साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील देवगाव देवळी येथील महात्मा फुले हायस्कूल येथे सुवर्ण महोत्सवानिमित्त राष्ट्रीय खेळ दिन उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन होते. क्रीडा शिक्षक अरविंद सोनटक्के, स्काऊट शिक्षक एच.ओ.माळी, एस.के. महाजन यांनी विद्यार्थ्यांना खेळाच्या संदर्भात माहिती दिली. यावेळी शाळेतील ७० विद्यार्थी वेगवेगळ्या खेळात सहभागी झाले होते. मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी शासनाच्या परिपत्रकानुसार राज्यात क्रीडा सप्ताह आयोजित केला आहे. हे सांगत विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच खेळाला प्राधान्य द्यावे, असे सांगितले. विविध खेळात विद्यार्थ्यांना सुयश प्राप्त झाले.
संगीत खुर्चीत वैष्णवी श्याम पाटील, अमर वसावे, रोहित पोरबा तडवी, लिंबू चमचा स्पर्धेत मयुरी महाजन, निशा जाधव, तन्मय बैसाणे, संकेश वसावे, चैतन्य साईनाथ, कबड्डी स्पर्धेत नववीचा संघ विजयी, गोणपाट स्पर्धेत निशा जाधव, क्रिष पाटील, रोहीत तडवी तर रस्सीखेच स्पर्धेत नववीचा संघ विजयी ठरला आहे. स्पर्धेतील सर्व विजयी विद्यार्थ्यांना एका कार्यक्रमात बक्षिसे देण्यात येणार आहेत. यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक ईश्वर महाजन यांनी केले.