फऱीदाबाद : वृत्तसंस्था । उंच इमारतींच्या गॅलरींमधून लहान मुलं खाली पडल्याच्या अनेक दुर्दैवी घटना आपण आजपर्यंत वाचल्या किंवा पाहिल्या असतील. पण एखाद्या आईनेच आपल्या मुलाला इमारतीच्या 10 व्या माळ्यावरुन लटकवल्याचे तुम्ही कधी ऐकले किंवा पाहिले नसे परंतु अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे ज्यामध्ये महिलेने चक्क आपल्या मुलालाच उंच इमारतीच्या गॅलरीतून खाली उतरण्यास भाग पाडले. फरिदाबादमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत महिला आपल्या मुलाला नवव्या माळ्यावरील गॅलरीत उतरवताना दिसत असून नंतर बेडशीटच्या सहाय्याने वरती खेचत असल्याचे दिसत आहे. पण असं करण्यामागचं कारण काय? कारण ऐकून तुमचाही संताप होईल. कारण…
Author: saimat team
अहमदाबाद ः वृत्तसंस्था । मालिका विजयाने फॉर्मात असलेल्या भारतीय संघाला आता विंंडीजविरुद्ध क्लीन स्वीपची संधी आहे. भारत आणि विंडीज यांच्यात आज शुक्रवारी मालिकेतील शेवटचा तिसरा वनडे सामना होणार आहे. सलगचे दोन सामने जिकूंन यजमान टीम इंडियाने मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी घेतली आहे. पूर्ण वेळ कर्णधाराच्या भूमिकेेत रोहित शर्मानेे आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला पहिला मालिका विजय मिळवून दिल आहे. आता घरच्या मैदानावर विंडीज टीमचा धुव्वा उडवण्याचा त्याचा मानस आहे. यासह त्याला आपल्या नेतृत्वात घवघवीत यशासह विक्रमाला गवसणी घालण्याची मोठी संधी आहे. भारतीय संघाने अद्याप मालिकेत विंडीज संघाला अद्याप क्लीन स्वीप दिले नाही. भारताने 2019 मध्ये विंडीज दौऱ्यात तीन वनडे सामन्यांची…
जळगाव ः प्रतिनिधी । तालुक्यातील रायपूर येथे शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या घरकूल योजनेसाठी (पंतप्रधान आवास योजना) गरजू लाभार्थ्यांसाठी जाहीर झालेल्या ‘ड’ पत्रक यादीचा सर्व्हे करण्यात आला. यात सर्व्हे करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे सावळा गोंधळ उडाला आहे. यावेळी सर्व्हे करणाऱ्या अधिकाऱ्यांनी काही बोगस लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देवून यादी घोषित केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र, यामुळे खरे लाभार्थी घरकुलापासून वंचित राहिले आहे. याबाबत सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य आणि वंचित लाभार्थ्यांतर्फे पंचायत समितीवर मोर्चा काढण्यात येऊन पं.स.सभापतींना निवेदन देण्यात आले. अधिकाऱ्यांच्या या भोंगळ प्रकारामुळे खऱ्या लाभार्थ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. काही लाभार्थ्यांना पुन्हा दिला घरकुलाचा लाभ खरे लाभार्थी मात्र घरकुलापासून वंचित निवेदनात…
जळगाव ः प्रतिनिधी । शहरातील खडके चाळीतील सार्वजनिक शौचालय स्वच्छतेचे तीन तेरा या मथळ्याखाली सायंदैनिक साईमतने काल वृत्त प्रकाशित केली.या वृत्ताची मनपा प्रशासनाने त्वरीत दखल घेऊन काल सायंकाळी व आज सकाळी या सार्वजनिक शौचालयाची स्वच्छता करण्यात आली आहे. ही कार्यवाही तातडीने होताच खडके चाळ परिसरातील नागरिकांनी ‘साईमत’ला धन्यवाद दिले आहे. शहरातील प्रभाग क्रमांक 1 मधील खडके चाळ या वस्तीसाठी त्यामागील बाजूला शहर महानगरपालिकेने सार्वजनिक शौचालय बनविले आहे परंतु गेल्या 15 ते 20 दिवसापासून महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांंनी येथे स्वच्छताच केली नाही. त्यामुळे येथे नेहमी येणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. याबाबत काही नागरिकांनी स्थानिक नगरसेवकांना ही समस्या कथन केली परंतु…
पुणे, वृत्तसंस्था । महाराष्ट्र परीक्षांच्या भरती घोटाळ्यात पुरता अडकून गेला आहे. म्हाडा भरती घोटाळा, आरोग्य भरती घोटाळा आणि सर्वात मोठा घोटाळा तो म्हणजे शिक्षक भरती घोटाळा. या शिक्षक भरती घोटाळ्यात आतापर्यंत 300 बनावट प्रमाणपत्र जप्त करण्यात आली आहेत. शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात आरोपींनी उमेदवारांना पोस्टानं पाठवलेली तीनशे बनावट प्रमाणपत्र पोलिसांनी हस्तगत केली आहेत. या प्रकरणात आतापर्यंत 7 हजार 900 जणांना पात्र केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांकडून सविस्तर अहवाल तयार करुन सरकारला सादर केला आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. यामुळे आता बोगस शिक्षकांची जेलची हवा पक्की झाली आहे. बोगस 7 हजार 900 शिक्षकांंची यादी पत्त्यांसह तयार…
लखनऊ, वृत्तसंस्था । उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्याचे मतदान आज सकाळपासून सुरु झाले असून मतदान केंद्रावर मतदारांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे वृत्त आहे.राज्याच्या पश्चिम भागाच्या 11 जिल्ह्यांतील 58 मतदारसंंघात मतदान होत असून या 58 मतदारसंघातील प्रचार मंगळवारी थंंडावला होता. मतदानाला सकाळी सात वाजता सुरुवात झाली असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही मार्गदर्शक तत्त्वे राबवण्यात आली आहेत. उत्तर प्रदेश सरकारमधील श्रीकांत शर्मा, सुरेश राणा, संदीप सिंह, कपिलदेव अगरवाल, अतुल गर्ग आणि चौधरी लक्ष्मी नारायण हे मंत्री पहिल्या टप्प्यात प्रमुख उमेदवार आहेत. या 58 मतदारसंघात एकूण 623 उमेदवार आपले राजकीय भविष्य आजमावत असून दोन कोटी 27 लाख मतदार आहेत. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत…
जळगाव, प्रतिनिधी । नोटबंदीनंतर देशात ऑनलाईन व्यवहार वाढले आहेत. गेल्या दोन वर्षात ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार देखील वाढले असून नागरिकांना सजग करणे आवश्यक आहे. नेहरु युवा केंद्राच्या माध्यमातून आयोजित ‘डिजीटल बँक’ वेबिनारमध्ये बँक मित्र निलेश पाटील यांनी ऑनलाईन फसवणूक टाळण्याचे सोपे मार्ग नागरिकांना समजावून सांगितले. ऑनलाईन व्यवहार गेल्या काही वर्षात मोठ्याप्रमाणात वाढले असून नागरिकांची फसवणूक होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. नागरिकांना जागरूक करण्यासाठी नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे बुधवारी ‘डिजीटल बँक’ या विषयावर ऑनलाईन वेबिनार आयोजित करण्यात आला होता. नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर यांच्या मार्गदर्शनाखाली युवा स्वयंसेवक हेतल पाटील यांनी या वेबिनारचे आयोजन केले होते. वेबिनारसाठी अतुल चौधरी,…
कजगाव ता.भडगाव – येथुन जवळच असलेल्या तांदुळवाडी व भोरटेक शिवारातील शेत शिवारात गेल्या पंधरा दिवसापासून वीजपुरवठा कमी दाबाने होत असल्याने पाण्याच्या मोटारी (पंप) चालत नसल्याने पीक ऊन धरू लागल्याने संतप्त शेतकरी दि.९ रोजी कजगाव वीज वितरण च्या कार्यालयात धडकले. तांदुळवाडी व भोरटेक शिवारातील तांदुळवाडी फाट्या वरील ट्रान्सफॉर्मर व भोरटेक शिवारातील तारसिंगी ट्रान्सफॉर्मर या दोघ ट्रान्सफॉर्मर वरून गेल्या पंधरा दिवसांपासून कमी दाबाचा विज पुरवठा होत असल्याने या ट्रान्सफॉर्मर वरील विद्युतपम्प चालत नसल्याने गहु, मका,ज्वारी सह फळ बागांना पाणी देता येत नसल्याने पीक ऊन धरत काहि पीक सुकु लागली आहे या बाबतीत या ट्रान्सफॉर्मर वरील शेतकऱ्यांनी अनेक वेळा कमी दाबाच्या विज पुरवठा…
भडगाव, प्रतिनिधी । कजगाव येथील बस स्थानक चौकात २५१५ या मुलभुत सुविधा अंतर्गत आमदार किशोर पाटील यांच्या निधीतून पाच लाख रुपये खर्चाचे फेव्हरब्लॉक बसविण्याच्या कामाचे उदघाटन दि.९ रोजी सम्पन्न झाले येथील बस स्थानक चौक सुशोभीकरण च्या दृष्टिकोनातून आमदार किशोर पाटील यांनी २५१५ या मुलभुत सुविधा या योजने अंतर्गत आमदार निधीतून पाच लाख रुपये चे फेव्हरब्लॉक बसविण्या साठीच्या खर्चाच्या कामास मंजुरात दिल्याने दि.९ रोजी या कामास मान्यवरांच्या हस्ते नारळ वाढवुन शुभारंभ करण्यात आले प्रसंगी राजु चव्हाण, अनिल महाजन,अनिल टेलर,आबा न्हावी,आशीष वाणी, बापु मोरे,दिनेश पाटील,आण्णा शिंदे,शहीद मण्यार,यतीन न्याती,बापु पाटील सह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते