फऱीदाबाद : वृत्तसंस्था । उंच इमारतींच्या गॅलरींमधून लहान मुलं खाली पडल्याच्या अनेक दुर्दैवी घटना आपण आजपर्यंत वाचल्या किंवा पाहिल्या असतील. पण एखाद्या आईनेच आपल्या मुलाला इमारतीच्या 10 व्या माळ्यावरुन लटकवल्याचे तुम्ही कधी ऐकले किंवा पाहिले नसे परंतु अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे ज्यामध्ये महिलेने चक्क आपल्या मुलालाच उंच इमारतीच्या गॅलरीतून खाली उतरण्यास भाग पाडले. फरिदाबादमध्ये ही घटना घडली आहे.
या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत महिला आपल्या मुलाला नवव्या माळ्यावरील गॅलरीत उतरवताना दिसत असून नंतर बेडशीटच्या सहाय्याने वरती खेचत असल्याचे दिसत आहे. पण असं करण्यामागचं कारण काय? कारण ऐकून तुमचाही संताप होईल. कारण महिलेने फक्त एका साडीसाठी आपल्या मुलाचा जीव धोक्यात टाकला होता.
महिलेची साडी खालच्या म्हणजेज नवव्या माळ्यावरील गॅलरीत पडली होती. घर बंद असल्याने ती साडी मिळवण्यासाठी महिलेने चक्क आपल्या मुलालाच गॅलरीतून खाली उतरवले.
फरिदाबादमधील सेक्टर 82 मध्ये गेल्या आठवड्यात ही घटना घडली. सोसायटीने महिलेला नोटीस बजावली असून महिलेने आपल्या निर्णयाचा खेद वाटत असल्याचे म्हटले आहे.