अहमदाबाद ः वृत्तसंस्था । मालिका विजयाने फॉर्मात असलेल्या भारतीय संघाला आता विंंडीजविरुद्ध क्लीन स्वीपची संधी आहे. भारत आणि विंडीज यांच्यात आज शुक्रवारी मालिकेतील शेवटचा तिसरा वनडे सामना होणार आहे. सलगचे दोन सामने जिकूंन यजमान टीम इंडियाने मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी घेतली आहे. पूर्ण वेळ कर्णधाराच्या भूमिकेेत रोहित शर्मानेे आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला पहिला मालिका विजय मिळवून दिल आहे. आता घरच्या मैदानावर विंडीज टीमचा धुव्वा उडवण्याचा त्याचा मानस आहे. यासह त्याला आपल्या नेतृत्वात घवघवीत यशासह विक्रमाला गवसणी घालण्याची मोठी संधी आहे.
भारतीय संघाने अद्याप मालिकेत विंडीज संघाला अद्याप क्लीन स्वीप दिले नाही. भारताने 2019 मध्ये विंडीज दौऱ्यात तीन वनडे सामन्यांची मालिका 2-0 ने जिंकली होती. एक वनडे सामना पावसाच्या व्यत्ययामुळे होऊ शकला नाही.
सूर्यकुमारचे स्थान मजबूत
गत सामन्यात अर्धशतकी खेळी करून सूर्यकूमार यादवने (64) सर्वांचे लक्ष वेधले. तसेच संघाच्या विजयातही मोलाचे योगदान दिले. त्यामुळे त्याचे तिसऱ्या वनडेसाठी संघातील स्थान मजबूत आहे.
दीपक हुडाला विश्रांती
मालिकेत विजयी आघाडी घेेतल्यामुुळे आता कर्णधार रोहित शर्मा नवा प्रयोग साकारण्याची शक्यता आहे. यामध्ये रोहितकडून शिखर धवनला तिसऱ्या वनडेत खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. यातून तो पुनरागमन करू शकेल. धवनच्या सहभागाने उपकर्णधार लोकेश राहुल मधल्या फळीत फलंदाजीसाठी उतरू शकेल. धवनच्या पुनरागमनामुळे दीपक हुडाला विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे.
भारतीय संघात आता तिसऱ्या वनडे सामन्यासाठी महत्त्वाचे तीन बदल होण्याची शक्यता आहे. यात गोलंदाज कुलदीप यादव वा रवी बिश्नोई यांच्यापैकी एकाला संधी मिळेल. यातून चहल किंवा वॉशिंग्टन सुंदरपैकी एकाला बाहेर बसावे लागेल. तसेच आवेश खानही संधीच्या प्रतीक्षेत आहे.