Author: saimat team

जळगाव, विशेष प्रतिनिधी । गेल्या 4 जानेवारी रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांनी स्वतः रस्त्यावर येत शहर आणि परिसरातील तब्बल 9 सट्टा व जुगाराच्या अड्ड्यांवर धाडी टाकल्या होत्या.त्या कारवाईत 29 जुगाऱ्यांना ताब्यात घेण्यात येऊन लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.एसपींच्या त्या कारवाईचे सर्वत्र कौतुक,अभिनंदन आणि स्वागत करण्यात आले होते.शहरातूनच नव्हे ,तर जिल्ह्यातून आता अवैध धंदे हद्दपार होतील असा तेव्हा कयास लावला जात होता मात्र काही दिवसांनीच शहर व परिसरात सट्टा-जुगाराचे अड्डे नव्या जोमात सुरू झालेले दिसत आहेत.त्यावरून एसपी साहेबांच्या कारवाईवरच प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे व हे धंदे पुन्हा सुरू कसे ?असा प्रश्न जळगावकर विचारू लागले आहेत. वास्तविक जिल्हा…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र‘ या कार्यक्रमात ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार व निवेदक रणधीर कांबळे यांनी ही मुलाखत घेतली आहे. गुरूवार दि.10 फेब्रुवारी 2022 रोजी सायंकाळी 7.30 वाजता ही मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या समाज माध्यमांवरील पुढील लिंकवर पाहता येईल. राज्य सरकारला नुकतीच दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. राज्याच्या ऊर्जा विभागाने गेल्या दोन वर्षात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेवून त्याची अंमलबजावणी केली आहे. कृषीपंप जोडणी धोरण आणि अपारंपरिक ऊर्जा धोरणांची वैशिष्ट्ये, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ऊर्जा विभागाचे प्रयत्न, उद्योगांना दिलासा देण्यासाठी उचललेली पाऊले, निसर्ग चक्रीवादळ तसेच तोक्ते चक्रीवादळात ऊर्जा विभागाने…

Read More

यावल, प्रतिनिधी । आज बुधवार दि.९ रोजी यावल तालुक्यातील सांगावी बु.येथे डॉ. कुंदन फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील केंद्र आणि राज्य शासनाच्या महत्वाकांशी विविध योजनांचा लाभ मिळावा म्हणून भविष्यात आवश्यक असलेले ई-श्रम कार्डची मोफत नोंदणी अभियानाचे साहवे सत्रात हे पोहोचले आहे. सांगवी बु. ग्रामपंचायत जवळ या मोफत ई – श्रम कार्ड नोंदणीचे सत्र घेण्यात आले,याअभियानात गावातील एकूण385लाभार्थ्यांनी लाभ घेतला.याअभियानाच्या प्रमुख पदी श्रीकांत महाजन होते. अभियानाचे उदघाट्न जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष श्रीकांत दादा महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी नारायण चौधरी, योगेश भंगाळे, डॉ. कुंदन फेगडे, रशीद तडवी (सरपंच), धनराज पाटील, दिनेश पाटील, योगेश भंगाळे, शरद तायडे, प्रशांत बेंडाळे, अभय…

Read More

अमरावती, वृत्तसंस्था । अमरावतीचे महापालिका आयक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर शाईहल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. आयुक्त आष्टीकर यांच्या अंगावर शाई फेकत त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. काही महिलांनी अचानक येत आयुक्त आष्टीकर यांच्यावर शाईफेक केली. अमरावतीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवल्यावरुन राजकारण तापलं आहे. 12 डिसेंबरला युवा स्वाभिमानच्या काही कार्यकर्त्यांनी राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता. पण त्यानंतर 16 डिसेंबरला तो पुतळा हटवण्यात आला. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी होती. पुतळा का हटवला याचा जाब विचारत काही महिलांनी आयुक्त आष्टीकर यांच्यावर शाई फेकली. पालिकेचे सुरक्षा रक्षक तात्काळ आष्टीकर यांच्या बचावासाठी धावले आणि प्रसंगावधान दाखवून शाईफेक करणाऱ्या महिलांना…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । सर्व संगीतप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या  भारताच्या गणकोकीळा स्व. लता मंगेशकर यांना ओजस्विनी कला महाविद्यालयाने ५०० किलो रांगोळीतुन साकारलेल्या प्रतिकृतीतुन आदरांजली अपूर्ण करण्यात आली. ४० बाय ४० या आकारात साकारलेल्या या भव्य रांगोळीच्या  प्रतिकृतीत पांढरा आणि काळ्या रंगाचा वापर केला आहे. लतादीदी या भारताचे भूषण असल्याने यात तिरंगा ध्वज देखील साकारण्यात आला आहे. तब्बल ५ शिक्षक आणि विद्यार्थी यांनी २४ तासाच्या अथक प्रयत्नानंतर ही रांगोळी  पूर्णत्वास आली. रांगोळीची संकल्पना ओजस्विनी कला विभागाचे विभागप्रमुख प्रा. मिलन भामरे, प्रा. पुरुषोत्तम घाटोळ, प्रा. पियुष बडगुजर, प्रा. डिगंबर शिरसाळे, प्रा. राजेंद्र सरोदे यांची आहे. रांगोळी रेखाटण्यात भूषण पाटील, आयुषी जैन, लक्षिता जैन,…

Read More

यावल, प्रतिनिधी । दर महिन्याला स्वस्त धान्य माल पुरवठा करण्यासाठी शासनाने आता ग्रामीण भागासाठी आणि शहरी भागासाठी असे वेगवेगळे दोन स्वतंत्र वाहतुकीचे ठेके दिल्याने स्वस्त धान्य दुकानदार आणि स्वस्त धान्य लाभार्थी ग्राहकामध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. स्वस्त धान्य वाहतुकीचा दिलेला ठेका हा ग्रामीण भाग आणि शहरी भागासाठी स्वतंत्रपणे वेगवेगळ्या असला तरी वाहनातून आलेले धान्य हे यावल येथील शासकीय गोडाउन मध्ये उतरवून नंतर पुन्हा तेथून स्वस्त धान्य दुकानदार यांना न्यावे लागणार आहे का?आणि असे असेल तर स्वस्त धान्य दुकानदारास हमाली व वाहतूक खर्चाचा भुर्दंड दुपटीने द्यावा लागणार तसेच इतर अनेक मुद्दे उपस्थित होणार असल्याने याबाबत यावल तहसीलदार आणि पुरवठा…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । ४० सदस्य असलेल्या गोवा विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे ११ उम्मेदवार रिंगणात असून शिवसेना सदर निवडणूक पूर्ण ताकत पनाशी लावून लढत आहे. काही मतदार संघात वातावरण शिवसेनेसाठी पूरक असल्याचे दिसून येत आहे. युवासेना प्रमुख व शिवसेना नेते आदित्य ठाकरे या निवडणुकीवर लक्ष ठेवून आहेत. आदित्य ठाकरे यांच्या आदेशावरून युवासेनेचे निवडक पदाधिकारी यांची कुमक युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वात गोव्यातील विविध विधान सभा क्षेत्रात शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी दाखल झाली आहे. यात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने व सचिव वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वात जळगावचे युवासैनिक, महाराष्ट्र राज्याचे युवासेना सहसचिव विराज कावडीया यांच्या सह पेडणे विधानसभा क्षेत्रात शिवसेना उम्मेदवर सुभाष…

Read More

चाळीसगाव, प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील पिंपरखेड (लालबर्डी) येथे दिं. ९ रोजी जि.प. उच्च प्राथमिक शाळेला गरजू विद्यार्थ्यांना सेवा सहयोग फाऊंडेशन पुणे या संस्थेचे गुणवंतजी सोनवणे यांच्या संकल्पनेतून ४३ स्कुल किटचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गावाचे सरपंच श्री. प्रदीपराव भोसले होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविकात सेवा सहयोग ग्रामोद्य प्रकल्पाचे समन्वयक सोमनाथ माळी यांनी संस्थेच्या माध्यमातून तालुक्यात सुरू असलेल्या जलसंधारण,सामाजिक,शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या मदतीबाबत तसेच ग्रामोद्य प्रकल्पाअतर्गत गरजू महीलासाठी सुरू असलेल्या शिवणकाम तसेच युवकांसाठी सुरू असलेल्या गँरेजप्रशिक्षण व रोजगार निर्मिती बाबत माहिती दिली तसेच विविध उपक्रमांची माहिती दिली. प्रमुख मान्यवर म्हणून सेवा सहयोगचे राहुल राठोड, सौ.बागुल मॅडम,श्री तुफान खोत सर उपस्थित…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । आज बुधवार , दिनांक 9 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 10 वाजता वाघ नगर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगांव जिल्हा (महानगर) तर्फे जिल्हा महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली महानगर संघटक सहसचिव संजय जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्यता नोंदणी अभियान व कोरोना लसीकरण शिबीर राबविले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामीण जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील होते तर कार्यक्रमाचे उदघाटन महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. रविंद्र पाटील यांनी उपस्थित नागरिकांना संबोधित केले व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमात १०० नागरिकांची सदस्यता नोंदणी करण्यात आली व 50 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. तसेच वाघ नगर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व भारतीय…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । विविध साहित्यांची चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला ८ रोजी मंगळवारी अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव एमआयडीसी परिसरातील श्रीराम पॉलिमर्स या कंपनीत १३ हजार ६०० रुपये किंमतीच्या विविध साहित्यांची चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला पोलीसांनी मंगळवारी ८ फेब्रुवारी रोजी अटक केली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निकीता राजेंद्र महाजन (वय-१९) रा. मेहरूण जळगाव यांची एमआयडीसीच्या व्ही सेक्टर मधील श्रीराम पॉलीमर्स नावाची चटई तयार करण्याकामी लागणाऱ्या दाण्याची कंपनी आहे. १७ जानेवारी रोजी निकीता आणि त्यांची आई सल्भा महाजन यांनी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास कंपनीतील काम बंद करून घरी…

Read More