कुसुंबा प्रतिनिधी : श्री स्वामी समर्थ विद्यालय कुसुंबा तालुका जळगाव तर्फे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९२व्या जयंतीनिमित्त ३९२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन ढोलताशा,झाज,लेझीम उपक्रम राबवून उत्साहात साजरी केली. कुसुंबा ग्रामपंचायत, कार्यालयापासून ते दत्त मंदिर मिरवणूक काढण्यात आली होती.शाळेच्या प्रांगणात पाळणा पोवाडे व मर्दानी खेळ सादर केले. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मनोजकुमार पाटील सर मा.अध्यक्ष ग स सोसायटी जळगाव ,प्रमुख पाहुणे श्री समाधानराव पाटील आर एफ ओ वनक्षेत्र जामनेर,ग्रामपंचायत सदस्य भुषन पाटील,प्रमोद घुगे मुख्याध्यापिका सौ प्रतिक्षा पाटील मँड्म, सौ दिपाली भदाणे, सौ तनुजा मोती इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीते साठी श्री अविनाश घुगे, कल्पेश साळुंखे, कामिनी पाटील, सुरेखा सावकारे…
Author: saimat team
आज कुंसुंबा येथे अनोख्या पध्दतीने शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी भारतीय लष्कराच्या जवानांच्या सपत्नीक महाआरती करण्यात आली यावेळी शिवजन्मोत्सव सजीव देखावा व शिवजन्मोत्सव गित स्वामी समर्थ विद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थींनीं सादर केले यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी पथक व झेंडा सादर केली यावेळी शाळेतील सर्व मान्यवर व शिक्षक वृंद सहभागी होते तसेच शिवजयंती निमित्ताने कुंसुंबा दत्तमंदीर येथे अल्पदरात शासकिय योजना शिबीर (अभियान) राबविण्यात आले या कार्यक्रमाचे वेळी ग्रामपंचायत सदस्य प्रमोदभाऊ घुगे , इश्वर पाटील वसंत पाटील ,शैलेश साळुंखे , रविंद्र कोळी, विजय सोनार, निर्मल पाटील ,गणेश पाटील ,राजेंद्र पाटील ,भरत महाजन , योगेश घुगे , मुकेश पाटील ,किरण राजपुत व समस्त…
जळगाव प्रतिनिधी .येथील के.के. उर्दू गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज ची जयंती निमित्त विशेष कार्यक्रम मुख्याध्यापक श्री अकिल खान ब्यावली यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले आपल्या अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले की शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक असुन एक कुशल दुरदृष्टी व स्वाभिमानी राजा होते आज ची हि त्रासदीच म्हणावें लागले की एका महान व एकात्मता चे प्रतिक महान राजा चे परिचय एका विशिष्ट समुदायाची ओळख म्हणून प्रचलित होत चालली आहे म्हणून इतिहासकार व जानकारांची जबाबदारी आहे ती समाजा समोर वास्तविकता आनावी, शेख तबरेज़ यांनी हि महाराजांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरी चे वर्णन करुन माहिती…
जळगाव प्रतिनिधी बहुजन चळवळीतील जेष्ठ नेते , अन्यायाला सातत्याने प्रतिकार करून वंचित, शोषित, पिडीत घटकांसाठी अहोरात्र परिश्रम घेणारे लढाऊ संघर्षशील नेतृत्व मुकुंद सपकाळे यांना महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेतर्फे 2021 – 22 यावर्षीसाठीचा महात्मा फुले समता पुरस्कार घोषित केलेला आहे . सदर पुरस्कार दिनांक 20 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी 2 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात अल्पबचत भवन येथे महाराष्ट्राचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. गुलाबराव पाटिल यांच्या हस्ते देण्यात येणार आहे . अशी माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षक समता परिषदेचे राज्य अध्यक्ष भरत शिरसाठ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे . मुकुंद सपकाळे यांनी विद्यार्थीदशेपासुन विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज…
जळगाव प्रतिनिधी:– येथील सिध्दी विनायक विद्यालयात हिंदवी स्वराज्य निर्मितीचे जनक व महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त “बालशिवाजी” चित्ररथाचे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. तसेच विद्यालयातील प्राजंली शिंपी या विद्यार्थ्यांनीने “अफजल खानाचा वध” या घटनेवर प्रेरणादायी पोवाडा सादर केला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेच्या पदाधिकारी डॉ अमृता सोनवणे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मुख्य मुख्याध्यापक श्री आर पी खोडपे श्री गुलाबराव पाटील उपस्थित होते. विद्यालयातील रुचिता पाटील, केवल पाटील, पारस कोळी, स्वाती सोनवणे, यांनी वक्तृत्व स्पर्धेत सहभागी झाले कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री अनिल माकडे सत्यजीत वाघ, राहुल सोनवणे व शिक्षकवृंदानी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री अनिल पावरा…
जळगांव (प्रतिनिधी) मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशनच्या वतीने अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत व श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. आदर्श शिक्षक श्री. प्रवीण धनगर सर यांचा हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. या वेळी मौलाना आझाद अल्पसंख्याक फौंडेशनचे अध्यक्ष फिरोज शेख, सपना श्रीवास्तव, मनोज भालेराव सर, सागर पाटील सर, मोनाली कुमावत आदींनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
जळगांव (प्रतिनिधी):- अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत व श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती प्रगती विद्यामंदिर शाळेत ऑनलाईन तसेंच ऑफलाईन पद्धतीने उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेचे सचिव सचिन दुनाखे यांचा हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले.संस्थेचे चेअरमन प्रेमचंदजी ओसवाल यांनी छत्रपतीचे कार्य प्रेरणादायी आहे त्यांच्या कार्याचा अभ्यास करावा व जीवनात त्याचा अमल करावे असे मत व्यक्त केले. अध्यक्षा मंगलाताई दुनाखे यांनी ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.सूत्रसंचालन अलका करणकर तर आभार ज्योती बागुल यांनी केले. याप्रसंगी मुख्याध्यापक शोभा फेगडे,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
विवेकानंद प्रतिष्ठान संचालित काशिनाथ पलोड मध्ये महाराष्ट्राचे दैवत असलेले छत्रपती श्री. शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात व ढोल ताशांच्या गजरात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीच शाळेचे प्राचार्य श्री गणेश पाटील शाळेच्या समन्वयिका सौ.संगीता तळेले सौ.स्वाती अहिरराव, सौ.अनघा सागडे यांच्या हस्ते छत्रपती श्री. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून पूजन करण्यात आले. यानंतर शाळेच्या संगीत शिक्षिका सौ.स्वाती देशमुख व शिक्षक श्री. गणेश देसले, श्री. रवींद्र भोईटे यांनी व विद्यार्थ्यांनी गीत सादर केले. आजच्या दिवसाचे औचित्य साधत पुण्याचे डॉ. सुनिल रूपचंद धनगर यांचे इयत्ता सहावी ते नववी या विद्यार्थ्यांसाठी तरुणांनी शिवचरित्रातून शिकावे? या विषयावर व्याख्यानाचे ऑनलाइन आयोजन करण्यात आले .या व्याख्यानात डॉ. धनगर…
जळगाव प्रतिनिधी, रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविध्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ता. १९ शनिवार रोजी सकाळी ११ वाजता प्रशासन विभागातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास श्री. प्रकाश शर्मा, प्रा. गणेश पाटील, रजिस्टार अरुण पाटील, स्टोर इन्चार्ज अजय चौधरी, जनसंपर्क अधिकारी बापूसाहेब पाटील, ज्ञानेश्वर पाटील, मंगेश उपासनी, चंद्रकांत ढाकणे, महेंद्र ढोणे, आसिफ पिजारी, पवन अस्वार, कमलाकर सोनावणे, योगेश गनुरकर, राहुल कापडणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी, प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा यांनी कौतुक केले.
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष जावेद हबीब साहेब हे धुळे दौऱ्यावर आले असता त्यांनी दी.18 फेब्रुवारी 2022 रोजी , राष्ट्रवादी भवन येथे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागाची आढावा बैठक घेतली व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याकडून समस्या जाणून घेतली, त्यानंतर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभाग जिल्हाध्यक्ष सलीम शेख व शहराध्यक्ष जमीर शेख यांनी आपला कार्यअहवाल प्रदेशाध्यक्ष जावेद हबीब यांना सादर केला व त्यानंतर धुळे शहरातील राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभाग कार्याध्यक्ष अझर पठाण यांनी प्रदेशाध्यक्ष जावेद हबीब यांच्याशी चर्चा करीत धुळे शहरातील नागरिकांची समस्या व शहराच्या विकास कामांसाठी निधीची मागणी केली, व येत्या काळात आम्ही संघटन बांधणी करून शहरातील वेगवेगळ्या भागात…