भडगावला विविध कार्यकारी ग्रामोद्योग सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी सुनील मिस्तरी

0
1

साईमत, भडगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील ग्रामीण कारागिरांची विविध कार्यकारी ग्रामोद्योग संस्थेच्या चेअरमनपदी सुनील मिस्तरी तर व्हाईस चेअरमनपदी सुधाकर जाधव यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. यापैकी सलग दुसऱ्यांदा चेअरमन पदासाठी सुनील मिस्तरी यांना संधी मिळाली आहे. चेअरमन पदासाठी त्यांचा एकमेव अर्ज आला होता. तसेच व्हॉइस चेअरमन पदासाठी सुधाकर जाधव यांनी अर्ज केला होता. निवड जाहीर झाल्यानंतर सुनील मिस्तरी आणि सुधाकर जाधव यांचा सत्कार करण्यात आला.

नवनिर्वाचित संचालकांमध्ये यशवंत सिताराम सुतार, सुरेश कैलास बोरसे, एकनाथ सुखदेव लोहार, नाना रमेश मिस्तरी, शाम संतोष बागुल, किरण गुलाब देवरे, उज्ज्वला भैयासाहेब हिरे, ज्योती बाळासाहेब मोरे यांचा समावेश आहे.

निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून भडगावचे सहाय्यक निबंधक महेश कासार, अविनाश पाटील, भाऊसाहेब महाले, कार्यालयीन प्रमुख प्रेमसिंग पाटील यांनी काम पाहिले. यावेळी धनराज शार्दुल, बापूराव शार्दुल, अमोल जगताप, विजय देवरे, संजय शार्दुल, संजय हिरे, शिवाजी शार्दुल, माजी सचिव एस.पी.विसपुते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here