चोपड्यात समाज कल्याण अधिकाऱ्याने घडविले माणुसकीचे दर्शन

0
2

साईमत, चोपडा : प्रतिनिधी

शहरातील मिलिंद वसतिगृहात तपासणीसाठी आलेल्या समाज कल्याण अधिकारी विजय रायसिंग यांनी गरजू विद्यार्थ्यांना पुरेसे ताट नसल्याचे लक्षात येताच खिशातील पदरमोड करून २५ ताट लागलीच मागवून वसतिगृहास भेट दिले. यावेळी कर्मचारी वृंद भारावून गेल्याच्या ह्रदय स्पर्शी प्रसंगाने अधिकाऱ्याने माणुसकीचे दर्शन घडविले आहे.

चोपडा शहरातील मिलिंद वसतीगृह, सावता माळी, श्री संत गाडगेबाबा आणि महात्मा फुले वसतिगृह येथे प्रशासकीय कामाचा भाग म्हणून जिल्हा समाज कल्याण अधिकारी विजय रायसिंग, समाज निरीक्षक व्ही.टी.बाविस्कर व समाज कल्याण निरीक्षक भरत चौधरी, पवार आदी तपासणीसाठी आले होते. त्यांना अचानक विद्यार्थ्यांना ताट अपूर्ण असल्याचे लक्षात आले. त्यानंतर विजय रायसिंग यांनी आपण अधिकारी असल्याचे बाजूला ठेवत ते गरजवंत विद्यार्थ्यांच्या मदतीला धावून आले. खिशातील पदरमोड करून त्वरित २५ ताट वसतिगृहास भेट दिले.

दातृत्वशाली कार्याचे सर्वत्र कौतुक

आपणही हलाखीच्या परिस्थितीतून अत्यंत खडतर जीवन प्रवास करीत यशाचा उंबरठा गाठला आहे हे आठवत. तोच प्रसंग विद्यार्थ्यांवर ओढवत असल्याचे लक्षात घेऊन त्यांच्यातली माणूसकी जागृत झाली. त्यांच्या दातृत्वशाली कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here