दीपावलीच्या सुट्ट्या असूनही नायब तहसीलदारांनी दिला उत्पन्नाचा दाखला

0
36

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

येथील तहसील कार्यालयाच्यावतीने नायब तहसीलदारांनी कार्यालयाला सुट्टी असतानाही माणुसकीचे नाते जपत अपघातात जखमी झालेल्या रुग्णाला वैद्यकीय मदतीसाठी तात्काळ लागणारा उत्पन्नाचा दाखला दिल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी आभार मानले आहेत.

योगेश संजय पवार यांचा १५ दिवसांपूर्वी अपघात झाला होता. झालेल्या अपघातात मेंदुला जबर मार लागल्यामुळे त्यांना नाशिक येथील सोपान रुग्णालयात भरती केले होते. त्यांची परिस्थिती साधारण असल्याने त्यांच्या उपचाराचा खर्च कुटुंब करु शकत नसल्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधी मिळावा, म्हणून मंत्रालयात फाईल दाखल केली होती. मात्र, त्यात उत्पन्नाचा दाखला नसल्यामुळे फाईल निधी वाचुन प्रलंबित होती. याबाबत टाकळी प्र.दे.चे एकनाथ पवार यांनी ही बाब रयत सेनेचे संस्थापक-अध्यक्ष गणेश पवार यांना सांगितल्याने नायब तहसीलदार जितेंद्र धनराळे यांना असलेली अडचण लक्षात आणून दिल्याने त्यांनी तहसील कार्यालयास दीपावलीची सुट्टी असताना रुग्णालयाच्या कामासाठी उत्पन्नाचा दाखला अत्यावश्‍यक असल्याने लागलीच धनराळे यांनी दाखला उपलब्ध करून दिला. जनतेसाठी तत्परतेने प्रशासनाचे अधिकारी आपली तत्परता दाखवल्याबद्दल एकनाथ पवार यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी शिरसगावचे दिलीप पाटील, रोहित शिंपी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here