Author: saimat team

विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी सोयगाव तालुक्यातील मौजे.कंकराळा येथे दि.19 रोजी ग्रामपंचायत कार्यालय कंकराळा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली , यावेळी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले , उपस्थित ग्रामसेवक एस.बी.पुल्लेवाड , मुख्याध्यापक एस.आर.खाकरे , बिलओ महेश गवांदे , युवासेनेचे कुणाल राजपुत , ईश्वर श्रीरसागर , जयेश पाटील , प्रकाश पाटील , ग्रामरोजगार सेवक प्रताप उबाळे , बबलु राजपुत , आकाश मख , भास्कर पाटील ,दत्तु हिवराळे , दिपक पाटील , शंकर लव्हाळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Read More

जळगाव – प्रतिनिधी  येथील ईस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटी संचलित आर आर विद्यालयात आज दिनांक १९ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य मुख्य प्राध्यापक श्री पी आर श्रावगी उपस्थित होते. याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षिका सौ प्रतिमा याद्निक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले. यावेळी उपमुख्याध्यापक श्री डी. डी. पाटील ,ज्येष्ठ शिक्षक श्री बी. एन. पानपाटील , श्री . कलंत्री श्री, संजय पिले आदी उपस्थित होते. संगीत शिक्षक संजय क्षीरसागर यांनी महाराष्ट्र गीत व पोवाडा सादर केला. त्यांना साथसंगत संगीत शिक्षिका सौ प्रांजली रस्से, श्री संजय पिले यांनी दिले. शाळेतील शिक्षक श्री डी.…

Read More

विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज ,संत सेवालाल महाराज, संत गाडगे महाराज, संत रविदास महाराज जयंती निमित्त व सामाजिक भावनेतून सोयगांव शिक्षक भारती व सोयगांव पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबीराला रक्तदात्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला असून रक्तदात्यांनी रक्तदानाचे शतक पर्ण करून या रक्तदान शिबीरात रक्तदान करून पवित्र कार्य केले असून सर्व प्रथम शहरातील मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज,संत सेवालाल महाराज संत गाडगे महाराज,संत रवीराज महाराज यांच्या प्रतिमे पुजन मान्यवरांच्या हस्ते करून रक्तदान शिबीराची सुरुवात करण्यात आली.रक्तदान शिबीरास नगराध्यक्षा आशाबी तडवी उपनगराध्यक्षा सुरेखा काळे,गटविकास अधिकारी नाईक साहेब यांच्या सह मान्यवरांनी रक्तदान शिबीरात भेट दिली. शिक्षक,पत्रकार,पोलीस,ग्रामस्थ,व्यापारी,डाँक्टर, शेतकरी,तरुण वर्गांनी…

Read More

जळगाव प्रतिनिधी  शहरातील शिवाजी महाराज पुतळ्या जवळ कोर्ट चौकात एक भव्य बॅनर लावण्यात (३२×१५) आले होते त्यावर महाराजांचे आयुष्य चित्र स्वरूपात उभे करण्यात आले होते त्याला संपूर्ण बुरुजाचा देखावा देण्यात आला होता. मावळे, सरदार, पेशवे, भालदार, अशी पोशाख घातलेले सदस्य त्या वेळी उपस्थित होते. शिवतीर्थ मैदानावरून पायी मिरवणूक काढून महाराजांची पितळी मूर्ती हातात घेत जिल्ह्याचे पालक मंत्री गुलबराव पाटील,महापौर जयश्रीताई महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील,शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, माजी महापौर नितीन लढ्ढा, माजी मंत्री गुलाबराव देवकर,पोलीस उपनिरिक्षक कुमार चिंथा,पीपल्स बँकेचे चेअरमन अनिकेत पाटील, माजी चेअरमन तथा संचालक भालचंद्र पाटील आदींची उपस्थिती होती.. शिवाजी महाराजांना मानवंदना देत मुजरा करण्यात आला व…

Read More

 कुसुंबा प्रतिनिधी  : श्री स्वामी समर्थ विद्यालय कुसुंबा तालुका जळगाव तर्फे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९२व्या जयंतीनिमित्त ३९२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन ढोलताशा,झाज,लेझीम  उपक्रम राबवून उत्साहात साजरी केली. कुसुंबा ग्रामपंचायत, कार्यालयापासून ते दत्त मंदिर मिरवणूक काढण्यात आली होती.शाळेच्या प्रांगणात पाळणा  पोवाडे व मर्दानी खेळ सादर केले. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मनोजकुमार पाटील सर मा.अध्यक्ष ग स सोसायटी जळगाव ,प्रमुख पाहुणे श्री समाधानराव पाटील आर एफ ओ वनक्षेत्र जामनेर,ग्रामपंचायत सदस्य भुषन पाटील,प्रमोद घुगे मुख्याध्यापिका सौ प्रतिक्षा पाटील मँड्म, सौ दिपाली भदाणे, सौ तनुजा मोती इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीते साठी श्री  अविनाश घुगे, कल्पेश साळुंखे,  कामिनी पाटील, सुरेखा सावकारे…

Read More

आज कुंसुंबा येथे अनोख्या पध्दतीने शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी भारतीय लष्कराच्या जवानांच्या सपत्नीक महाआरती करण्यात आली यावेळी शिवजन्मोत्सव सजीव देखावा व शिवजन्मोत्सव गित स्वामी समर्थ विद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थींनीं सादर केले यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी पथक व झेंडा सादर केली यावेळी शाळेतील सर्व मान्यवर व शिक्षक वृंद सहभागी होते तसेच शिवजयंती निमित्ताने कुंसुंबा दत्तमंदीर येथे अल्पदरात शासकिय योजना शिबीर (अभियान) राबविण्यात आले या कार्यक्रमाचे वेळी ग्रामपंचायत सदस्य प्रमोदभाऊ घुगे , इश्वर पाटील वसंत पाटील ,शैलेश साळुंखे , रविंद्र कोळी, विजय सोनार, निर्मल पाटील ,गणेश पाटील ,राजेंद्र पाटील ,भरत महाजन , योगेश घुगे , मुकेश पाटील ,किरण राजपुत व समस्त…

Read More

जळगाव प्रतिनिधी .येथील के.के. उर्दू गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज ची जयंती निमित्त विशेष कार्यक्रम मुख्याध्यापक श्री अकिल खान ब्यावली यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले आपल्या अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले की शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक असुन एक कुशल दुरदृष्टी व स्वाभिमानी  राजा होते आज ची हि त्रासदीच म्हणावें लागले  की एका महान व एकात्मता चे प्रतिक महान राजा चे परिचय एका विशिष्ट समुदायाची ओळख म्हणून प्रचलित होत चालली आहे म्हणून इतिहासकार व जानकारांची जबाबदारी आहे ती समाजा समोर वास्तविकता आनावी, शेख तबरेज़ यांनी हि महाराजांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरी चे वर्णन करुन माहिती…

Read More

जळगाव प्रतिनिधी   बहुजन चळवळीतील जेष्ठ नेते , अन्यायाला सातत्याने प्रतिकार करून वंचित, शोषित, पिडीत घटकांसाठी अहोरात्र परिश्रम घेणारे लढाऊ संघर्षशील नेतृत्व मुकुंद सपकाळे यांना महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेतर्फे  2021 – 22  यावर्षीसाठीचा महात्मा फुले समता पुरस्कार घोषित केलेला आहे . सदर पुरस्कार दिनांक 20 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी 2 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात अल्पबचत भवन येथे  महाराष्ट्राचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. गुलाबराव पाटिल यांच्या हस्ते देण्यात येणार आहे . अशी माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षक समता परिषदेचे राज्य अध्यक्ष भरत शिरसाठ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे .     मुकुंद सपकाळे यांनी विद्यार्थीदशेपासुन विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज…

Read More

जळगाव प्रतिनिधी:– येथील सिध्दी विनायक विद्यालयात हिंदवी स्वराज्य निर्मितीचे जनक व महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त “बालशिवाजी” चित्ररथाचे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. तसेच विद्यालयातील प्राजंली शिंपी या विद्यार्थ्यांनीने “अफजल खानाचा वध” या घटनेवर प्रेरणादायी पोवाडा सादर केला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेच्या पदाधिकारी डॉ अमृता सोनवणे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मुख्य मुख्याध्यापक श्री आर पी खोडपे श्री गुलाबराव पाटील उपस्थित होते. विद्यालयातील रुचिता पाटील, केवल पाटील, पारस कोळी, स्वाती सोनवणे, यांनी वक्तृत्व स्पर्धेत सहभागी झाले कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री अनिल माकडे सत्यजीत वाघ, राहुल सोनवणे व शिक्षकवृंदानी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री अनिल पावरा…

Read More

जळगांव (प्रतिनिधी) मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशनच्या वतीने अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत व श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. आदर्श शिक्षक श्री. प्रवीण धनगर सर यांचा हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. या वेळी मौलाना आझाद अल्पसंख्याक फौंडेशनचे अध्यक्ष फिरोज शेख, सपना श्रीवास्तव, मनोज भालेराव सर, सागर पाटील सर, मोनाली कुमावत आदींनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

Read More