अमळनेरला दोन महत्त्वपूर्ण रस्त्यांची दर्जोन्नती

0
3

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

मतदारसंघात ग्रामीण भागातील दोन महत्त्वपूर्ण रस्त्यांची दर्जोन्नती करण्यास ना.अनिल पाटील यांच्या प्रयत्नांनी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यासाठी दोन्ही मिळून सुमारे १७ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

शासन मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा २ संशोधन व विकास अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी अनेक रस्त्यांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यात अमळनेर मतदारसंघातील दोन महत्वपूर्ण रस्त्यांचा समावेश झाला आहे. याबाबत महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाचा शासन आदेश दि.१३ सप्टेंबर २०२३ रोजी प्रसिद्ध झाला आहे. त्यात अमळनेर मतदारसंघातील प्रजिमा-५ (दहीवद) ते नगाव रस्ता -साखळी क्रमांक ००० ते ४/६६०, ४/७६० ते ५/६५० या ५.५० कि.मी. रस्त्यासाठी ४७१.६५ लाख एवढा निधी मंजूर झाला आहे. सडावण-हेडावे-पळासदळे- कुर्हेे खु. बु., नगाव खु. बु., धुपी-पिळोदा-गांधली-मेहरगाव ते पिंगळवाडे(भाग लांबी डावे, पळासदडे, कुर्हे खु.बु., नगाव खु.बु., धुपी पिळोदा गांधली ते मेहेरगाव) या १४.५३० कि.मी. रस्त्यासाठी १२२१.७५ एवढा निधी मंजूर झाला आहे.

रस्त्यांची कामे लागली मार्गी

दोन्ही रस्ते म्हणजे परिसरातील अनेक गावांना जोडणारे तसेच शहरात जाण्यासाठी अंतर कमी करणारे शॉर्टकट रस्ते आहे. या रस्त्यांची दर्जोन्नती होत असल्याने ग्रामीण जनतेला अत्यंत सोईचे होणार आहे. मंत्री अनिल पाटील यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे या रस्त्यांची कामे मार्गी लागली आहे. याबद्दल त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, ना.अजित पवार, ग्रामविकासमंत्री ना.गिरीश महाजन, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांचे आभार व्यक्त केले आहे. ग्रामीण भागातील जनतेनेही ना.पाटील यांचे आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here