ललित कला केंद्र येथे पंचप्रण शपथ ग्रहण  

0
3

साईमत, चोपडा : प्रतिनिधी

येथील भगिनी मंडळ संचलित ललित कला केंद्र येथे १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्र आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अभियान ‘मेरी माटी मेरा देश’ हा पंचप्रण शपथ ग्रहण सोहळा घेण्यात आला.

याप्रसंगी ललित कला केंद्रातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राचार्य, संस्थेचे अध्यक्ष, पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रत्येकाने आपल्या उजव्या हाताच्या मुठीत भारत भूमीची पवित्र माती घेवून पंचप्रण शपथ ग्रहण करण्यात आली. यावेळी पंचप्रणाचे वाचन प्रा. संजय नेवे यांनी केले.

याप्रसंगी भगिनी मंडळ संस्थेच्या अध्यक्षा पूनम गुजराथी, उपाध्यक्ष छाया गुजराथी, ललित कला केंद्राचे प्राचार्य प्रा.सुनील बारी, बालक मंदिराच्या मुख्याध्यापिका अपूर्वा कुलकर्णी, नर्सिंग स्कूलचे प्राचार्य अशपाक पिंजारी, प्रा. शुभांगी पारखे, प्रा. विनोद पाटील, प्रसन्न गुजराथी, भगवान बारी, अतुल अडावदकर, प्रवीण मानकरी यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. आभार प्राचार्य बारी यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here