Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»गणेशोत्सवा निमित्त चित्रकला प्रदर्शन
    जळगाव

    गणेशोत्सवा निमित्त चित्रकला प्रदर्शन

    SaimatBy SaimatSeptember 20, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत जळगाव प्रतिनीधी

    अजिंठा आर्ट सोसायटी जळगाव व नि.पं.पाटील विद्यालय पळासखेडे (मि.) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यार्थ्यांचे चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन धी शेंदुर्णी संस्थेचे सचिव सतिष काशिद यांच्या हस्ते झाले
    यावेळी प्रमुख अतिथी म्हणून धी शेंदुर्णी संस्थेचे अध्यक्ष संजय गरुड , पु्.ना.गाडगीळचे शाखा मॅनेजर संदिप पोतदार, शाळेचे मुख्याध्यापक बी.एस.निकम, पर्यवेक्षक व्ही.आर.पाटील हे उपस्थित होते.

    या चित्रप्रदर्शनात पेन्सील माध्यमाचे गणपती चे आकर्षक ड्राईंग व पेंटींग, पोस्टर कलर माध्यमाचे पेंटींग तसेच निसर्गचित्र, वारली पेंटींग अशा विविध माध्यमाची व शैलीची एकुण 60 पेंटींग आहेत. सदर चित्रकला प्रदर्शन सर्वांसाठी विनामुल्य असुन 18 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर पर्यंत सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत उपलब्ध आहे. सदर चित्रप्रदर्शनात नि.प.पाटील विद्यालय, पळासखेडे (मिराचे) यांचे चित्र कलाकृती आहेत.

    सतिष काशिद यांनी मनोगत व्यक्त करतांना कलेची जोपासना आणि कलेमध्ये करिअर करा असे सांगितले, तसेच ग्रामीण भागातील चित्रकला प्रदर्शन बघुन त्यांना अतिशय आनंद वाटला. संजय गरुड यांनी चित्रकलेमध्ये विविध शैलीचे चित्राचे कौतुक केले व कलेची जोपासना करावी असे आवर्जुन सांगितले.तसेच कला ही अजरामर असे ते म्हणाले.
    चित्रप्रदर्शनात मिताली काळे, गायत्री भुरे , पुनम सुर्यवंशी ,ईश्‍वर चौधरी, प्रतिक्षा पाटील, जयश्री घोडके , रितु पाटील , रेणू पवार, जान्हवी हडप ,जयश्री पिठोडे, जान्हवी खैरे ,योजना चौधरी व माजी विद्यार्थ्यांचे पेटींग आहेत.
    विद्यार्थ्यांना शिवप्रसाद जोशी, डी.आर.चौधरी यांनी मार्गदर्शन केले. श्री.टी.टी.इंगळे सरांनी सुत्रसंचलन केले तर आभार प्रदर्शन मनिष पाटील यांनी मानले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेत्तर वृंद यांचे अनमोल सहकार्य लाभले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon : नेरी नाका परिसरातील रस्ता तात्पुरता बंद

    February 7, 2026

    Jalgaon : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे १२ फेब्रुवारीला ठिय्या आंदोलन

    February 7, 2026

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.