मोकाट गुरांनी रस्त्यावर मांडले ‘बस्तान’

0
24

वाहन चालकांची कसरत, नेहमीच घडताहेत अपघातांच्या घटना

साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी :

शहरातील मुख्य रस्त्यावर गुरे दिवसभर मोकळे सोडून देतात. यामध्ये गोमातेचे प्रमाण जास्त आहे. भाजी व फळविक्रेते खराब भाजी किंवा फळे रस्त्यावर टाकून देतात. तसेच काही नागरिक, व्यापारी भुतदया दाखवत मोकाट जनावरांना रस्त्यावर खायला टाकतात. ही मोकळे जनावरे खातात. रस्त्याच्या कडेला किंवा चक्क रस्त्यावर ‘बस्तान’ मांडतात. त्यामुळे वाहनचालकांना वाट काढत आपले वाहन चालवावे लागते. अशा प्रकारामुळे अनेक अपघात होतात. तसेच रस्त्यावर बसलेल्या गायींना ही यामुळे ईजा होतात.

सध्या नवीन होत असलेल्या विरशिरोमणी महाराणा प्रताप चौकापासून ते जुना मालेगाव नाक्यादरम्यान ३० ते ४० गोमाता व गोवंश नियमितपणे रस्त्यावर बसलेले असतात. यामुळे अनेक अपघात ही होत असल्याचे चर्चिले जात आहे. चाळीसगाव शहरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस तर नित्याचीच बाब असतांना आता या मोकाट जनावरांमुळे वाहन चालक, नागरिक पुर्णता: वैतागले आहेत.

चाळीसगावकर वैतागले

चाळीसगाव शहरात जवळपास सर्वकडेच रस्त्यांची कामे सुरु आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी एकेरी मार्गाने वाहने चालवावी लागतात. त्यामुळेही वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागत असतांना मोकाट कुत्रे व मोकाट जनावरे यामुळे चाळीसगावकर वैतागले आहेत. यावर उपाय योजना झाली पाहिजे, अशी वाहनचालकांसह नागरिकांची अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here