नंदुरबार (प्रतिनिधी) येथील बालवीर चौक नवा भोईवाडा परिसरातील शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे शिवजयंतीनिमित्त मंगलाष्टके होण्यापूर्वी हळदीच्या अंगाने वधूवरांच्या हस्ते शिव पूजन करण्यात आले. नंदुरबार येथील गवळीवाडा भागातील संतोष देमाजी घुगरे यांची सुकन्या चि. सौं. का. भाग्यश्री आणि धुळे मोगलाई येथील राजेंद्र बिडकर यांचे चिरंजीव विवेक यांचा विवाह दिनांक 19 रोजी होता. उपवर वधु वरांनी बोहल्यावर चढण्यापूर्वी आणि अक्षदा पडण्यापूर्वी छत्रपती शिवरायांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन शिवपुजन केले. शहीद शिरीषकुमार मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे यांच्या संकल्पनेतून वधू-वरांच्या हस्ते शिव पूजन करण्यात आले. याप्रसंगी बालवीर चौकात शिवराज्याभिषेक सोहळ्याची प्रतिमा आणि भगवे ध्वज यांनी परिसर सजविण्यात आला होता. …
Author: saimat team
केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालय जळगांव येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम शाळेच्या मुख्या.रेखा पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची महिमा भाषणे , गीते , पोवाडे सादर करून स्पष्ट केली. प्रसंगी सर्व विद्यार्थी शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
जामनेर प्रतिनिधी जामनेर तालुक्यातील पहूर ग्रामपंचायत मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित अध्यक्षीय भाषणातून शिवसेना प्रवक्ते तथा पत्रकार गणेश पांढरे यांनी बोलताना सांगितले की आजही शिवकालीन रस्ते जिवंत असल्याचं त्यांनी सांगितले राज्यातील प्रमुख महामार्ग शिवकालीन आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात सर्व धर्माच्या लोकांना शिवाजी महाराजांनी महत्त्वाचे स्थान दिले आहे तरुणांनी नाचून नाही तर वाचून शिवाजी महाराजांची जयंती साजरी करावी असे आव्हान केले या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी कृषी सभापती प्रदीप लोढा माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे धनगर समाज उत्तर महाराष्ट्र प्रमुख रामेश्वर पाटील उपसरपंच श्याम सावळे माजी उपसरपंच ईका पैलवान सलीम मौलाना राजू पाटील सर शैलेश पाटील…
जामनेर (प्रतिनिधी):- शहरात आमदार गिरीष महाजन व नगराध्यक्षा सौ. साधना महाजन यांच्या हस्ते सकाळी १० वाजता राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ चौकात व नगर परिषद मधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जामनेर तालुका एजूकेशन चे सचिव जितेंद्र पाटील, भाजपा तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, सिने ट सदस्य दीपक पाटील, उपनगराध्यक्ष प्रा. शरद पाटील, गटनेते डॉ. प्रशांत भोंडे, नगरसेवक महेंद्र बावीस्कर, बाबूराव हिवराळे, नाना वाणी, उल्हास पाटील, शेख रिजवान, खलील भांजा,अतिश झा लटे, यांच्यासह डॉ. संजीव पाटील, जे के चव्हाण, बाबूराव गवळी, शंकर राजपूत, कैलास पालवे, सुभाष पवार, दत्तू काळे, विनोद माळी, डॉ. बाजीराव पाटील, नितीन झाल्टे,…
पाळधी प्रतिनिधी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जीपीएस शैक्षणिक परिवारातर्फे आज दिनांक 19 -2- 2022 रोजी, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री प्रतापरावजी पाटील,माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री डी.डी. कंखरे सर,इंग्लिश मीडियम चे प्रिंसिपल श्री सचिन पाटील सर, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री योगेश करंदीकर सर, माध्यमिक विद्यालयाचे श्री आर. व्ही.पाटील सर, श्री श्याम पाटील सर, सौं. वाघोदे मॅडम, यांनी शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले.कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचालन सौं.आरती पाटील मॅडम यांनी केले. प्रा.मोनिका पाटील यांनी पावनखिंडीच्या प्रसंगावर कविता सादर करून सर्वांची मने जिंकली.प्रा.भूषण पाटील सरानी आजच्या काळात शिव…
पाचोरा शिवजयंती मोठया उत्स्फूर्तपणे साजरी करण्यात आली .हजारो शिवभक्तांनी शिवाजी महाराजांना मुजरा केला खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज जयंती हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सण व उत्सव आहे. हा सण मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे हा सण १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुटी असते.पाचोरा शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजना सकाळी ७ वा डॉ भूषण मगर यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले तसेच ९ वा आ किशोर पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासक सभापती मा दिलीप वाघ नगरसेवक संजय वाघ नगरसेवक भूषण वाघ सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष मनोज शांताराम पाटील…
मलकापूर प्रतिनिधी तालुक्यातील मौजे ग्राम वाकोडी येथील श्रावस्ती बुद्धविहार येथे माघ पौणीमा निमीताने संघमीत्रा उपासक संघा तर्फे धम्म प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी पु.भंदन्त आनंद महाथेरो नागपुर हे प्रवचनातून धम्मदेसना देताना म्हणाले की तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा महान धम्म त्याच बरोबर त्रिशरण पंचशील आपल्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिले त्याचे पालन घराघरांमध्ये झाल्याने मानवाचे कल्याण होणार आहे. यावेळी भन्तेजी यांनी तथागत भगवान बुद्ध ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेचे दीप प्रज्वलित करून पुष्प अर्पण केले व बौद्ध उपासक उपासीका याना त्रिशरण पंचशीलाचे महत्व सांगीतले व आर्यअष्टांगिक मार्गाचा अवलंब करणे दहा पारमिता विषयावर धम्म प्रवचन केले आहे. त्यावेळी वाकोडी येथील बौद्ध उपासक…
भुसावळ प्रतिनिधी – स्वराज्य उभारणीत छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरापगड जातींना सामावून घेतले. परंतु सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे महिलांचा सामाजिक दर्जा उंचावण्यासाठी त्यांनी केलेल्या सुधारणा, नियम आणि उचललेली कठोर पावले म्हणजे स्त्रीमुक्तीसाठी केलेली क्रांतीच होती. महिलांचा आदर करण्याची प्रेरणा शिवचरित्र नेहमीच देत राहील, असे प्रतिपादन हभप गंगाधर महाराज कुरूंदकर (हिंगोली) यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय संस्थेतर्फे शिवजयंतीनिमित्त आयोजित शिवदर्शन सप्ताहात ‘शिवरायांचा महिलाविषयक दृष्टिकोन’ या विषयावर हभप कुरूंदकर बोलत होते. हभप गंगाधर महाराज यांचा परिचय डॉ. जगदीश पाटील यांनी करून दिला. हभप कुरूंदकर यांनी ‘शिवराय मनामनात’ हे गीत म्हटले. त्यानंतर ते म्हणाले की, तुकोबांनी कीर्तनाच्या माध्यमातून जनमुक्ती व जनआंदोलन केले.…
जळगाव प्रतिनिधी (इकरा नगर)- येथील इकरा शिक्षणशास्त्र महाविद्यालयात दिनांक 16 व 17 फेब्रुवारी रोजी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. 17 फेब्रुवारी रोजी क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्यानंतर आज दिनांक 18 फेब्रुवारी रोजी फूड फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. फूड फेस्टिव्हलचे उद्घाटन कॉलेज चे चेअरमन मा. अब्दुल रऊफ शेख यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार, संस्थेचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. इरफान शेख, सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या फूड फेस्टिवल ला इकरा नगर येथील विविध शैक्षणिक संस्थांचे प्रमुख, इकरा डी.एड. कॉलेजचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी भेट दिली व विविध…
जळगाव प्रतिनिधी : प्रत्येक घरात नळाचे शुध्द पाणी पोहचवण्याचा संकल्प केंद्र व राज्य शासनाच्या जलजीवन मिशनच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. याच योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील तब्बल १७१ गावांना पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या असून यासाठी ३३६ कोटी ५३ लक्ष रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या ऐतिहासीक क्षणाची साक्ष म्हणून या सर्व गावांच्या सरपंचांना बोलावून त्यांना प्रशासकीय मान्यतेचे प्रमाणपत्र देण्यात आल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. योजना मंजूर झालेल्या गावांच्या सरपंचांनी अचून नियोजन करून आपल्या गावातील प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहचवण्याचे आवाहन करतांना याबाबत पालकमंत्र्यांनी त्यांना आवश्यक त्या सूचना देखील दिल्यात. दरम्यान, एकाच वेळेस एका जिल्ह्यातील १७१ गावांना पाणी…