चोपडा शहरात मतदान केंद्रांची प्राथमिक पाहणी

0
44

साईमत, चोपडा : प्रतिनिधी

येथील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने चोपडा शहरातील मतदान केंद्रांची सद्यस्थिती आणि तेथील मूलभूत व्यवस्था आदींची नुकतीच पाहणी करण्यात आली. यावेळी रावेर लोकसभा मतदारसंघ अंतर्गत चोपडा विधानसभा मतदारसंघातील सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी पुनर्वसन जळगाव गजेंद्र पाटोळे, चोपडा तालुक्याचे तहसीलदार तथा अतिरिक्त सहाय्यक निवडणूक अधिकारी भाऊसाहेब थोरात, चोपडा नगरपरिषदेचे परीक्षाविधीन मुख्याधिकारी अर्पित चव्हाण, चोपडा मंडळाधिकारी मनोज साळुंखे आदी उपस्थित होते.

चोपडा शहरातील विविध प्रभागांमध्ये असलेल्या मतदान केंद्रांमध्ये आदर्श आराखड्यानुसार लाईट, पंखा, पाणी व प्रसाधनगृह आदी मूलभूत सुविधा उपलब्ध असल्याची खात्री त्यांनी केली. मतदान केंद्र पाहणी दरम्यान आढळलेल्या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी त्यांनी संबंधितांना सूचना दिल्या. निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आवश्‍यक त्या मूलभूत सुविधा मतदान केंद्रांवर उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन उपस्थितांनी दिले. तसेच पाहणी दरम्यान विविध शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये निवडणुकीसंदर्भात जनजागृती करण्यासाठी अधिकारी वर्गाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. भविष्यातील सुजाण जबाबदार नागरिक विद्यार्थ्यांमधूनच घडणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here