जळगाव हेमंत काळूंखे जळगाव केंद्रावरील राज्य मराठी हौशी नाट्य स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भुसावळच्या ब्राह्मण संघाने सादर केलेल्या ‘एक विस्कटलेला चौकोन` या नाटकाने रसिकांवर प्रभाव पाडण्यात व प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवण्यात यश प्राप्त केले व नाट्यस्पर्धेत चुरस निर्माण केली.त्याबद्दल सर्वप्रथम भुसावळ ब्राह्मण संघाच्या सर्व टीमचे अभिनंदन. नाट्यसंहितेपासून काही किरकोळ दोष सोडले तर दिग्दर्शन,अभिनय,संवादफेक,नेपथ्य ,संगीत,वेशभूषा,प्रकाश योजनाय या सर्व बाजू भक्कमपणे सादर करण्याचा प्रयत्न निश्चितच वाखाणण्याजोगा म्हणावा लागेल.या नाटकाने स्पर्धेत रंगत आणली असून यानंतर सादर होणाऱ्या नाटक व त्यांच्या टीमला सावध केले आहे.एकंदरीत ‘एक विस्कटलेला चौकोन` हे नाटकाचे नाव असले तरी प्रभावी सादरीकरणामुळे ‘एक मजबूत व भक्कम घडी असलेला चौकोन` असेच म्हणावे लागेल.…
Author: saimat team
जळगाव ः प्रतिनिधी येथील घटनेचा तेली समाजातर्फे निषेध करण्यात आला. तसेच घटनेचा निःपक्षपणे तपास करून पिडीत बालिकांना न्याय द्यावा, अशा मागणी निवेदन पोलीस अधिक्षक डॉ.प्रविण मुंढे यांना देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, धरणगाव येथे सहा व आठ वर्षीय बालिकांवर करण्यात आलेल्या अत्याचाराने तेली समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. हा गुन्हा अत्यंत निंदनीय व घृणास्पद असल्यामुळे या घटनेचा तपास निःपक्षपातीपणाने करावा, असे निर्देश स्थानिक पोलीस स्टेशनला देण्यात यावे, आरोपीला जामीन मिळू नये असे गंभीर स्वरुपाचे कलम लावण्यात यावे, नुकताच महाराष्ट्र सरकारने पारीत केलेला शक्ती या बिलाअंतर्गत 15 दिवसात दोषारोप दाखल करावे, या खटल्यासाठी अभ्यासी सरकारी वकिलाची नेमणूक करण्यात यावी,…
धरणगाव : जिल्हा प्रतिनिधी (वसंत भोलाणे ) चोरगाव शिवारात गेल्या दोन महिन्यापासून धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेरीस मंगळवारी रात्री वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. यामुळे स्थानिक नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. 14 फेब्रुवारी रोजी चोरगाव येथे मंगल विठ्ठल सोनवणे यांच्या गोठ्यात बांधलेल्या वासराचा फडशा बिबट्याने पडला. यापूर्वी 27 जानेवारी रोजी चोरगाव येथेच दोन वासरे बिबट्याने फस्त केली होती. आव्हाणी येथेदेखील गुरांवर हल्ला केला होता. सतत घडत असलेल्या घटनांमुळे नदीकाठावरील चोरगाव, नंदगाव, देवगाव, फुकणी, नारणे, आव्हाणी, दोनगाव या गावांमधील ग्रामस्थ, शेतकरी भयभीत झालेले होते. शेतकरी रात्री पिकांना पाणी द्यायला जाण्यासाठी जीव मुठीत धरून जात होते. गुरे चारणाऱ्यांना बिबट्याची दहशत झाली होती. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी…
जळगाव ः प्रतिनिधी (उमेश दंडगव्हाळ) तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारातून पिडीता गर्भवती झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी पिडीत बालिकेच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर असे की, जळगाव तालुक्यातील एका गावात 14 वर्षीय आपल्या नातेवाईकांसह वास्तव्यास आहे. सदर पिडीतेशी 10 ते 15 नोव्हेंबर 2021 दरम्यान, संशयित आरोपी एजाज खान जहिर खान रा.गुजरात त्याने पिडीत मुलीशी जवळीक साधत दोन वेळा अत्याचार केला. त्या अत्याचाराच्या प्रसंगातून पिडीत मुलगी गर्भवती राहिली सदर प्रकार मंगळवारी 22 फेबु्रवारी रोजी पिडीत मुलीच्या पोटात दुखायला लागले तेव्हा तिच्या पालकांनी तिला जिल्हा शासकीय महाविद्यालयात उपचारासाठी आणले…
विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी जुन्या पेन्शनसह विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी बुधवारी दि.२३ आणि दि.२४ दोन दिवस राज्यभर दोन दिवसीय संप पुकारण्यात आलेकला आहे.या संपात सहभागी होण्यासाठी मंगळवारी सोयगाव तहसील कार्यालयातील तालुका महसूल संघटनेच्या वतीने तहसीलदार रमेश जसवंत यांना संपाचे निवेदन सादर करण्यात आले आहे.संघटनेचे तालुकाध्यक्ष शरद पाटील,उपाध्यक्ष राजेंद्र नारळे यांच्या अध्यक्षतेखाली तालुका महसूल संघटनेच्या वतीने संपाचे निवेदन दिले आहे. जुन्या पेन्शनचं मागणी सह राज्यातील शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या शासन स्तरावरील प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी राज्य महसूल कर्मचारी संघटनेने संप पुकारला आहे.त्यामुळे सोयगाव तालुका मह्सुक्ल कर्मचारी संघटनेच्या वतीने अध्यक्ष शरद पाटील,उपाध्यक्ष राजेंद्र नारळे यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह मंगळवारी तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.दिलेल्या…
जळगाव ः प्रतिनिधी शहरा लागून असलेल्या कोल्हे हिल्स् परिसर, सावखेडा शिवार येथील नागरिक विविध समस्यांपासून मागील 5 वर्षापासून विविध समस्या जसे की पिण्याचे पाणी, रोड रस्ते, गटारी इ. त्रस्त आहेत. यामुळे शहरातील कोल्हे हिल्स् परिसरातील महिलांनी ‘जल’साठी हंडा मोर्चा काढला तर यावेळी मनसे मात्र आक्रमक झाल्या आहे. यामध्ये प्रामुख्याने पिण्याचे पाण्याची काहीएक सुविधा नाही, त्यांच्या परिसरात ज्या बोअरवेल वरुन पाणी मिळत होते त्या सुध्दा आता उन्हाळा सुरु झाल्याने त्यांची पातळी खोलवर गेली असून त्या बंद झालेल्या आहेत. मग त्यांनी जायचे कुणीकडे? तसेच संबंधित रहिवाशी नेहमी न चुकता घरपट्टी, करपट्टी इत्यादी शासनाच्या वेळेवर भरणा करीत आलेले आहेत परंतु त्यांचेकडे कुणीच लक्ष…
पहुर प्रतिनिधी जामनेर तालुक्यातील पहूर कसबे ग्रामपंचायत हद्दीतील वाघुर नदीतील फरशी वरील खड्डा त्वरित बुजविण्याची मागणी केली जात आहे. पहूर येथील रहिवाशी पत्रकार किरण जाधव यांनी पहुर कसबे ग्रामपंचायतला निवेदन दिले असून त्या निवेदनात म्हटले आहेत की, पहूर कसबे ग्रामपंचायत हद्दीतील वाघुर नदीवरील फरशीवर मोठा खड्डा पडला असून या परशीवरून अनेक नागरिक मोटरसायकलवरून, पायी येत जात असतात तसेच शेतात जाणाऱ्या बैलगाड्या व छोटे वाहने या परशीवरुन वापरत असतात या परशीवरील खड्ड्यामुळे याठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता असून येथील खड्डा त्वरित व चांगला बुजवावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे निवेदनावर किरण जाधव यांची स्वाक्षरी आहेत.
पाचोरा प्रतिनिधी (गणेश शिंदे) पाचोरा शहराच्या बाहेरून जाणाऱ्या मुक्ताईनगर-नांदगाव या राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड अपघातांचे प्रमाण वाढले असून अनेकांना अपघातात प्राण गमवावे लागले आहेत तर काहींना अपंगत्व देतील आले असल्यामुळे भविष्यातील अपघात टाळावेत म्हणून या महामार्गावर तात्काळ गतिरोधक बसवण्यात यावेत अशी मागणी नगर परिषदेचे राष्ट्रवादीचे गटनेते संजय वाघ यांनी केली आहे. चाळीसगाव ते जळगाव हा राज्य मार्ग क्रमांक १९ चे रूपांतर आता राष्ट्रीय महामार्गामध्ये झाले आहे. त्याबाबत राजपत्रही घोषित करण्यात आले आहे.अशोक बिल्डकॉमने हे काम केले असून या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाल्याने वाहनधारकांची मोठी अडचण होत होती.आता हा संपूर्ण रस्ता कॉंक्रिटचा झाल्याने या मार्गाचे स्वरूप पालटले आहे.राज्य महामार्ग आता राष्ट्रीय महामार्ग…
धरणगाव: जिल्हा प्रतिनिधी धरणगाव शहरात सहा व आठ वर्षाच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज शहरात प्रचंड निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले. मोर्चाच्या वतीने धरणगाव पोलीस निरीक्षक श्री. शेळके व नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. मोर्चाची सुरुवात धरणगाव येथील बालाजी मंदिरापासून कोड बाजार, परीहार चौक व शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ विसर्जन करण्यात आले. मोर्चामध्ये धरणगाव शहरातील सर्व जाती धर्माचे महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चाला सुरुवात सकाळी नऊ वाजता झाली व अकरा वाजता मोर्चाचे विसर्जन करण्यात आले तसेच आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी म्हणून मोर्चाच्या वतीने प्रशासनाकडे मागणी करण्यात आली. या मोर्चाचे नेतृत्व माजी नगराध्यक्ष…
अमळनेर : प्रतिनिधी येथील जीएम सोनार नगर येथील भाविकांचे श्रद्धास्थान संत गजानन महाराज यांचा आज 23 फेब्रुवारी रोजी प्रकट दिनानिमित्ताने मंदिराचा प्रवेशद्वाराचे उद्घाटन, पाद्यपूजन, महिलांचे सामुहिक पारायण व महाप्रसादाच्या कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. संत गजानन महाराज मंदीर परिसरात मंडप, डेकोरेशन, रांगोळी काढून आजूबाजूचा परिसर भक्तीमय झाला. सकाळी सात ते नऊ पाद्यपूजन मंदिराचे पुजारी नितीन भावे, जितेंद्र कोठावदे, ज्योती पवार, कल्याणी भावे, अशोक भावे, ह.भ.प.रघूनाथ पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. सकाळी 8 वाजता ज्योती पवारसह सर्व गजानन महाराज महिला भक्तांनी सामूहिक पारायण केले. त्यानंतर दुपारी 12 वाजता महाप्रसादाचा आनंद गजानन भक्तांनी घेतला. प्रकट दिनानिमित्त अमळनेर शहरातील कर्तृत्व, नेतृत्व, दातृत्व यांचा त्रिवेणी…