मंत्रिमंडळ विस्तारात भाजपकडून धक्का तंत्राचा वापर ; कोणत्या नेत्यांचा पत्ता कटणार?

0
36

भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षातील सर्व इच्छुकांना मंत्रिमंडळात स्थान देता येणार नाही हे स्पष्ट केले. यामुळे इच्छुकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. यात भाजपकडून धक्कातंत्राचा वापर करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. शिंदे गटातील 13 ते 14 जणांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याने भाजपमधील इच्छुकांना आापला नंबर लागणार की नाही, अशी धाकधूक आहे.

शिवसेना – भाजप युतीच्या काळात कॅबिनेट आणि राज्यमंत्री म्हणून जवळपास 43 जणांचा समावेश करण्यात आला होता. मात्र, त्या काळात मंत्रिपद भूषवलेले काही जण कुठल्या ना कुठल्या कारणाने आता पुन्हा मंत्रिपदावर दिसणार नाहीत.

कसे बदलणार चित्र?

2014 ला भाजपचा मुख्यमंत्री असताना ज्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले होते, त्यातील जवळपास 7 जण भाजपकडून आमदार नाहीत. यात पंकजा मुंडे, विनोद तावडे, अनिल बोंडें, गिरीश बापट, एकनाथ खडसे यांना मंत्रिमंडळात स्थान असणार नाही हे स्पष्ट झाले आहे. पंकजा मुंडे, तावडे, बोंडें, बापट हे भाजपमध्ये असले तरी ते विधानभवनाचे सदस्य नाहीत. तर एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत.

2014 मध्ये भाजपचे मंत्री

देवेंद्र फडणवीसांकडे 2014 मध्ये मुख्यमंत्रीपदासह गृह, नगरविकास, सामान्य प्रशासन, विधी व न्याय, बंदरे, पर्यटन, माहिती व जनसंपर्क, माजी सैनिकांचे कल्याण, राजशिष्टाचार, रोजगार व स्वयंरोजगार आणि अन्य मंत्र्यांना नेमून न दिलेले विभाग किंवा त्यांचे भाग अशा मंत्रालयाचा कार्यभार होता.
एकनाथ खडसेंना भाजपने महसूल, मदत कार्य व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन, अल्पसंख्याक विकास व वक्फ, कृषी व फलोत्पादन, पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय, राज्य उत्पादन शुल्क खात्यांचा कारभार दिला होता.
सुधीर मुनगंटीवारः अर्थ आणि नियोजन, वन
प्रकाश मेहताः गृहनिर्माण, खनिकर्म, कामगार
चंद्रकांत पाटील: सहकार, पणन, वस्त्रोद्योग, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून)
पंकजा मुंडे: ग्रामविकास आणि जलसंधारण, रोजगार हमी योजना, महिला आणि बा​लविकास
गिरीश बापट: अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, अन्न व औैषध प्रशासन, संसदीय कार्य
विष्णू रामा सावराः आदिवासी विकास
गिरीश महाजन: जलसंपदा
चंद्रशेखर बावनकुळेः ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा
बबनराव लोणीकर: पाणीपुरवठा व स्वच्छता
राजकुमार बडोलेः सामाजिक न्याय व विशेष सहाय्य
दिलीप कांबळेः सामाजिक न्याय व विशेष सहाय्य
विद्या ठाकूरः ​महिला व बालविकास, अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन
प्रा. राम शिंदे : गृह (ग्रामीण), पणन, सार्वजनिक आरोग्य, पर्यटन
अंबरीशराव अत्राम‍ : आदिवासी विकास
डॉ. रणजित पाटील : गृह (शहरे), नग​रविकास, सामान्य प्रशासन, विधी व न्याय, संसदीय कार्य
प्रवीण पोटे : उद्योग व खनिकर्म, पर्यावरण, सार्वजनिक बांधकाम विभागातील सार्वजनिक उपक्रम वगळून
राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडेही फडणवीस सरकारच्या काळात मंत्रिपद होते. तर आशिष शेलार यांच्याकडेही मंत्रिपद होते, तर औरंगाबादचे अतुल सावे यांनाही राज्यमंत्रिपद देण्यात आले होते.
मात्र, आगामी मंत्रिमंडळ विस्तारात 106 आमदारांपैकी केवळ 14 ते 15 आमदारांनाच मंत्रिपद मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
शिवसेना मंत्रिमंडळातही होती नाराजी (2014)

डॉ. दीपक सावंत यांना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रिपद देण्यात आले होते.
विजय ​शिंदे : सार्वजनिक बांधकाम विभागात सार्वजनिक उपक्रम, परिवहन, कामगार, वस्त्रोद्योग​​​​
संजय राठोड : महसूल
दादाजी भुसे : सहकार
विजय शिवतारे : जलसंपदा व जलसंधारण
दीपक केसरकर : अर्थ व ग्रामविकास,
रवींद्र वायकर : गृहनिर्माण, उच्च व तंत्र ​शिक्षण
दिवाकर रावते: परिवहन
सुभाष देसाई: उद्योग
रामदास कदमः पर्यावरण
एकनाथ ​शिंदे: सार्वजनिक बांधकाम विभागातील सार्वजनिक उपक्रम​​​​​​
गुलाबराव पाटील, तानाजी सावंत यांना 2014 मध्ये शिवसेनेकडून संधी देण्यात आली होती. मात्र स्वत:ठाकरे मुख्यमंत्री असताना मात्र 2014 ला मंत्री असलेल्या 4 जणांचा 2019 ला मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला नव्हता. यामुळे शिवसेनेमध्ये नाराजी दिसून येत होती..
संजय कुटेंना परत संधी?

सुरत ते गोवा एकनाथ शिंदेंच्या सोबत असलेले माजी मंत्री आमदार संजय कुटेंना यावेळी पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांनी शिवसेनेच्या बंडखोरांसोबत सुरत ते गुवाहटी ते गोवा असा प्रवास केला आणि त्यांच्यावर नियोजनाची जबाबदारी होती, यानंतर त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार का याकडे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

यांना मिळू शकते संधी

गुजरातमध्ये पहिल्यावेळेस निवडून आलेल्या आमदारांना मंत्रिपदे देण्यात आल्याने तसे झाले तर देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार, विधान परिषद सदस्य श्रीकांत भारतीय, डॉ. रणजित पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, प्रा.राम शिंदे, मेघना बोर्डीकर यांची राज्यमंत्रिमंडळात वर्णी लागू शकते. या व्यतिरिक्त चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन यांना संधी मिळू शकणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरू आहे.

यांचा पत्ता होऊ शकतो कट

मंत्रिमंडळ विस्तारात ज्येष्ठ नेत्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे, दिलीप कांबळे, विद्या ठाकूर, सुधीर मुनगंटीवार, बबनराव लोणीकर, प्रवीण पोटे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता नसल्याची चर्चा सुरू आहे.

शिंदे गटातील हे आहेत इच्छुक?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतून कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील, दादा भुसे, उदय सामंत, संदीपान भुमरे, राज्यमंत्री शंभूराज देसाई, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह अपक्ष राज्यमंत्री राजेंद्र यड्ड्रावार, आणि बच्चू कडू यांनी मंत्रिपदावर असताना शिंदेंना पाठिंबा दिला. यांच्यासह संजय शिरसाट, तानाजी सावंत, संजय राठोड, दीपक केसरकर, योगेश कदमांसह प्रताप सरनाईक, यामिनी जाधव यांना मंत्रिपदाची अपेक्षा आहे. यातील मविआमध्ये मंत्रिपद असणाऱ्यांना मंत्रिपद मिळणार असल्याचे स्पष्ट असले, तरी या व्यतिरिक्त कुणाची वर्णी मंत्रिमंडळात लागू शकते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here