चाळीसगाव : प्रतिनिधी (मुराद पटेल) तालुका व शहरी भागात मोठ्या प्रमाणावर हातमजुरी व गरीब कुटुंब आहे. काहींना इतर रुग्णालयात पैश्याअभावी उपचार घेता येत नाही व यात अनेक रुग्ण देखील दगावतात. कोट्यवधी रुपयांचे असलेले चाळीसगाव ग्रामीण रुग्णालय सर्व बाबीने जर उपचारासाठी खुले करण्यात आले तर त्याचा उपयोग सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांना मोठ्या प्रमाणावर लाभ मिळेल. तज्ञ डॉक्टराची नेमणूक करून अजून चांगल्या प्रकारे सेवा देण्यात यावी, असे निवेदन डॉ. मंदार करंबळेकर यांना पीपल्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने देण्यात आले. व रुग्णालय सुरू न झाल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा फाऊंडेशनच्या माध्यमातून देण्यात आला. यावेळी पीपल्स सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष आकाश पोळ, अतुल चौधरी, मुकेश कुमावत,गौरव…
Author: saimat team
चोपडा : प्रतिनिधी शहरातील कस्तुरबा माध्यमिक विद्यालयामार्फत छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवजन्मोत्सवानिमित्त सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीद्वारा आयोजित मुख्य कार्यक्रमात ‘झुलवा पाळणाने` या गीतावर अद्भूत असा देखावा निर्माण करीत दिमाखदार शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी या अनोख्या दिमाखदार सोहळ्याने अनेकांचे डोळे पाणावले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयापासून छत्रपती शिवाजी महाराज व जिजाऊ माँ साहेब यांची वेशभूषा धारण केलेले हितेश लोहार व गायत्री राठोड यांना रथावर आरूढ करून ढोल-ताशांच्या गजरात लेझीम पथक संचलनाने छत्रपती शिवाजी महाराज चौकात आणण्यात आले व तेथे कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी ‘माझे आरोग्य माझी जबाबदारी, मास्क लावा नाका तोंडाला पळवून लावा कोरोनाला, माझे कुटुंब माझी जबाबदारी` असे फलक…
भुसावळ : प्रतिनिधी (राकेश कोल्हे) छत्रपती शिवरायांची धर्मावर श्रद्धा असल्याने ते वैचारिक श्रीमंत ठरले. मातोश्री जिजाऊ, आईभवानी, रामकृष्ण महादेव आदी देवादीक, तुकोबांसारखे संत यांच्याविषयी विनम्रता दाखवत त्यांनी स्वराज्याची उभारणी केली. या सर्वांवर श्रद्धा ठेवण्याची शिकवण धर्माने शिवरायांना दिली. छत्रपतींची धर्मावर निष्ठा असल्याने स्वराज्याचे अशक्य स्वप्न अतुलनीय पराक्रमामुळे प्रत्यक्षात उतरले. धर्मसंस्काराच्या पायावर छत्रपतींच्या स्वराज्याची उभारणी झाली असल्याचे प्रतिपादन महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी केले. भुसावळ येथील छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय संस्थेतर्फे शिवजयंतीनिमित्त आयोजित शिवदर्शन सप्ताहाच्या समारोपीय व्याख्यानात ते बोलत होते. शिवदर्शन सप्ताहाची संकल्पना मांडणाऱ्या डॉ. जगदीश पाटील यांनी महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांचा परिचय करून दिला. ‘स्वराज्य आणि धर्म` या विषयावर…
यावल सुरेश पाटील): यावल येथे चोपडा रोडवर अक्षदा ढाब्याजवळ महाजन पेट्रोल पंपाच्या समोर श्री दादाजी सांप्रदाय पायी दिंडी सोहळ्याचे भव्य स्वागत. श्री दादाजी संप्रदाय गुरु परंपरा असलेल्या पायी दिंडी सोहळा सालाबाद प्रमाणे धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील श्री क्षेत्र दादाजी दरबार येथून सोमवार दि.14 फेब्रुवारी 2022 रोजी प्रस्थान झाली हा भव्य दिंडी सोहळा अमळनेर,चोपडा मार्गावरून मध्यप्रदेशात खंडवा येथे श्री क्षेत्र दादाजी धाम येथे जाताना मंगळवार दि.22रोजी सकाळी 7:30 वाजता यावल येथे चोपडा रोडवर महाजन पेट्रोल पंपाजवळ, अक्षदा ढाबा संचालक अमृत पाटील,राकेश पाटील यांच्यासह श्री दादाजी सांप्रदायातील शेकडो भक्तगणांनी,भाविकांनी नागरिकांनी उपस्थित राहून दिंडी सोहळ्याचे भव्य स्वागत केले तसेच श्री श्री…
जळगाव गेल्या पंधरा दिवसांपासून बंद असलेली जळगाव-मुंबई विमानसेवा सेवा उद्या बुधवारीपासून पुन्हा सुरु होणार आहे. तर अहमदाबाद विमान सेवेसाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान, जळगाव-मुंबई विमानसेवा सेवा सुरु होणार असल्याने प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे. तांत्रिक कारणामुळे मागील गेल्या १५ दिवसापासून जळगाव-मुंबई विमानसेवा सेवा बंद करण्यात आलेली होती. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती, परंतु आता उद्यापासून ही सेवा पुन्हा सुरु होणार आहे. तर अहमदाबाद विमान सेवेसाठी 15 मार्चपर्यंत वाट पहावी लागणार आहे. ट्रु-जेट कंपनीच्या व्यवस्थापकीय समस्या व एअरक्राफ्ट दुरुस्तीच्या कारणाने सेवा 7 फेब्रुवारीपासून बंद आहे. कंपनीतर्फे आरसीएस उपक्रमांतर्गत देशात 26 विमान तळांवर सेवा दिली जाते. या सर्व…
भुसावळ प्रतिनिधी (राकेश कोल्हे) भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी चार गावठी पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसांसह २० वर्षीय तरुणाला भुसावळात पकडले. दीपसिंह गुरुमुखसिंह कलानी असे संशयिताचे नाव असून, तो खरगोन जिल्ह्यातील रहिवासी आहे. बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांना शस्त्र तस्कराबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी बाजारपेठ पोलिसांना कारवाईचे आदेश दिले होते. बसस्थानकाजवळील रेल्वे हेरीटेजवळून रविवारी रात्री 10.24 वाजेच्या सुमारास संशयीत दीपसिंह कलाणी यास ताब्यात घेवून बाजारपेठ पोलिस ठाण्यात आणण्यात आले. पंचांसमक्ष संशयीताकडील पांढर्या रंगाच्या पिशवीतून चार गावठी कट्टे जप्त करण्यात आले तसेच संशयीताच्या अंग झडतीतून पाच जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. शहरात गावठी कट्टा विक्रीसाठी आणल्याची व बाळगल्याची बाब नवीन नाही मात्र एकाचवेळी…
जळगाव प्रतिनिधी शेतीच्या सातबारा उतार्यावरील तक्रारदाराच्या बहिणीचे नाव कमी करून देण्यासाठी पाच हजाराची लाच घेताना यावल तालुक्यातील मालोद येथील तलाठी कार्यालयातील कोतवालास जाळ्यात अडकला आहे. हमीद जहांगीर तडवी (रा.किनगाव, ता.यावल) असे लाचखोर कोतवालाचे नाव असून त्याला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. मालोद येथील तलाठी कार्यालयात कोतवाल पदावर कार्यरत असलेला कर्मचारी जहांगिर तडवी याने तक्रारदाराकडून ५ हजाराची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदार याने लाचलुचपत विभागाला तक्रार दिली होती. लाचलुचपत विभागाने मंगळवार २२ फेब्रुवारी रोजी तालुक्यातील किनगाव मंडळाधिकारी कार्यालयाच्या बाजूला असलेल्या एका स्टेशनरी दुकानासमोर तक्रारदाराकडून ५ हजाराची लाच स्विकारतांना कोतवाल हमीद…
जळगाव प्रतिनिधी जळगाव शहरातील बळीराम पेठ परिसरात वसुलीसाठी गेलेल्या महावितरण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आल्याची घटना मंगळवारी सकाळी १०.३० च्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ सागर प्रल्हाद पाथरवट (वय-३०) हे मंगळवारी सकाळी १०.३० च्या सुमारास सहाय्यक अभियंता रोहित गोवे यांच्यासह बळीराम पेठेत वसुलीसाठी गेले होते. गंगाराम देवरे यांच्या घरात गणेश वसंत कुलकर्णी हे राहतात. ३२ हजार ६९० वसुली बाकी असल्याने महावितरणच्या पथकाने बिलाबाबत विचारणा केली. कुलकर्णी यांनी नकार दिल्याने पथकाने त्यांचे मीटर काढून मेन सर्व्हिस वायर काढली. वीज कनेक्शन कट केल्याचा राग आल्याने कुलकर्णी याने शिवीगाळ केली तसेच…
जळगाव प्रतिनिधी शहरातील एका कॉलनीत प्रेमसंबंधाच्या कारणावरून तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना रविवारी रात्री ११ वाजता घडली. त्यात तरुणाची गंभीर दुखापत झाली असून प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, याप्रकरणी सोमवारी दुपारी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीनुसार, रविवारी रात्री धरणगाव तालुक्यातून जळगाव शहरातील घरी आल्यावर मुलाला किराणा दुकानावर झाला. दूध घ्यायला पाठविले असता तेथून परत येत असताना सम्राट कॉलनीत एका तरुणाने रस्त्यात अडवून तुझे माझ्या बहिणीसोबत प्रेमसंबंध आहेत, या कारणावरून त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली असता मुलाला काही लोकांनीच शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. ज्या मुलावर…
जामनेर /प्रतिनिधी _ १९ फेब्रुवारी रोजी श्री संत नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने शहरातील सुवर्ण कार समाज बांधवांच्या वतीने समाज कार्यालयात मोठ्या थाटात साजरी करण्यात आली. संत नरहरी महाराज यांच्या प्रतिमेस अध्यक्ष. प्रदीप अशोक विसपुते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच पादुका पूजन खजिनदार नरेंद्र पद्माकर सोनार यांच्या हस्ते तर दीप प्रज्वलन . किशोर दुसाने यांच्या हस्ते करण्यात आले. त्याच बरोबर सुश्राव्य किर्तनाचा कार्यक्रम साजरा सुद्धा करण्यात आला,या वेळी समाजाचे सचिव . दिपक बाविस्कर, जेष्ठ सदस्य. सुधाकर सराफ,डॉ. मनोज दादा विसपुते,विनायक विसपुते, छोटु विसपुते , रमेश दंडगव्हाल, सुरेश दुसाने, देवानंद सोनार, दिलीपसेठ भामरे, दिलीप सोनार,संदीप विसपुते, सुभाष…