Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»धुळे»Dhule Municipal Corporation Elections : धुळे मनपाच्या निवडणुकीत चार-चार नगरसेवकांचे प्रभाग
    धुळे

    Dhule Municipal Corporation Elections : धुळे मनपाच्या निवडणुकीत चार-चार नगरसेवकांचे प्रभाग

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJune 12, 2025No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नगर विकास विभागाचे प्रभाग रचनेसाठी आयुक्तांना आदेश जारी

    साईमत/धुळे/प्रतिनिधी :

    आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नगरविकास विभागाने राज्यातील २९ महानगरपालिका तसेच नगरपालिका, नगर परिषदांच्या प्रभाग रचनेचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे धुळे महानगरपालिकेच्याही प्रभाग रचनेची प्रक्रिया सुरु होत आहे. यासंदर्भात आयुक्तांना आदेश दिले आहेत. नगरसेवक पदाची निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्यांचे लक्ष प्रभाग रचनेकडे लागले आहे.निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार राज्यातील कार्यकाळ पूर्ण झालेल्या महानगरपालिकांमध्ये निवडणुकीची धामधुम लवकरच सुरु होणार आहे. त्यात धुळे, जळगाव, नाशिकसह अ, ब, क वर्ग महानगरपालिकात चार सदस्यीय प्रभाग रचना करण्यात येणार आहे.

    मुंबई महानगरपालिकेच्या २२७ प्रभागांनुसार ‘ड’ वर्गातील १९ महानगरपालिकांचीही प्रभाग रचना करण्यात येणार आहे. मागील – तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक – स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबर, नोव्हेंबर कालावधीत पार पडण्याची शक्यता आहे. त्यानुसार निवडणूक आयोगाने राज्य सरकारला प्रभाग रचनेचे आदेश दिले. आदेशाचे पालन करताना नगरविकास प्रभागाकडून २९ महानगरपालिका आयुक्तांना प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहेत. प्रभाग रचनेसाठी साधारण अडीच महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यासाठी गुगल मॅपचा आधार घेण्यात येणार आहे.

    मुंबई महानगरपालिकेसाठी ८ सप्टेंबर २०२२ च्या अधिनियमानुसार २२७ प्रभागानुसार प्रभाग रचना करण्याचे आदेश जारी केले आहेत. प्रभाग रचना करताना महानगरपालिका क्षेत्राची माहिती असणारा अधिकारी, प्रभाग रचनेशी संबंधित नेमलेला अधिकारी, नगर रचनाकार, संगणकतज्ज्ञ यांची महानगरपालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचे अधिकार दिले आहेत. महानगरपालिकेच्या आयुक्तांनी प्रारूप प्रभाग रचना तयार करून राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेस सादर करावयाचा आहे. त्यानंतर राज्य निवडणूक आयुक्तांकडून प्रभाग रचनेस मान्यता देण्यात येणार आहे. त्यानंतर आयुक्तांकडून प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यावर हरकती सूचना मागविण्यात येणार आहेत.

    धुळे, जळगाव, नाशिकलाही चार सदस्यीय प्रभाग रचना

    महायुतीत शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात ८ सप्टेंबर २०२२ च्या अधिनियमानुसार अ, ब व क महानगरपालिकांना चार सदस्यीय प्रभाग रचना करण्यात येणार आहे. पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, जळगाव, धुळे, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई, वसई-विरार, छत्रपती संभाजीनगर, कल्याण-डोंबिवली अशा महानगरपालिकांमध्ये चार सदस्यीय प्रभाग रचना लागू केल्या आहेत.

    २५ जानेवारी २०२२ च्या अधिनियमानुसार प्रभाग रचना

    राज्यातील १९ ‘ड’ वर्ग महानगरपालिकांसाठीही प्रभाग रचनेचे आदेश जारी केले आहे. प्रभाग रचनेची जबाबदारी संबंधित मुख्याधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविली आहे. महानगरपालिकांमध्ये उल्हासनगर, पनवेल महानगरपालिकेचा समावेश आहे. त्याचप्रमाणे २५७ नगरपालिका व नगर परिषदांच्या प्रभाग रचनेचे आदेशही निर्गमित केले आहेत. ही प्रभाग रचना २५ जानेवारी २०२२ च्या अधिनियमानुसार करण्याचे आदेश दिले आहेत.

    ऑक्टोबरमध्ये निवडणुका होण्याची शक्यता

    आयुक्तांनी प्रभाग रचना तयार केल्यावर राज्य निवडणूक आयुक्तांकडे मान्यतेसाठी पाठवावे लागेल. निवडणूक आयोगाने मान्यता दिल्यावर प्रभागांचे प्रारूप जाहीर केले जाईल. त्यावर हरकती व सूचना मागविण्यात येतील. त्यावर सुनावणी करून प्रभागांची अंतिम रचना निवडणूक आयोगाकडे मंजुरीसाठी पाठविली जाईल. राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिल्यावर प्रभागांची अंतिम रचना जाहीर केली जाईल. ही आठ टप्प्यातील प्रक्रिया पार पडण्यासाठी किमान अडीच महिने लागू शकतात. म्हणजेच ऑगस्ट अखेरीस किवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रभागांची अंतिम रचना जाहीर होईल. त्यानंतर आरक्षणाची सोडत काढली जाईल. निवडणुका ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    ‘जाते जाते तुमने, आवाज़ तो दी होगी…’ अजितदादांच्या शोकसभेत सर्वपक्षीय नेत्यांचे अश्रू अनावर; वरळी डोममध्ये भावनांचा पूर

    February 23, 2026

    Dhule : धुळ्यातील पिंपळनेर हादरले; आनंदोत्सवात धारदार शस्त्रांचा कहर

    February 20, 2026

    Deputy Chief Minister : सुनेत्रा पवार हे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत

    January 31, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.