Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»चोपडा»‘Lifetime Achievement Award’ : चोपड्याचे साहित्यिक राजेंद्र पारे ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित
    चोपडा

    ‘Lifetime Achievement Award’ : चोपड्याचे साहित्यिक राजेंद्र पारे ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoMay 24, 2025Updated:May 24, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साहित्य, शैक्षणिक क्षेत्रासह सर्व स्तरातून होतोय कौतुकाचा वर्षाव

    साईमत/चोपडा/प्रतिनिधी :

    येथील साहित्यिक राजेंद्र पारे यांना साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल शिरपूर येथील समता उत्कर्ष समितीतर्फे आयोजित ‘काकासाहेब बैसाणे जीवन गौरव’ पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. शिरपूर येथील सिटी प्राईड उत्सवाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात डॉ. तुषार बैसाणे लिखित ‘बाप माय’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी डॉ. तुषार रंधे, आशा रंधे, पिंटू शिरसाठ, भदंत आनंद, डॉ. दीपाली सोसे, डॉ. माधवराव कदम, युवराज माळी, डॉ. फुला बागूल, डॉ. सतीश मस्के, प्राचार्य सारीका रंधे, आशा बैसाणे मान्यवर उपस्थित होते.

    गणपूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत राजेंद्र पारे हे कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांना राज्य शासनाचा शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. त्यांचे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मागचं दार, ठिगळ अन् टाके, बुद्धा इज स्माईलिंग, निब्बान, धावपट्टीवरचा अनोखा प्रवास,आपले संविधान आपला सन्मान आदी साहित्य प्रकाशित झाले आहे. तसेच त्यांच्या ”आकांक्षा’ ह्या कथेचा जळगाव कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या बी.ए.प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमात समावेश केला आहे.

    यांनी घेतले परिश्रम

    यशस्वीतेसाठी डॉ. तुषार बैसाणे, पनीराज बैसाणे, संजय जाधव, जितेंद्र भदाणे आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन ज्वाला मोरे तर आभार पनीराज बैसाणे यांनी मानले. राजेंद्र पारे यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल साहित्य, शैक्षणिक यांच्यासह सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    “जिजाऊंचे संस्कार आणि विवेकानंदांचे विचार राष्ट्रनिर्मितीचा पाया : पंकज शिंदे”

    January 13, 2026

    Jalgaon : पत्रकारांना कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वेगावर स्वार होणे गरजेचे-डॉ. सदानंद मोरे

    January 6, 2026

    Dhanora, Chopda Taluka:वाचन हे स्पर्धा परीक्षेचे आधार कार्ड” – खुशबू महाजन यांचा संदेश

    January 1, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.