Author: saimat team

यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील दुसखेडा ग्रामपंचायत ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सरपंच यांचा मुलगा यांनी भुसावळ येथील शासकीय विश्रामगृहात यावल तालुक्यातील दुसखेडा ग्रामपंचायत मधील नमुना नंबर 8 व 9 चे वाचन करून शासकीय कामकाजाचा नवीन विक्रम केला असल्याची तक्रार दुसखेडा ग्रामपंचायत उपसरपंच व सदस्यांनी यावल पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्याकडे केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दि.९ फेब्रुवारी २०२२ रोजी यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, यावल तालुक्यातील दुसखेडा येथील घरकुलाची “ड” यादी ही शासनाकडून मंजुर झाली आहे. मंजूर घरकुलांच्या यादीचे वाचन हे ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत ग्रामसभा घेऊन करावी लागते परंतु विद्यमान ग्रामसेवक हे आज…

Read More

मुक्ताईनगर, प्रतिनिधी । अमरावती जिल्ह्यातील ३१ वर्षीय नर्स तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवीत सलग पाच महिने अत्याचार केल्याची घटना घडली. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्थानकात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नाचे आमिष दाखवत अमरावती जिल्ह्यातील ३१ वर्षीय नर्स तरुणीवर पाच महिने अत्याचार केल्याचा धक्कादायक बाब समोर आलीय. त्यानंतर लग्नास नकार दिल्याने तरूणाविरोधात मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरावती शहरातील ३१ वर्षीय तरुणी एका खाजगी रुग्णालयात नर्स म्हणून नोकरीला आहे. १४ फेब्रुवारी २०२१ रोजी ‘हॅलो यू ॲप’च्या माध्यमातून तरूणीची मुक्ताईनगर येथील भूषण संजयराव तायडे (वय-३१) याच्याशी ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री आणि मैत्रीनंतर प्रेमात रूपांतर झाले. याचा गैरफायदा घेत…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील एका भागातील राहणाऱ्या २६ वर्षीय विवाहितेची राहत्या घरात सायंकाळच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर माहिती अशी आहे की, शहरातील पिंप्राळा परिसरातील विजय नगरात राहणाऱ्या पल्लवी महेश पाटील (वय-२६) या विवाहितेने राहत्या घरात बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पल्लवी पाटील ह्या पती महेश हेमलाल पाटील यांच्यासह सासू-सासरे व पाच वर्षाची मुलगी यांच्यासह वास्तव्याला आहे. पती महेश पाटील हे शहरातील दाणाबाजार मार्केट मधील जळगाव पीपल्स बँकेत क्लार्क म्हणून नोकरीला आहे. तर…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । कृषिपंपाचे वीजबिल आज भरू, उद्या भरू असे म्हणत महावितरणच्या कृषी वीज धोरणात 50 टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठी आता केवळ 50 दिवस उरले आहेत. येत्या 31 मार्चला 50 टक्के माफीची मुदत संपणार असून, एप्रिलपासून बिलात फक्त 30 टक्के माफी मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मुदत संपण्याची वाट न पाहता अभियानात सहभागी होऊन आपल्या कृषिपंपाची थकबाकी तसेच चालू बिले भरून 50 टक्के माफी मिळवावी तसेच वीजपुरवठा खंडित होण्याची नामुष्की टाळावी, असे आवाहन महावितरण जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी केले आहे. जळगाव परिमंडलात कृषिपंप वीजबिल वसुलीस प्रतिसाद मिळत आहे. ज्या गावात वसुली, त्याच गावात काम असा निकष ठेवल्याने अनेक…

Read More

बंगळुरू : वृत्तसंस्था । कर्नाटकच्या कॉलेजमधील एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडीओत मुस्कान नावाची एक तरुणी हिजाब घालून कॉलेजमध्ये आली असता एक जमाव तिच्या दिशेने चालत येतो. यानंतर तो जमाव तरुणीसमोर ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यास सुरुवात करतो. यानंतर तरुणीदेखील त्यांना उत्तर देत ‘अल्लाहू अकबर’ ची घोषणा देते. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे प्रकरण कर्नाटकच्या मांडयामधील आहे. या व्हायरल व्हिडीओवर आता एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या मुलीच्या समर्थनार्थ ट्वीट केले आहे. एक व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी तरुणीला सलाम केला आहे. “मी या तरुणीच्या आई-वडिलांना सलाम करतो. या मुलीने एक उदाहरण ठेवले आहे”.…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । कान्हदेशाला संपन्न ऐतिहासीक परंपरा लाभली असून स्वातंत्र्य लढ्यासाठी महत्त्वाचे योगदान कान्हदेशवासीयांचे आहे. स्वातंत्र्य संग्रामासाठी ऊर्जाशील ठरलेल्या या पावन भूमिमध्ये महात्मा गांधीजींनी भेट दिली. महात्मा गांधीजींच्या 1927 च्या जळगाव भेटीला 95 वर्ष पूर्ण होत आहे. यापार्श्वभूमीवर ‘कान्हदेशातील गांधी’ या विषयावर वेबिनाराचे आयोजन गांधी रिसर्च फाऊंडेशन आणि फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयातील महात्मा गांधी स्टडी अॅण्ड रिसर्च सेंटर यांच्यातर्फे केले आहे. दि. 11 फेब्रुवारी 2022, सकाळी 10.00 ते 11.15 वाजता ‘कान्हदेशात गांधी’ या विषयावर सुप्रसिद्ध वक्ते प्राचार्य डॉ. विश्वास पाटील वेबिनारच्या माध्यमातून मार्गदर्शन करतील. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा गांधीजींचे पणतू श्रीमान तुषार गांधी असतील. ऑनलाइन कार्यक्रमामध्ये रजिस्ट्रेशनकरून सहभागी झालेल्यांना…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा आणि राज्यसभेत काँग्रेसवर सडकून टीका केली. यामुळे बिथरलेल्या काँग्रेसने राज्यात आंदोलनाचा इशारा दिलाय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्रात सगळ्या भाजप कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे. काँग्रेसच्यावतीने करण्यात येणाऱ्या आंदोलनामुळे खबरदारी म्हणून मुंबईतील नरिमन पॉईंट, दादर येथील वसंत स्मृती या भाजप कार्यालयाजवळ मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.तर अमरावतीमध्ये भाजप आमदार आणि माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी काँग्रेसचे काळे कुत्रे जरी भाजपच्या कार्यालयावर आले तर त्याला झोडल्याशिवाय भाजपचे कार्यकर्ते राहणार नाही. असा इशारा दिला आहे.

Read More

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । विरोधकांचा छळ करण्यासाठी सरकारकडून सक्तवसुली संचलनालयाचा (ईडी) वापर केला जात असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी महाराष्ट्रात मध्यावधी निवडणूक व्हाव्यात यासाठी सरकार पाडण्याच्या हेतूने काही लोकांनी माझी भेट घेतली होती असाही गौप्यस्फोट केला आहे. दरम्यान यामध्ये सहभागी होण्यास नकार दिल्याने आपल्याला धमकावले जात आहे, जेणेकरुन आपण राज्यसभेत मोकळेपणाने बोलू नये असाही आरोप त्यांनी केला आहे. संजय राऊत राज्यसभेचे खासदार असल्याने त्यांनी व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहिले असून काही खळबळजनक आरोप केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत यांच्यावर आरोप होत…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । शानबाग सभागृह येथे महाराष्ट्र नाभिक महामंडळ जळगांव जिल्हातर्फे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात युवक जिल्हा अध्यक्षपदी अनिल (छोटू) शिंदे जामनेर यांची निवड करण्यात आली आहे. तसेच जळगांव तालुका अध्यक्षपदी दिलीप शालिग्राम जगताप रिधूर् तर जिल्हा सह कार्याध्यक्षपदी किशोर मधूकर वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच महिला जिल्हा उपाध्यक्ष सुमन गांगुर्डे, पल्लवी शिरसाठ भडगांव, सचिव माधवी निंबाळकर, सरचिटणीस संगीता पगारे, संपर्क प्रमुख सरला खोंडे, मीनाक्षी वखरे बोदवड, संघटक अनिता वाघीले, दिपाली इंगळे जामनेर, जोस्ना शिरसाठ पाचोरा, प्रसिध्द प्रमुखपदी ममता खोंडे तर जिल्हा कार्यकारणी सदस्य अलका सोनवणे, माधुरी बोरसे, उर्मिला सोनवणे, शितल बोरसे, प्रतिभा वाघ, जोष्ना शिरसाठ, योगिता सोनवणे, संगीता…

Read More

जामनेर, प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे महाराष्ट्र राज्याचे नगर विकास मंत्री नामदार एकनाथ रावजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना व युवासेना तसेच गोदावरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने महाआरोग्य शिबिराचे येथील महाश्वेरी मंगल कार्यालयात मध्ये आज सकाळी दहा वाजताआयोजन करण्यात आले होते. या शिबिरात डोळ्याचे तपासणी हृदयरोग तपासणी नाक कान घसा तपासणी तसेच इतर आरोग्य वर सुद्धा तपासणी करण्यात आली या शिबिरात येथील 239 नागरिकांनी या शिबीराचा लाभ घेतला आहे या शिबिराचे उद्घाटन जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता पी रामानंद यांच्या हस्ते करण्यात आले या शिबिरासाठी प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉक्टर मनोहर पाटील भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल शेंदुर्णी…

Read More