Minister Babasaheb Patil : अमळनेरच्या अर्बन बँकेमुळे राज्यात स्वप्न साकार : मंत्री बाबासाहेब पाटील

0
28

सभासद, ग्राहक मेळावा उत्साहात, इमारतीचे लोकार्पण

साईमत/अमळनेर/प्रतिनिधी :

अमळनेर अर्बन बँकेने १०० वर्ष काम केले आहे. अशा काम करणाऱ्या संस्थांमुळे राज्यात स्व.यशवंतराव चव्हाण, पंजाबराव देशमुख यांनी पाहिलेले स्वप्न साकार झाल्याचे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील यांनी केले. येथील छ.शिवाजी महाराज नाट्यगृह येथे अमळनेर को.ऑप.अर्बन बँकेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित भव्य सभासद ग्राहक मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी अर्बन बँकेच्या अद्ययावत सोयींनी युक्त नूतनीकरण केलेल्या भव्य इमारतीचे लोकार्पण राज्याचे सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील होते. समारंभात बँकेचे ज्येष्ठ सभासद, ठेवीदार, कर्जदार यांचा सत्कार सन्मानपत्र देऊन करण्यात आला. अमळनेर अर्बन बँक येथे कोनशिलाचे अनावरण ना.बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच विविध दालनांचे ना.गुलाबराव पाटील, आ.अनिल पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष विश्वासराव ठाकूर, महाराष्ट्र अर्बन को.ऑप.बँक फेडरेशनचे अध्यक्ष अजय ब्रम्हेचा, माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे अध्यक्ष संजय पवार, जळगाव जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रहास गुजराथी, सहकार भारतीचे संघटन मंत्री दिलीप पाटील, माजी जि.प.सदस्या जयश्री पाटील, विभागीय सहनिबंधक संभाजी निकम, सहकार भारती प्रशिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय बिर्ला, जिल्हा निबंधक गौतम बलसाने, सहाय्यक निबंधक व्ही.एम.जगताप, धनवर्षा बँकेचे चेअरमन हेमंत चौधरी, चंद्रकांत वाणी आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविकात बँकेच्या प्रगतीची माहिती देत सभासदांचे चेअरमन पंकज मुंदडे यांनी ऋण व्यक्त केले. ना.बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते फलकाद्वारे सभासदांसाठी १० टक्के लाभांश जाहीर केला तर अमृत धनसंचय योजना आ.अनिल पाटील यांच्या हस्ते जाहीर करण्यात आली. याप्रसंगी व्हॉ.चेअरमन रणजित शिंदे यांनी शतक महोत्सवी वर्षानिमित्त सर्वसामान्य सभासद, ज्येष्ठ नागरिकांसाठी अमृत धनसंचय १०० योजनेची माहिती देत उपस्थितांचे आभार मानले.

यांनी घेतले परिश्रम

यशस्वीतेसाठी बँकेचे चेअरमन पंकज मुंदडे, व्हॉ.चेअरमन रणजित शिंदे यांच्यासह संचालक प्रवीण जैन, लक्ष्मण महाजन, भरतकुमार ललवाणी, प्रदीप अग्रवाल, दीपक साळी, अभिषेक पाटील, प्रवीण पाटील, पंडित चौधरी, मोहन सातपुते, वसुंधरा लांडगे, डॉ.मनीषा लाठी, ॲड.व्ही आर पाटील, ॲड.विजय बोरसे, बँकेचे व्यवस्थापक अमृत पाटील यांच्यासह कर्मचारी, पिग्मी एजंट, माजी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी अमळनेर अर्बन बँकेचे माजी संचालक, सभासद, ग्राहक, ठेवीदार व विविध संस्थांचे पदाधिकारी, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, हितचिंतक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here