चाळीसगावला निवडणुकीच्या पक्ष बांधणीसाठी शिवसेनेची बैठक

0
8

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आगामी निवडणुकांसाठी पक्ष बांधणी, ‘गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक’ अभियानाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विचार, घरोघरी पोहोचविण्यासाठी शिवसेनेचे नेते उमेश गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय विश्रामगृह येथे ११ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १२ वाजता महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली.

बैठकीला विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राहुल पाटील, जिल्हा संघटक सागर पाटील, उपजिल्हाप्रमुख संदीप राठोड, तालुका संघटक गुणवंत शेलार, युवा सेना तालुकाप्रमुख महेंद्र पाटील, वैद्यकीय मदत कक्ष शहरप्रमुख शुभम राठोड, महिला आघाडी जिल्हासंघटक प्रतिभा पवार, महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख अनिता शिंदे, महिला आघाडी तालुकाप्रमुख मनिषा महाजन, शहर प्रमुख सुवर्णा राजपूत, युवासेना तालुका प्रवक्ता विशाल धनगर, अल्पसंख्याकचे उपतालुकाप्रमुख इक्बाल पठाण, सागर चौधरी, दीपक कुमावत, दीपक बारी, सागर पाटील, दिनेश कासारी आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here