चोपड्यात अवयवदान जनप्रबोधन यात्रेनिमित्त व्याख्यान

0
13

साईमत, चोपडा : प्रतिनिधी

दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन, मुंबई आणि संयोजक रोटरी क्लब ऑफ मिडटाऊन, नाशिक यांच्यातर्फे खान्देश अवयव दान जनप्रबोधन यात्रेचे चोपडा येथे नुकतेच आगमन झाले होते. यावेळी शहरात अवयवदान जनप्रबोधन प्रभातफेरी तसेच बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गांधी चौक याठिकाणी नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करत घोषणा देऊन जनजागृती केली.

यानंतर एम. जी. कॉलेज येथे प्राणीशास्त्र विभागातर्फे अवयवदान जनप्रबोधन हेतूने विद्यार्थ्यांची पोस्टर स्पर्धा घेण्यात आली. त्यात अत्यंत सुंदर, कल्पक व अभ्यासपूर्ण पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन केले होते. त्यानंंतर सभागृहात अवयवदान जनप्रबोधन यात्रेचे व्याख्याते प्रशांत पागनिस, सुधीर बागाईतदार यांनी उपस्थितांना त्वचादान, नेत्रदान, अवयवदान, देहदान यासंदर्भात माहिती दिली. तसेच अवयवदान, नेत्रदान, अंगदान याबाबतचे गैरसमज त्यांची आवश्‍यकता व महत्त्व उदाहरणासह पटवून दिले.

यावेळी दी फेडरेशन ऑफ ऑर्गन अँण्ड बॉडी डोनेशन, मुंबई संस्थेचे अविनाश कुळकर्णी, नागराजन अय्यर, सुधीर व माधुरी बागाईतदार, चंद्रशेखर देशपांडे, अशोक जव्हेरी यांच्यासह रोटरी चोपडा प्रेसिडेंट चेतन टाटीया, सचिव अर्पित अग्रवाल, उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. एल. चौधरी, ज्येष्ठ रोटे एम. डब्ल्यू. पाटील, व्ही. एस.पाटील, विलास पाटील, पंकज बोरोले, ईश्‍वर सौंदाणकर, पवन गुजराथी, विपुल छाजेड, अरुण सपकाळे, बी. एस. पवार, इतर रोटरी सदस्य, दादासाहेब डॉ. सुरेश पाटील नर्सिंग कॉलेज, प्राणीशास्त्र विभागातील प्राध्यापकांचे सहकार्य लाभले. प्रास्ताविक प्रकल्पप्रमुख रुपेश पाटील, सूत्रसंचालन प्राचार्या करुणा चंदनशिव तर आभार प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ. हनुमंत सदाफुले यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here