Security guard beaten up : रुग्णालयात परिचारिकेचा विनयभंग करत दमदाटी : सुरक्षा रक्षकाला धक्काबुक्की

0
15

जळगावला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील घटना

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कक्ष क्रमांक १२ येथे एका परिचारिकेचा विनयभंग करून दमदाटी केल्याचा धक्कादायक प्रकार १२ मे रोजी घडला होता. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला असल्याचे सांगण्यात आले.

सविस्तर असे की, शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे जिल्हाभरातील रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. याठिकाणी कक्ष क्रमांक १२ येथे संजय अनिल भोई (रा. एरंडोल) याचा अपघात झाल्याने तो कक्षात उपचार घेत आहे. १२ मे रोजी सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास फिर्यादी परिचारिका ह्या कर्तव्यावर होत्या. तेव्हा संशयित आरोपी गोलू वंजारी (रा. एरंडोल) याने परिचारिकेजवळ येऊन, त्यांना लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले.

जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल

याबाबत जाब विचारल्यावर गोलू वंजारीने ‘तुला काय करायचे ते कर’ असे म्हणत दमदाटी केली. यावेळी कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा रक्षकाने त्याला बोलण्यास गेल्यावर सुरक्षा रक्षकाला दमदाटी करून धक्काबुक्की केली. त्यानंतर संशयित आरोपी गोलू वंजारी तिथून निघून गेला. याप्रकरणी परिचारिकेने जिल्हापेठ पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केल्यावरुन गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक शांताराम देशमुख करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here