रेल्वेवर झालेल्या दगडफेकप्रकरणी खा. स्मिताताई वाघ यांनी रेल्वे पोलिसांना धरले धारेवर

0
19

साईमत/ न्यूज नेटवर्क/ अमळनेर :

भोरटेक ते अमळनेर रेल्वे स्टेशन दरम्यान १२ जुलै रोजी गाडी क्र.०९०७८ रेल्वेची चैन ओढून रेल्वे थांबविण्यात आली. त्याठिकाणी रेल्वेवर जमावाकडून मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आल्याचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यासंदर्भात अमळनेर रेल्वे स्टेशन प्रबंधक अनिल शिंदे, वाणिज्य निरीक्षक रवि पांडे, एईएन संजय गुप्ता, कार्य निरीक्षक आडेकर, टेलिकॉमनिकेशन इंजिनियर सोनवणे, अमळनेर आयपीएफ विकास कुमार, नंदुरबार आयपीएफ बिजय कुमार, अमळनेरचे पोलीस निरीक्षक विकास देवरे यांची खासदार श्रीमती स्मिताताई वाघ यांनी भेट घेतली.

या प्रकरणाची माहिती घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच लवकरात लवकर आरोपींची ओळख पटवून जे कोणी या प्रकरणात दोषी असतील, त्यांना तात्काळ अटक करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य, भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी, भाजपा, संघ पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, समाजसेवक, पत्रकार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here