साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
समता सैनिक दलाचे मुख्य प्रचारक धर्मभूषण बागुल (चाळीसगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा प्रचारक किशोर डोंगरे यांच्या नेतृत्वात ‘गाव तेथे शाखा घर तेथे सैनिक अभियान’ अंतर्गत भडगाव तालुक्यातील बात्सर गावात समता सैनिक दलाची नुकतीच बैठक घेण्यात आली. याप्रसंगी उपस्थित तरुणांना समता सैनिक दलाचे ध्येय धोरण, ऐतिहासिक कार्य, महत्त्व व कामकाजाबाबत प्राथमिक माहिती देण्यात आली.
या भागातील जनतेतून चांगला प्रतिसाद मिळत असून लवकरच गाव शाखा कमिटी गठीत करण्यात येणार आहे. सभासद नोंदणी करणे, समता सैनिक दलाचा गणवेश तयार करणे असे अनेक मुद्दे ठरविण्यात आले. बैठकांचे आयोजन भडगाव तालुका प्रचारक विजय मोरे, रामजी जावरे, वाल्मिक मोरे, जनार्दन जावरे यांनी केले होते. बैठकीस पाचोरा तालुका प्रचारक शांताराम सपकाळे उपस्थित होते.