Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»कृषी»जामनेर तालुक्यातील सिंचन विहिरी अडकल्या आचारसंहितेत
    कृषी

    जामनेर तालुक्यातील सिंचन विहिरी अडकल्या आचारसंहितेत

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoMarch 18, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, जामनेर : प्रतिनिधी

    तालुक्यात शेतकऱ्यांसाठी असलेल्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून सिंचन विहिरीच्या कामांना मंजुरीसाठी ऑनलाइन नोंदणी करण्यात आल्या. मात्र, सिंचन विहिरी मंजूर करताना पैसे देवाण-घेवाण झाल्याची चर्चा काही पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली. मग एवढे पैसे जमा होतात, आमचे काय, असे धोरण काही पदाधिकाऱ्यांनी वापरल्यामुळे विहिरींचे काम थांबविण्यात आल्याचे शेतकरी वर्गात चर्चिले जात आहे. सिंचन विहीर प्रकरणात ना. गिरीष महाजन लक्ष घालणार होते. मात्र, आता आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने त्यांनाही या प्रकरणात हस्तक्षेप करता येणार नाही. त्यामुळे सिंचन विहिरीची कामे ठप्प झाली आहे. तालुक्यात शेतकऱ्यांवरच अन्याय का? असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.

    शेतकऱ्याला जर सिंचनाचे साधन उपलब्ध असेल तर शेतीला पाणी देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न नक्कीच वाढणार आहे. पर्यायाने शेतकऱ्यांची प्रगती होण्यास वाव आहे. मात्र, जामनेर पंचायत समितीमध्ये तालुक्यातील शेतकरी हिताच्याच योजना अडविल्या जातात, ही खेदाची बाब आहे. त्यामुळे ना.महाजन यांचे तालुका सुजलाम्‌ सुफलाम्‌ करण्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही. ना. महाजन यांच्या रूपाने तालुक्याला एक सक्षम नेतृत्व मिळाले आहे. या संधीचे सोने करण्याची गरज पदाधिकाऱ्यांना आहे. आपापसातील मतभेद बाजूला सारून शेतकरी हिताचे निर्णय घेणे आवश्‍यक असल्याची भावना तालुक्यातील शेतकरी वर्गात व्यक्त होताना दिसून येत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon : जळगाव जिल्ह्यात आठ नवीन ग्रामपंचायतींना शासनाची मान्यता

    April 7, 2026

    Jamner : फत्तेपूरमध्ये शॉर्ट सर्किटमुळे मका शेत जळून खाक

    April 6, 2026

    Jamner : जुन्या वादातून महिलेवर विनयभंग; दोन भावंडांविरोधात गुन्हा

    April 1, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.