जळगाव, प्रतिनिधी । ट्रक मधून साहित्याची चोरी करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारच्या सुमारास अटक करण्यात आली आहे. तसेच दोघांकडून १९ लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ट्रकमधून साहित्याची चोरी करणार्या दोघांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी मुसक्या आवळल्या. दोघांकडून सुमारे १९ लाख रुपयांचा मुद्देमाला हस्तगत करण्यात आला असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रकमधील साहित्य चोरीच्या दोन घटना जिल्ह्यात घडल्याने पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी या घटनांची चौकशी करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस…
Author: saimat team
अडावद, प्रतिनिधी । तालुक्यातील अडावद येथे मॅनेज (हैदराबाद),वनामती (नागपूर),आत्मा (जळगाव) आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत भगिनी मंडळ संचलित कृषी तंत्र विद्यालय, अडावद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी विस्तार सेवा पदविका प्रशिक्षण केंद्राचा उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थावरुन बोलतांना माजी विधानसभा अध्यक्ष प्रा. अरुणभाई गुजराथी यांनी देशात कृषी संस्कृती अधिक सक्षम करण्याचे आवाहन केले. सदर अभ्यासक्रम हा एक वर्षाचा असून यात ४० प्रशिक्षणार्थींनी आपला प्रवेश निश्चित केला आहे. संपूर्ण देशभरातील कृषीतज्ञ या वर्गाला ऑनलाइन व प्रत्यक्ष मार्गदर्शन करणार असल्याचे प्राचार्य डाॅ.अनिल माळी यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून आत्मा, जळगावचे प्रकल्प उपसंचालक के. एन. तडवी तर विशेष…
यावल, प्रतिनिधी । आज शुक्रवार दि.11रोजी सातपुडा जंगलात यावल येथील डॉ.कुंदन फेगडे यांच्या तर्फे आयोजित मोफत ई श्रमकार्ड नोंदणी महाअभियानास 287 आदिवासी बांधवांनकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. यावल येथील युवा सामाजिक कार्यकर्त डॉ.कुंदन फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेले मोफत ई-श्रम कार्ड वितरण अभियान सातव्या टप्प्यात सातपुडा डोंगरात अति दुर्गम आदिवासी भागात पोहोचले या उपक्रमाला आदिवासी बांधवांकडून मोठ्या उत्साहात बहुसंख्येने प्रतिसाद मिळाला. यावल तालुक्यातील आदीवासी ग्रामीण क्षेत्रातील नागरीकांना केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा तात्काळ लाभ मिळावा या सामाजिक सेवेच्या शुद्ध हेतूने श्रमजिवी कुटुंबास अत्यावश्यक असणारे ई-श्रम कार्डची मोफत नोंदणीचे अभियानास सातवे सत्राला सुरुवात करण्यात आली या अभियानात अतिदुर्गम भागातील,वागझिरा,जामन्या,…
यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील सावखेडा-हिंगोणा जिल्हा परिषद गटातील लघु सिंचन विभागातर्फे सुरु असलेले आणि झालेल्या बंधाऱ्याच्या कामाची आणि थर्ड पार्टी ऑडिट करणाऱ्या संबंधितांची चौकशी होईपर्यंत ठेकेदाराचे बिल थांबविण्यात यावे अशी मागणी यावल पंचायत समिती सदस्य शेखर पाटील यांनी केली आहे. दि८ फेब्रुवारी २०२२ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांच्याकडे दिलेल्या निवेदनात यावल पंचायत समिती सदस्य शेखर पाटील यांनी म्हटले आहे की, तालुक्यातील सावखेडा होणा-या जिल्हा परिषद गटात जिल्हा परिषद अंतर्गत लघुसिंचन विभागामार्फत चालू वर्षात बंधाऱ्याची कामे मंजूर होऊन ठेकेदारांमार्फत कामे पूर्ण झालेली आहेत तर काही कामे सुरू आहेत ही बंधाऱ्याची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झालेली असल्याने या नाल्यावर…
यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील दुसखेडा ग्रामपंचायत ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सरपंच यांचा मुलगा यांनी भुसावळ येथील शासकीय विश्रामगृहात यावल तालुक्यातील दुसखेडा ग्रामपंचायत मधील नमुना नंबर 8 व 9 चे वाचन करून शासकीय कामकाजाचा नवीन विक्रम केला असल्याची तक्रार दुसखेडा ग्रामपंचायत उपसरपंच व सदस्यांनी यावल पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्याकडे केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दि.9फेब्रुवारी2022 रोजी यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, यावल तालुक्यातील दुसखेडा येथील घरकुलाची “ड” यादी ही शासनाकडून मंजुर झाली आहे. मंजूर घरकुलांच्या यादीचे वाचन हे ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत ग्रामसभा घेऊन करावी लागते परंतु विद्यमान ग्रामसेवक हे आज सुटीवर असून…
जळगाव प्रतिनिधी जळगाव येथील इकरा शिक्षण संसथे चे अध्यक्ष आणि अल-फैज फाऊंडेशन जळगाव चे संस्थापक डॉ.अब्दुल करीम सालार यांना नुकतेच एका समारंभात “सिपास नामा” आणि “फखर ए खांदेश” पुरस्कार” प्रदान करण्यात आला. इकरा चे अध्यक्ष आणि अल-फैज फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. अब्दुल करीम सालार यांना मदिना कॉलनी, उस्मानिया पार्क, जळगाव येथील रहिवाशांनी एका कार्यक्रमात मानार्थ “सीपास नामा ” प्रदान केले. आभार पत्र सुप्रसिद्ध कवी आणि सूत्रसंचालक साबीर मुस्तफा आबादी यांच्या तर्फे हस्त लिखित मान पत्र, त्यांच्या शैक्षणिक सेवेचा गौरव म्हणून “फखर ए खानदेश ” पुरस्कार प्रदान करण्यात आला.शेख मसूद चाँद, फेरोज खान, अनसार खान, रझा सर, दानिश खान, जुनैद निशात यांच्या…
मुंबई : प्रतिनिधी । महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या चुलत भावाच्या सह-मालकीच्या कंपनीची ईडीकडून 10.9 कोटी रुपयांच्या कथित पेमेंटची चौकशी सुरू आहे. अनेक कंपन्यांच्या माध्यमातून हे पैसे अनिल देखमुखांना पाठवण्यात आले होते, असा ईडीला संशय आहे. या कंपनीची चौकशी केली जात आहे. ही कंपनी सत्यजीत देशमुख यांच्या मालकीची आहे. सत्यजीत देशमुख हे अमेरिकास्थित लुईस बर्जरचे उपकंत्राटदार आहेत. तसेच ते वर्सोवा-वांद्रे सी लिंक प्रकल्पासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार असून मुंंबई कोस्टल रोड आणि मुंंबई-नागपूर एक्स्प्रेस वे या दोन इतर हाय-प्रोफाइल प्रकल्पांसाठी देखील ते उपसल्लागार आहेत. सत्यजीत देशमुख यांंनी ईडीकडे सादर केलेल्या निवेदनानुसार, इनोवेव्हने यापूर्वी कोणताही सल्लागार प्रकल्प केलेला नाही. तसेच सप्टेंबर…
नवीदिल्ली ः वृत्तसंस्था । गेल्या तीन वर्षांत सुमारे 10 हजार लोकांनी बेरोजगारीमुळे आत्महत्या केल्या असल्याची माहिती संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एका प्रश्नाच्या उत्तरात केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली. केंद्र सरकारच्या या उत्तरानंतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी बेरोजगारीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला चांगलेच घेरले. दरम्यान, भाजपा खासदाराने गुरुवारी राज्यसभेत अंबानी आणि अदानी यांची पूजा करावी असे म्हटले आहे. कारण ते लोकांना नोकऱ्या देत आहेत. बेरोजगारीवर सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये काल जोरदार वादावादी झाली. त्यावेळी भाजपा खासदार केजे अल्फोन्स यांंनी चर्चेत भाग घेत हे वक्तव्य केले आहे. “तुम्ही माझ्यावर भांंडवलदारांचे मुखपत्र असल्याचा आरोप करू शकता. मी अशा लोकांंची नावे घेतो ज्यांंनी या देशात नोकऱ्या निर्माण केल्या आहेत…
पुणे : वृत्तसंस्था । टीईटी पेपरफुटीप्रकरणी जीए सॉफ्टवेअर कंपनीचा संचालक अश्विनकुमार शिवकुमार याने परीक्षा परिषदेचा आयुक्त तुकाराम सुपे याला तब्बल 30 लाख रूपये दिले. शिवकुमारनेच ही माहिती पोलिसांना दिली आहे. त्यामुळे तुकाराम सुपे याच्या अडचणीत अधिक वाढ झाली आहे. 2018 मध्येच हे प्रकरण उघडकीला आले असते पण सुपे याने ते दाबून टाकले, अशी माहिती शिवकुमारकडून बाहेर आली आहे. टीईटी पेपरफुटीप्रकरणी सुपे आणि परीक्षा घेणाऱ्या जीए कंपनीचा संचालक डॉ. प्रितीश देशमुखचा एजंट संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ यांना अटक करण्यात आली आहे. बनावट प्रमाणपत्र आल्यावर सुपेने कारवाई का केली नाही, प्रमाणपत्र मिळालेले ते 18 विद्यार्थी कोण, असे प्रश्न यातून उपस्थित करण्यात येत…
मुंबई ः प्रतिनिधी । कर्नाटकमधील हिजाब वादावरुन सध्या देशभरात वातावरण तापलं आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये त्याचे पडसाद उमटत असून आंदोलनं केली जात आहेत. उडुपी जिल्ह्यातील कुंदापूर येथील सरकारी कनिष्ठ महाविद्यालयात हिजाब परिधान केलेल्या मुस्लीम विद्यार्थीनींना प्रवेश नाकारण्यात आल्यापासून या वादाला तोंड फुटलं. यानंतर देशभरातून प्रतिक्रिया उमटत असून बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या वक्तव्यांमुळे वाद निर्माण करणाऱ्या कंगना रणौतने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले मत मांडले आहे. कंगना रणौतने इन्स्टाग्रामला स्टोरी शेअर केली असून यामध्ये तिने महिला स्विमिंग सूटमध्ये बीचवर बसल्याचा आणि बुरख्यातील असा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “इराण. 1973 आणि…