साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
येथील विद्या विहार कॉलनीतील भाविकांचे श्रद्धास्थान नवीन निर्माण झालेल्या भव्य दिव्य विद्देश्वर महादेव मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा तीन दिवस चालणार आहे. यानिमित्त २६ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता मिरवणूक काढण्यात आली.
रविवारी, २७ रोजी सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत पूजा होणार आहे. सोमवारी, २८ रोजी सकाळी महामंडलेश्वर स्वामी हंसानंद तिर्थजी महाराज कपिलेश्वर मंदिर, निम यांच्या हस्ते कळस लावणे तसेच दुपारी १२ वाजता प्राणप्रतिष्ठा होणार आहे. परिसरातील सर्व भाविकांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक विद्देश्वर महादेव मंदिर समिती, विद्या विहार कॉलनीतील सर्व भाविक तसेच सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पाटील यांनी केले आहे.