साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
येथील डॉ. सौ. प्रमिलाताई पूर्णपात्रे प्राथमिक विद्यालय येथे भारताची चांद्रयान मोहीम यशस्वी झाल्याने विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. संस्थेचे अध्यक्ष डॉ. सत्यजित पूर्णपात्रे, सचिव डॉ. शुभांगी पूर्णपात्रे यांच्या प्रेरणेने व विद्यालयाचे मुख्याध्यापक रमेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांची मानवी साखळी तयार करून भारताचा नकाशा साकारला. यावेळी विद्यार्थ्यांनी “भारत माता की जय” असा जयघोष करून शालेय परिसर दणाणून टाकला.
शास्त्रज्ञांना दिली सलामी
चांद्रयान मोहिमेबाबत मुख्याध्यापक रमेश सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी मानवी मनोरे तयार करून त्यावर तिरंगा ध्वज फडकवून शास्त्रज्ञांना सलामी दिली. यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.