रेल्वे विभागाकडून दिली परिवाराला माहिती
साईमत/ न्यूज नेटवर्क/ भडगाव :
तालुक्यातील वाडे येथील जवान समाधान सखाराम महाजन (वय २३) यांचे अपघाती निधनाची माहिती बुधवारी, २४ जुलै रोजी सकाळी ९ वाजता परिवाराकडून मिळाली आहे. वाडे येथील सुपुत्र समाधान महाजन हे आर्मीमध्ये नोकरीला होते. ते एका महिन्यांची सुट्टीवर घरी आलेले होते. सुट्टी उपभोगून कर्तव्यावर हजर होण्याकामी परतीचा प्रवास करीत असताना मालपूर, आग्राजवळ रेल्वे अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती रेल्वे विभागाकडून परिवारास देण्यात आली.
समाधान महाजन हे ४० आर.आर.जे एन.के. पुंच्छ येथील पोस्टींगवर कार्यरत होते. समाधान सखाराम महाजन यांचे लग्न दीड वर्षापूर्वीच झाले आहे. ते सखाराम आनंदा महाजन यांचे एकुलते एक चिरंजीव होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी, पत्नी, असा परिवार आहे. या घटनेबाबतची माहिती गाव परिसरात पोहोचताच वाडे गावासहित संपूर्ण भडगाव तालुक्यात शोककळा पसरली आहे. जवानाचे पार्थिव गावावर आणले जाणार आहे. परंतु, यासंदर्भात अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.