुख्याधिकाऱ्यांनी स्वागत केले. सभागृहात मुख्याधिकारी अविनाश गांगोडे, नगराध्यक्ष दामिनी सराफ तसेच नगरसेवक…
जळगाव महापालिकेतील निवडणुकीत बिनविरोध निवडींची संख्या वाढली साईमत /जळगाव /प्रतिनिधी जळगाव महानगरपालिकेत महायुतीचा तिसरा, तर शिवसेना शिंदे गटाचा दुसरा उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. प्रभाग क्रमांक ९ (ड) मधून शिवसेनेचे उमेदवार मनोज सुरेश चौधरी यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. यापूर्वी प्रभाग क्रमांक १८ मधून डॉ. गौरव चंद्रकांत सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली होती. या घडामोडींमुळे महापालिकेतील सत्तासमीकरणात शिवसेना शिंदे गटाने आपली ताकद दाखवून दिली आहे. जळगाव महापालिकेच्या १९ प्रभागांतील एकूण ७५ जागांसाठी दाखल झालेल्या १,०३८ उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली. यामध्ये १३५ अर्ज विविध कारणांमुळे बाद ठरले असून ९०३ अर्ज वैध ठरवण्यात आले आहेत. छाननीदरम्यान तांत्रिक त्रुटी तसेच राजकीय…
प्रभाग १८-अ मधून डॉ. गौरव सोनवणे बिनविरोध विजयी साईमत/जळगाव/ प्रतिनिधी : जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षानंतर आता शिवसेना (शिंदे गट) यांनीही बिनविरोध विजयाचे खाते उघडले आहे. प्रभाग क्रमांक १८-अ मधून शिवसेनेचे उमेदवार डॉ. गौरव चंद्रकांत सोनवणे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. डॉ. गौरव सोनवणे यांच्याविरोधात अपक्ष उमेदवार मयूर चंद्रशेखर सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. छाननीअंती दोन्ही अर्ज वैध ठरले होते. मात्र गुरुवारी, १ जानेवारी रोजी नववर्षाच्या सुरुवातीलाच मयूर सोनवणे यांनी माघार घेतल्याने डॉ. गौरव सोनवणे यांचा बिनविरोध विजय निश्चित झाला. डॉ. गौरव सोनवणे हे चोपड्याचे आमदार प्रा. डॉ. चंद्रकांत सोनवणे आणि माजी आमदार लताताई सोनवणे…
दहा लाखाच्या निधी मंजूर साईमत /पारोळा/ प्रतिनिधी तालुक्यातील वंजारी(महाराणा प्रताप नगर) येथे गेल्या सात वर्षापासून स्मशानभूमीची प्रलंबित मागणी अखेर पूर्ण झाली आहे.स्मशानभूमी बांधकामासाठी शासनाच्या योजनेअंतर्गत व आमदार अमोल पाटील यांच्या अथक प्रयत्नांतून १० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, आमदार अमोल पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. तालुक्यातील वंजारी खुर्द महाराणा प्रतापनगर येथे स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्मशानभूमीची व्यवस्था नव्हती. दीर्घकाळापासून स्मशानभूमीच्या अभावामुळे नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत होते.येथील ग्रामस्थांनी या समस्येवर प्रशासनाचे वेळोवेळी लक्ष ही वेधले.यासाठी काही वेळा उपोषण,आंदोलन केले तर १५ ऑगस्ट रोजी ज्येष्ठ नागरिक बाळासाहेब पाटील यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. प्रशासनाने याकडे लक्ष वेधले.आमदार अमोल पाटील…
जिल्ह्यात एकूण १ लाख २२ हजार ६३ एकल महिला असल्याचे प्राथमिक सर्वेक्षणातून आले समोर साईमत/जळगाव /प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक व प्रशासकीय सक्षमीकरणाच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनामार्फत सर्वसमावेशक, वस्तुनिष्ठ व धोरणात्मक सर्वेक्षण राबविण्यात येत असून, या सर्वेक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात समन्वय बैठक संपन्न झाली. या सर्वेक्षणामध्ये विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता, निराधार, दिव्यांग तसेच विविध कारणांनी एकट्या राहणाऱ्या महिलांची अचूक संख्या, त्यांची सामाजिक-आर्थिक परिस्थिती, शासकीय योजनांचा लाभ, आवश्यक कागदपत्रांची उपलब्धता आदी बाबींची सविस्तर माहिती संकलित करण्यात येणार आहे. संकलित माहितीनुसार गरजाधारित व परिणामकारक उपाययोजना राबविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.…